Month: January 2024

ऍग्रो

२०० कोटींच्या कर्जवसुली साठी वैद्यनाथ कारखान्याचा होणार लिलाव

बीड, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ कारखान्यावरील थकीत कर्जापोटी युनियन बँकेने आता लिलावासाठी नोटीस प्रसिद्ध केली आहे. कारखान्याकडे तब्बल 203 कोटी रुपयांचे कर्ज थकीत असून या पोटी कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने केला जाणार आहे. यासाठी ची प्रक्रिया 25 जानेवारी रोजी पार पडणार असल्याचेही नोटीस मध्ये […]Read More

राजकीय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागपूर येथे कार्यालय कार्यान्वित

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त आणि नियोजनमंत्री अजित पवार यांचे नवीन नागपूर विभागीय कार्यालय ‘विजयगड बंगला, नागपूर जिल्हा परिषदेसमोर, रविभवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001’ येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. सचिन यादव हे उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तथा नागपूर कार्यालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. नागपूर, अमरावती […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुधवार, दि.१० जानेवारी २०२४ ● राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.(महिला व बालविकास) ● ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी(ग्राम विकास विभाग) ● शासकिय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरित करण्यात आलेल्या सहायक अनुदानाच्या जलद […]Read More

सांस्कृतिक

रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत ‘श्रीरामपूजा ते राष्ट्रपूजा’ याविषयावर व्याख्यान

ठाणे, दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा अमृतकाळातून स्वर्णिम काळाकडे प्रवेश सुरू आहे, सोबतच विकसित राष्ट्राकडे वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण तथा क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री अनुरागसिंह ठाकुर यांनी केले. ठाणे इथे 38 वी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला सुरु आहे. त्यात रामपूजा ते राष्ट्रपूजा या विषयावरील व्याख्यानाचे पुष्प गुंफतांना ते मंगळवारी […]Read More

गॅलरी

रश्मी शुक्ला यांनी स्वीकारला कार्यभार

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक म्हणून आज वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. केंद्रात प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या शुक्ला यांची नुकतीच महासंचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. सध्या या पदाचा तात्पुरता कारभार सांभाळणाऱ्या मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडून त्यांनी आज सूत्रे स्वीकारली. त्या […]Read More

विदर्भ

माजी मंत्री सुनील केदार यांना दिलासा , शिक्षेला स्थगिती

नागपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना उच्च न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे तसेच त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यात त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे हे प्रकरण वीस वर्षांहून अधिक जुने आहे. सुनील […]Read More

देश विदेश

या कालावधीत मुंबई एअरपोर्टचे दोन्ही रनवेज राहणार बंद

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या शुक्रवार (१२ जानेवारी) ते रविवार (१४ जानेवारी) ठराविक कालावधीत बंद राहणार आहेत. भारतीय हवाई दलाने नियोजित केलेल्या एरियल डिस्प्ले सरावामुळे बंदची घोषणा करण्यात आली आहे. 12 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) किंवा मुंबई विमानतळाच्या […]Read More

देश विदेश

मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंचा अर्जुन पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टीम इंडियाचा स्टार फास्ट बॉलर मोहम्मद शमीसह विविध खेळातील 26 खेळाडूंना आज अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. मोहम्मद शमीने 2023 च्या वर्ल्डकपमध्ये शानदार गोलंदाजी केली होती. त्याच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संध अंतीम फेरीत […]Read More

देश विदेश

लोकशाही चॅनलचा परवाना ३० दिवसांसाठी रद्द

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ दाखविल्याप्रकरणी ‘लोकशाही मराठी’ या वृत्तवाहिनीवर पुन्हा कारवाई झाली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चॅनलचे प्रसारण आज (मंगळवार) संध्याकाळी ६ वाजेपासून बंद करण्याचे आदेश दिलेत. तसेच, त्यांचा परवानाही 30 दिवसांसाठी निलंबित केला आहे. 14 जुलै 2023 रोजी […]Read More

देश विदेश

हे आहेत फ्रान्सचे सर्वात तरुण आणि पहिले गे पंतप्रधान

पॅरिस, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या देशात अजुनही गे, लेस्बियन, तृतीयपंथिय अशा व्यक्तींना समाजाकडून स्वीकारले जात नाही. मात्र जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिविचार सुत्री देणाऱ्या फ्रान्सच्या जनतेने एका गे व्यक्तीला पंतप्रधानपदी स्वीकारले आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इम्युनियल मॅक्रोन यांनी ३४ वर्षीय गॅब्रियल अटल यांची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. गॅब्रिएल अटल […]Read More