Month: January 2024

पर्यटन

या वर्षभरात सुरु होणार आणखी ६० ‘वंदे भारत’ एक्सप्रेस

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वेगवान आणि आरामदायी प्रवासासाठी लोकप्रिय ठरलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे देशवायसियांचा रेल्वेप्रवास सुलभ झाला आहे. ‘वंदे भारत’ एक्सप्रेस ट्रेननं भारतीय पर्यटनाला एक फ्रेश लुक दिला आहे. देशातील बहुतेक राज्यांना आतापर्यंत वंदे भारत गाड्या मिळाल्या आहेत. आता त्यात आणखी भर पडणार आहे. या वर्षी देशात ६० नवीन वंदे भारत ट्रेन […]Read More

देश विदेश

प्रज्ञानंद ठरला भारताचा सर्वोच्च रेटिंग असलेला बुद्धीबळपटू

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेत भारतीय ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदनने चमकदार कामगिरी केली आणि डिंग लिरेनचा पराभव केला. डिंग लिरेन हा सध्याचा विश्वविजेता आहे. चौथ्या फेरीत त्याला प्रज्ञानंदने पराभूत केले. या विजयासह प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला मागे टाकले असून तो नंबर वन भारतीय ग्रँड मास्टर बनला आहे. प्रज्ञानंदने गेल्या वर्षीही […]Read More

बिझनेस

आजपासून वाढल्या Maruti च्या सर्व Cars च्या किमती

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील ग्राहकांच्या सर्वांधिक पसंतीच्या Maruti Suzuki या ऑटोमोबाईल कंपनीने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणारा निर्णय घेतला आहे. देशातील मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या सर्व मॉडेलच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. मारुती सुझुकीच्या सर्व वाहनांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. कंपनीच्या सर्व मॉडेलची […]Read More

देश विदेश

पाकवर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक, या देशाने नष्ट केला दहशतवाद्यांचा अड्डा

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतावर कुरघोडी करण्यात आघाडीवर असणाऱ्या पाकिस्तानला आता मुस्लिम राष्ट्र असलेल्या इराणने धडा शिकवला आहे. इराणने मंगळवारी (दि. १७) रात्री पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील सुन्नी दहशतवादी संघटना ‘जैश-अल-अदल’च्या तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला केला. इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA ने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे माहिती दिल्यानंतर काही वेळाने वृत्तसंस्थेने […]Read More

ट्रेण्डिंग

श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमा विरोधात उच्च न्यायालयात याचिका

अलाहाबाद, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील रामभक्तांना उत्सुकता लागून राहिलेल्या अयोध्येतील मंदिरात श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना समारंभ मंगळवारी (दि. १७) सुरू झाला आहे. हे धार्मिक विधी रामलल्लाची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना होईपर्यंत सुरू राहतील.धार्मिक अनुष्ठान सुरू झाले आहेत व हे २२ जानेवारीपर्यंत सुरू राहतील. ११ पुजारी सर्व देवी-देवतांना आवाहन करत अनुष्ठान करत आहेत. या […]Read More

विदर्भ

डॉ. विपीन इटनकर यांना निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार

नागपूर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत निवडणूक आयोगाकडून आज निवडणुकीच्या सुधारणा संदर्भात जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांना ‘बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड 2023 ‘ ने सन्मानित करण्यात आले आहे. निवडणुकांमध्ये मतदार संख्या वाढविण्यासाठी डॉ. विपिन इटनकर यांनी मिशन युवा अभियान राबविले होते. या अभियाना अंतर्गत त्यांनी 15 जुलै 2023 […]Read More

राजकीय

भाजपाला पराभव दिसू लागल्याने दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रलोभने

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाची परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून राज्यातून आणि केंद्रातूनही सत्तेच्या बाहेर जाण्याची वेळ आली आहे. १० वर्षात केवळ घोषणाबाजी, जाहिरात बाजी, खोटेपणा करून सत्ता चालवली. जनतेला आता भाजपाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे दिसले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे ४० पेक्षा जास्त खासदार […]Read More

राजकीय

प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींचे निमंत्रणस्वीकारले

मुंबई दि. १७ (एम एमसी न्यूज नेटवर्क) : राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या “भारत जोडो न्याय” यात्रेला मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिले आहे. ॲड. आंबेडकरांनी हे निमंत्रण नाकारले का ? तर नाही मात्र, त्यांनी सशर्त हे निमंत्रण स्वीकारले आहे. या संदर्भात वंचित […]Read More

राजकीय

बुद्धविहार परिसर स्वच्छतेची मोहीम वस्तीवस्तीत राबवावी

मुंबई दि. १७ (एम एमसी न्यूज नेटवर्क): रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज बांद्रा पूर्व शास्त्रीनगर येथील कुशीनारा बुद्ध विहार परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. स्वतः हाती झाडू घेऊन ना.रामदास आठवले यांनी कुशीनारा बुद्धविहार परिसर स्वच्छ केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ तीर्थ मोहीम अभियान नुसार ना.रामदास आठवले यांनी राज्यभर […]Read More

महानगर

प्रा. मधु दंडवते जन्मशताब्दी समारोह २१ जानेवारी रोजी मुंबईत

मुंबई दि.१७ (एम एमसी न्यूज नेटवर्क) : प्रा. मधु दंडवते यांचा जन्मशताब्दी समारोह समारंभ रविवार 21 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे.या समारोहाचे अध्यक्षस्थानी स्वातंत्र्य सेनानी डॉ. जी .जी. परिख उपस्थित राहणार आहेत. प्रा.मधु दंडवते यांच्या समवेत केंद्रीय पातळीवर ज्यांनी काम केले, लोकसभेत वैचारिक भुमिका विशद […]Read More