आंतरराष्ट्रीय बाजारात केशराची टंचाई

 आंतरराष्ट्रीय बाजारात केशराची टंचाई

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मसाल्यांच्या बाजारपेठेतील सर्वांधिक महागडा पदार्थ म्हणजे केशर. तिखट बिर्याणी ते गोड खिरीपर्यंत पदार्थांची रंगत वाढवणाऱ्या केशराचे भाव नेहमीच चढे असतात. मात्र आता या केशराच्या भावामध्ये अजूनच वाढ झाली आहे. त्याला कारणीभूत आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या जाणवत असलेला केशराचा तुटवडा. इराणमध्ये (Iran) यंदा केशराचे कमी उत्पादन हे त्याचे प्रमुख कारण आहे.

जगाच्या 90 टक्के भागाला फक्त इराणमधून केशराचा पुरवठा होतो. एका अहवालानुसार इराणमध्ये केशराचे उत्पादन निम्म्याहून अधिक घटले आहे. अशा स्थितीत देशांतर्गत बाजारात याच्या किमती प्रचंड वाढू लागल्या आहेत. भारतातील तणावही वाढू लागला आहे.

एका अहवालानुसार, इराण, केशरचा जगातील सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. इराणमधून मौल्यवान मसाल्याचा पुरवठा देखील होतो. त्याचा सुगंध, चव आणि रंगासाठी ओळखला जातो. 2022 च्या तुलनेत यावर्षी इराणमध्ये केशरचे उत्पादन कमी झाल्याचे अहवालात सांगण्यात आलं आहे. जगभरात 90 टक्के केशरचा पुरवठा हा इराणमधून केला जातो. त्यामुळं उत्पादन कमी झाल्यास केशरच्या किंमती वाढू शकतात.

बदलत्या हवामानाचा फटका केशर शेतकऱ्यांना मोठा बसला आहे. मागील वर्षामध्ये हिवाळ्यात खूप कमी तापमान होते. परंतू, यावर्षी असामान्य उष्णतेमुळं पिकावर नकारात्मक परिणाम झाला आहे. सिंचनासाठी बांधलेल्या हजारो विहिरी कोरड्या पडल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. तज्ज्ञांनी हवामान बदलाची चिन्हे आणि ते पिकांसाठी किती नकारात्मक असू शकतात याचा इशाराही दिला आहे. इराणचे हवामानशास्त्रज्ञ मोहम्मद दरविश म्हणाले की, इराण इतर देशांपेक्षा अधिक असुरक्षित असू शकतो, विशेषत: शुष्क आणि अर्ध-रखरखीत प्रदेशात, जेथे केशर पिके वाढते आणि जेथे पाऊस कमी होत आहे आणि तापमान वाढत आहे.

भारत इराणकडूनही मोठ्या प्रमाणात केशर खरेदी करतो. देशांतर्गत बाजारातील किमती वाढल्याने भारतात येणाऱ्या केशरच्या किंमतींवरही परिणाम होणार आहे. याचाच अर्थ असा की, येत्या काळात देशात मसाल्यांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. जगाच्या 90 टक्के भागाला फक्त इराणमधून केशराचा पुरवठा होतो. एका अहवालानुसार इराणमध्ये केशराचे उत्पादन निम्म्याहून अधिक घटले आहे.

SL/KA/SL

28 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *