Month: December 2023

पर्यावरण

शिवमहापुराण कथेच्‍या आयोजनाच्‍या निमित्‍ताने जंगलात मानवी हस्‍तक्षेप वाढण्‍याची चिंता

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एकीकडे पोहरा-मालखेड अभयारण्‍याचा प्रस्‍ताव अडगळीत पडलेला असताना छत्रीतलाव ते भानखेड मार्गावर हनुमान गढी येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिवमहापुराण कथेच्‍या आयोजनाच्‍या निमित्‍ताने जंगलात मानवी हस्‍तक्षेप वाढण्‍याची चिंता वन्‍यजीव अभ्‍यासकांनी व्‍यक्‍त केली आहे. या कार्यक्रमाआधी परिसरातील वृक्ष विनापरवानगी कापून त्‍याची विल्‍हेवाट लावण्‍यात आल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आमदार रवी […]Read More

देश विदेश

लोकसभेतून १५ खासदारांचे निलंबन

नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सभागृहातील कामकाजात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत लोकसभेतील विरोधकांच्या १५ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. लोकसभेच्या कामकाजादरम्यान गदारोळ आणि गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या १५ खासदारांपैकी ५ खासदार हे कॉंग्रेसचे आहेत. काल दोन तरुणांनी संसदेत हुल्लडबाजी केल्याची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर संसदेच्या […]Read More

देश विदेश

चीनकडे पाठ फिरवत या देशाकडे वळले जगातील अब्जाधीश उद्योजक

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वस्त मनुष्यबळ आणि सरकारकडून पायाभूत सुविधांबाबत मिळणारे पाठबळ यांमुळे गेली काही वर्षे व्यवसाय करण्यासाठी परदेशी कंपन्या चीनमध्ये व्यवसाय उभारण्यास प्राधान्य देत होत्या. मात्र आता या कंपन्यांनी चीनकडे पाठ फिरवली आहे. जगभरातील अब्जाधीश आता व्यवसायासाठी चीनला प्राधान्य देत नसल्याचे दिसून येत आहे. अब्जाधीश उद्योजक व्यवसायासाठी UAE देश विशेषतः राजधानी […]Read More

विदर्भ

MPSC परीक्षांची कार्यपद्धती संरक्षित करण्यासाठी समिती स्थापना

नागपूर, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटी प्रकरणानंतर राज्य सरकारने आज महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनातील पदभरती करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षांची कार्यपद्धती संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तीन महिन्याच्या आत यासंदर्भातील अहवाल शासनास सादर करण्याच्या समितीला शासन निर्णयात सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सेवानिवृत्त अध्यक्ष […]Read More

ट्रेण्डिंग

ही आहेत २०२३ मध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मराठी गाणी

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठीमध्ये सध्या तरुणाईला आवडतील अशी अनेक गाणी निर्माण होत आहेत. त्यामुळे हिंदी गाण्यांकडे वळणारी तरुणाई पुन्हा मराठी गाण्यांकडे वळली आहे. Wynk हे भारतातील संगीतप्रेमींचे आवडते ॲप आहे. या म्‍युझिक स्‍ट्रीमिंग ॲपने नुकतेच ‘विंक रिवाइंड 2023 ची घोषणा केली आहे.यात त्यांनी 2023 या वर्षभरातले संगीत क्षेत्रातील अव्‍वल कलाकार, अल्‍बम्‍स […]Read More

ट्रेण्डिंग

श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात शाही ईदगाहच्या ASI सर्वेक्षणाला न्यायालयाची मंजुरी

अलाहाबाद, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणातील अलाहाबाद हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने शाही ईदगाह मशिदीच्या एएसआय सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. मथुरेतील श्री कृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह मशिदीच्या प्रकरणात वादग्रस्त जागेसंदर्भातील सर्वेक्षण वकील आयुक्तांमार्फत करण्याची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याला आज मंजुरी देण्यात आली आहे. न्यायाधीश […]Read More

विदर्भ

फोटोसाठी अध्यक्ष आणि मुख्यमंत्रीच नाहीत, पुन्हा झाला कार्यक्रम

नागपूर, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभेच्या नागपूरच्या शेवटच्या सत्रासाठी आलेल्या विद्यमान सदस्यांच्या एकत्रित फोटोसाठी खुद्द विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्रीच उपस्थित न राहिल्याने फोटो पुन्हा काढायची वेळ आल्याची नामुष्की आज ओढवली. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ जेमतेम दहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे, पुढील हिवाळी अधिवेशन नागपूरला असेल तेव्हा नवीन विधानसभा अस्तित्वात येईल , म्हणून आज सर्व […]Read More

महानगर

यंदाचा ‘जनकवी पी.सावळाराम स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना

ठाणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी. सावळाराम कला समिती, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १७ डिसेंबर रोजी सायंकाळी राम गणेश गडकरी रंगायतन येथे ‘जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार’ आणि ‘गंगा-जमुना’ पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यंदाचा ‘जनकवी पी. सावळाराम’ पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना तर ‘गंगा-जमुना’ पुरस्कार प्रसिद्ध […]Read More

राजकीय

राज्यातील पात्र शाळांना या महिन्याचा अखेरीस पर्यंत अनुदान

नागपूर, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिक्षणाचा दर्जा उंचावावा यासाठी राज्यातील कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता प्राप्त शाळांना टप्याटप्याने अनुदान देण्यात येत असून राज्यातील पात्र 596 कायम विनाअनुदानित शाळांना या महिन्याचा अखेरीस पर्यंत कोणत्याही परिस्थितीत अनुदान मंजूर करण्याची कारवाही केली जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत याबाबतच्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

केंद्रीय पथकाकडून दुष्काळी भागाची पाहणी…

सोलापूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी आणि शिंगोर्णी तर सांगोला तालुक्यातील आचकदाणी, महूद बुद्रुक या गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. प्रत्यक्ष शेत शिवारावर जाऊन केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रसंगी मका, ज्वारी, ऊस, डाळिंब अशा पिकांची देखील पाहणी केली. केंद्रीय फटका […]Read More