Month: December 2023

राजकीय

मोदींची हुकूमशाही रोखायला एकत्र या!

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज महाविकास आघाडीतील नेत्यांना पत्र पाठवले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जून खरगे यांना त्यांनी पत्र पाठवल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितले. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या ३ घटक पक्षांमधील जागा वाटपाबाबत महाराष्ट्रात वेगवेगळे अंदाज […]Read More

राजकीय

लोकशाहीची थट्टा करणाऱ्या मोदी आणि भाजपाला धडा शिकवा

नागपूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात सध्या लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. केंद्रातील ३२ लाख सरकारी पदे रिक्त असतानाही मोदी सरकार नोकर भरती करत नाही, मागासवर्गीयांना संधी मिळेल म्हणून मोदी सरकार नोकर भरती करत नाहीत. मोदींना जगभर फिरण्यास वेळ आहे पण संसदेचे अधिवेशन सुरु असताना संसदेत येण्यास वेळ […]Read More

राजकीय

विदर्भातील ४७ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भातील ४७ सिंचन प्रकल्पांना आज १८ हजार ३९९ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांच्या माध्यमातून विदर्भातील एकूण २ लाख २३ हजार ४७४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक […]Read More

सांस्कृतिक

अयोध्येत होणार पंतप्रधान मोदींचा रोड- शो

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीरामनगरी अयोध्येमध्ये सध्या श्री राम मंदिरात श्रीरामाची प्रतिष्ठापना सोहळ्याची लगबग सुरु आहे. अयोध्येतील अवघे वातावरण राममय होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता.30) रोड शो करणार आहेत. त्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून आणि संघ परिवारातील संस्थांकडून जोरदार तयारी सुरू आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ आणि आयोध्या धाम रेल्वे […]Read More

ट्रेण्डिंग

भारतीय मुत्सुद्द्देगिरी यशस्वी, कतारने रद्द केली नौसैनिकांची फाशी

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमीर एच एच शेख तमीम बिन हमाद अल थानी यांची भेट घेतल्यानंतर कतारच्या अपील न्यायालयाने आठ निवृत्त भारतीय नौदल अधिकाऱ्यांना दिलेली फाशीची शिक्षा कमी केली आहे.कथित हेरगिरीच्या आरोपाखाली कतार तुरुंगात असलेल्या आठ भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. कतारच्या न्यायालयानं त्याच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती […]Read More

सांस्कृतिक

प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी गाभाऱ्यात फक्त या ५ व्यक्ती

अयोध्या, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. अयोध्येत या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी अयोध्या नगरीत सजावट करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून ६ हजारहून अधिक लोकांना आमंत्रण असले तरी मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी गाभाऱ्यात उपस्थित राहण्याचा मान फक्त ५ व्यक्तींना […]Read More

ट्रेण्डिंग

Zomato ला ४०१ कोटी रुपयांची GST नोटीस

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकप्रिय फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोला ४०१.७ कोटी रुपयांची वस्तू आणि सेवा कराची (GST) नोटीस मिळाली आहे.झोमॅटोने मात्र हा कर देण्यास नकार दिला आहे. कंपनीला ही नोटीस ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२२ या कालावधीत डिलिव्हरी चार्ज कलेक्शनवरील थकबाकी करासाठी देण्यात आली आहे. झोमॅटोला २६ डिसेंबर रोजी जीएसटी इंटेलिजेंस महासंचालक, […]Read More

ट्रेण्डिंग

युक्रेनमध्ये या कारणामुळे युद्धकाळातही फुलांचा बाजार तेजीत

किव, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक दिवसांपासून जागतिक अवकाशात चिंतेचे ढग घोंगावत आहेत.रशियाच्या तुलनेत आकारमानाने आणि सर्वांर्थानेच लहान असलेल्या युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला यामुळे खूप धोका पोहोचला आहे. मात्र या युद्धग्रस्त स्थितीतही युक्रेनमधील फुल बाजार तेजीत आहे. याला कारण आहे ते युक्रेनियन संस्कृतीत फुलांना नेहमीच असलेले विशेष स्थान. रशिया-युक्रेन युद्धात फुलांचे महत्त्व आणि […]Read More

बिझनेस

आंतरराष्ट्रीय बाजारात केशराची टंचाई

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मसाल्यांच्या बाजारपेठेतील सर्वांधिक महागडा पदार्थ म्हणजे केशर. तिखट बिर्याणी ते गोड खिरीपर्यंत पदार्थांची रंगत वाढवणाऱ्या केशराचे भाव नेहमीच चढे असतात. मात्र आता या केशराच्या भावामध्ये अजूनच वाढ झाली आहे. त्याला कारणीभूत आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या जाणवत असलेला केशराचा तुटवडा. इराणमध्ये (Iran) यंदा केशराचे कमी उत्पादन हे त्याचे […]Read More

महानगर

ठाण्यात ईमेलद्वारे ज्यू धर्मास्थळी बॉम्बची अफवा.

ठाणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्यातील सिनेगॉग चौकात असलेल्या ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळात आज बॉम्ब ठेवल्याची माहिती पोलिसांना अज्ञात मेलवरद्वारे देण्यात आली. त्यामुळे पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. बॉम्बशोधक नाशक पथक दाखल झाले ठाणे पोलिसांनी सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते.ठाणे पोलिसांनी शोध कार्य सुरू केले, घटनास्थळी पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त तैनातकरण्यात आला होता. बॉम्ब […]Read More