मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : घराचे दार न लावता स्नेहसंमेलन बघण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरातून चोरट्यांनी बॅगमध्ये ठेवलेले सोने-चांदीचे दागिने व रोख असा एकूण एक लाख ३१ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत अंगूरबगिचा वॉर्ड क्रमांक दाेनमध्ये शुक्रवारी (दि. ५) भरदिवसा दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजता दरम्यान ही घटना घडली. […]Read More
नवी दिल्ली, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केलाय. त्यानंतर ठाकरे गट त्यांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात गेलं आहे. या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने आज ठाकरे गटाच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर या प्रकरणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. […]Read More
अयोध्या, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शतकांची प्रतीक्षा, श्रीरामभक्तांनी केलेल्या अतुलनीय त्याग आणि प्रखर संघर्षानंतर आज श्रीरामनगरी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तींची वेदमंत्रांच्या घोषामध्ये विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. देशातील आणि परदेशांतील करोडो रामभक्तांनी अतिशय हर्षोल्हासित अंतःकरणाने हा अभूतपूर्व असा सोहळा टिव्ही स्क्रीनसमोर बसुन अनुभवला. न भूतो न भविष्यती अशा अभूतपूर्ण सोहळ्यात प्रभू श्रीरामाची अयोध्येतील भव्यदिव्य […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिर प्रतिष्ठापना समारोहाचे औचित्य साधून महाराष्ट्र राजभवन येथील गुंडी देवी मंदिर परिसरात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना करण्यात आली. राज्यपाल बैस यांनी पत्नी रामबाई बैस यांचेसह प्रभू रामाची आरती केली आणि उपस्थितांसह नामगजरात भाग घेतला. राजभवनातील श्रीगुंडी देवी […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरात राज्य मागासवर्ग आयोगाकडून कऱण्यात येत असलेल्या मराठा आणि खुल्या प्रवर्गासाठी मिशन सर्वेक्षण मोहिमेस प्रत्यक्षात उद्या (दि. २३ फेब्रुवारी) पासून सुरुवात होत आहे. यासाठी संपूर्ण महसूल यंत्रणा सज्ज आहे. याबाबत विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्याप्रमाणे सर्व यंत्रणांनी या कामाला सर्वोच्च प्राधान्य […]Read More
ठाणे, दि. २२ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येत प्रभू श्रीरामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने एकच जल्लोष केला. ठाण्यातील श्री कौपीनेश्वर मंदिरात हा सोहळा लाईव्ह पाहून झाल्यावर त्यांनी जय श्रीरामचा एकच जयघोष केला. त्यानंतर ढोल वाजवून त्यांनी शिवसैनिकांच्या सोबत आपला आनंद साजरा केला. ML/KA/SL […]Read More
डोंबिवली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) देशातील करोडो हिंदू बांधवांचे आराध्य दैवत असलेले प्रभू श्रीराम अयोध्येतील आपल्या भव्य मंदिरात विराजमान होत असल्याचे औचित्य साधून कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवलीतील संत श्री सावळाराम महाराज क्रिडा संकुलात १ लाख ११ हजार १११ अधिक दिव्यांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची दिव्य आणि तेजस्वी अशी प्रतिकृती साकारण्यात […]Read More
नागपूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असताना कोराडी येथील श्रीजगदंबा देवस्थानमध्ये प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर भव्यदिव्य अशा जय हनुमान कढईमध्ये ६ हजार किलोचा ‘श्रीराम शिरा’ तयार करीत आहेत. हा एक विश्वविक्रम ठरणार असून तो विष्णू मनोहर श्री जगदंबा संस्थान कोराडीच्या नावे समर्पित करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर […]Read More
सोलापूर दि २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राम रंगी रंगले मन…, विश्वरंगी रंगले… अयोध्या येथे रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज होत आहे. या निमित्ताने पंढरपूरचा सावळाराम अर्थात विठ्ठलाचे मंदिर हे आकर्षक झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले. संपूर्ण मंदिर हे भगवामय आणि राममय झालेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नामदेव पायरी येथे राम लक्ष्मण सीताच्या फुलांमधील आकर्षक प्रतिमा […]Read More
चंद्रपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात वन विभागाच्या जटायू ( गिधाड) संवर्धन प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. चंद्रपूरच्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या बोटेझरी येथे हरियाणा येथून आणलेल्या दहा गिधाडांना निसर्गमुक्त केले गेले. एका मोठ्या पिंजऱ्यात या दहा गिधाडांना इथल्या हवामानाचा सराव होण्यासाठी सध्या मोठ्या पिंजऱ्यात सोडले. राज्यात गिधाडांची संख्या चिंताजनकरित्या घटल्याने एकूण निसर्ग साखळीतील […]Read More