Month: January 2024

ट्रेण्डिंग

अयोध्या नगरीला आधुनिक रूप देण्याची जबाबदारी या प्रसिद्ध टाऊन प्लॅनरवर

अयोध्या, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शरयु तीरावरी अयोध्या, मनु निर्मितनगरी, असे वर्णन गीत रामायणामध्ये ग.दि. माडगुळकर यांनी केले आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या अयोध्या नगरीचे भाग्य आता उजळले असून श्रीराम प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठेनंतर आता या शहराला जागतिक नकाशावर पुन्हा एकदा मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. देशाच्या सांस्कृतिक संचिताचे प्रतिक असलेल्या अयोध्या नगरीला आता […]Read More

महानगर

रोहित पवारांची ईडी कडून कसून चौकशी

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार चौकशीसाठी आज ईडी कार्यालयात दाखल झाले त्यांची सुमारे नऊ तासाहून अधिक काळ कसून चौकशी करण्यात आली. रोहित पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानभवनात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यानंतर रोहित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात येत शरद पवार आशीर्वाद […]Read More

पर्यावरण

नामीबियाहून आलेल्या ज्वाला चित्ताने 3 बछड्यांना दिला जन्म

 मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातील चित्त्यांचे कुटुंब वाढू लागले आहे. ज्वाला या चित्ता मादीने तीन पिल्लांना जन्म दिला आहे. कुनो नॅशनल पार्क मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्तांच्या वाढत्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त होत होती. 16 जानेवारीला याच पार्कमध्ये ‘शौर्य’ चित्त्याचे निधन झाले होते. मात्र आता ज्वाला या चित्ता मादीने तीन पिलांना जन्म दिला असून आता […]Read More

महानगर

सुरतमध्ये स्थलांतरित झालेले हिरे व्यापारी करत आहेत घरवापसी

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातकडे वळवले जात असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १७ डिसेंबरला सुरत डायमंड बोर्स इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. हा पंतत्पधानांचा ड्रिम प्रोजेक्ट असल्याचे मानले जाते. यानंतर मुंबईतील १०० हून अधिक हिरे व्यापाऱ्यांनी सुरतमध्ये स्थलांतर केल्याची माहिती समोर आल्याने […]Read More

क्रीडा

महिला क्रिकेट प्रीमियर लीगचं वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या दुसऱ्या सीझनचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धेची सुरुवात २३ फेब्रुवारीपासून बेंगळुरू येथून होणार आहे. WPL चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार असून हा सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. गेल्या मोसमातील विजेतेपदाचा सामना या दोन्ही संघांमध्ये झाला होता. […]Read More

देश विदेश

सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही उभारण्यात येणार मतदान केंद्रे

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये मतदारांची संख्या वाढावी यासाठी आता निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरी मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता शहरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्येदेखील मतदान केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. ज्या गृहनिर्माण सोसायटीत मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत, […]Read More

सांस्कृतिक

श्रीराम मंदिर सर्वसामान्यांसाठी आजपासून खुले , उसळला जनसागर

अयोध्या, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येमध्ये काल पार पडलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या भव्य सोहळ्यानंतर आजपासून सर्वसामान्यांसाठीही राममंदिराचे दरवाजे खुले झाले आहेत. आज पहिल्याच दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी केल्याने प्रशासनावरील ताण वाढला आहे. आज अडीच ते तीन लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचे उत्तर प्रदेश सरकारचे म्हणणे आहे. सर्व व्यवस्था नियंत्रणात असून यासाठी आठ हजारांहून अधिक […]Read More

Uncategorized

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने देशभरात 1.25 लाख कोटींची उलाढाल

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल अयोध्येत संपन्न झालेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे देशभर उत्साहाची लाट उसळली होती. देशभरात या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.देशभरात हर्षोल्हास निर्माण करणाऱ्या या अभूतपूर्व घटनेमुळे बाजारपेठेलाही झळाळी प्राप्त झाली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने वर्तवलेल्या अंदाजानुसार अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमामुळे देशात […]Read More

राजकीय

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करू न देण्याचा शिवसेना (ऊबाठा) चा इशारा

नाशिक, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करून दिली जाणार नाही या बरोबरच मराठा आणि धनगर समाजाला ओबीसी मधून आरक्षण न देण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या (उबाठा) अधिवेशनात मंजूर करण्यात आला. नाशिकमध्ये हॉटेल डेमोक्रेसी येथे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन आज झाले. सकाळी राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, सुषमा […]Read More

क्रीडा

‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारां’ साठी वगळलेल्या खेळांचा पुन्हा समावेश

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता पात्र क्रीडाप्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींग आणि इक्वेस्टेरियन या सात क्रीडाप्रकारांना पुन्हा शिवछत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरवण्यात यावे तसेच जिम्नॅस्टिकमधील उपप्रकार असलेल्या एरोबिक्स तसेच ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीत नव्याने सामावेश करावा, असे निर्देश […]Read More