Month: November 2023

पर्यटन

इंडोनेशियाचे रामायण पाहण्याची मुंबईकरांना संधी

मुंबई दि ८– भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील राजनैतिक संबंधांना पुढील वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त इंडोनेशियाचे नाटयरूपी रामायण तसेच महाभारत यांचा समावेश असलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन केले जाणार असल्याची माहिती इंडोनेशियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एडी वर्दोयो यांनी आज दिली. त्यामुळे इंडोनेशियाचे रामायण महाभारत पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. एडी वर्दोयो […]Read More

Lifestyle

मसाला चाणा डाळ बनवा

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मसाला चना डाळ दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी केव्हाही बनवता येते. साधी डाळ ऐवजी मसाला चणा डाळ करून बघितली तर भाजीही लागणार नाही. चला जाणून घेऊया मसाला चना डाळ बनवण्याची सोपी रेसिपी.How to make Masala Chana Dal मसाला चना डाळ बनवण्यासाठी साहित्य चना डाळ – १ कप बारीक चिरलेला कांदा […]Read More

देश विदेश

कच्च्या तेलाच्या किमतीत घट, भारताला दिलासा

मुंबई,दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मु इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरु होऊन महिना झाला आहे. असे असतानाही कच्च्या तेलाच्या किंमतीने दोन महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली गेला आहे. कच्च्या तेलाचे मोठे आयातदार असलेल्या भारतासह त्या सर्व देशांना किंमती कमी झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला […]Read More

ट्रेण्डिंग

एलन मस्क भारताला देणार सॅटेलाइट इंटरनेट सेवा

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंकला लवकरच भारतात व्हॉइस आणि डेटा कम्युनिकेशन सेवा देण्यासाठी परवाना मिळण्याची शक्यता आहे. डेटा स्टोअरेज आणि ट्रान्सफर नॉर्म्सवर स्टारलिंककडून मिळालेल्या प्रतिसादावर भारत सरकार समाधानी असल्याचे ET अहवालात म्हटले आहे. स्टारलिंक ही SpaceX ची उपकंपनी आहे. परवाना मिळाल्यानंतर ती भारतातील व्यक्ती आणि संस्थांना उपग्रह ब्रॉडबँड, […]Read More

अर्थ

या सरकारी कंपनीकडून लाभांश जाहीर

नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया Power Grid Corporation of India या सार्वजनीक क्षेत्रातील कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 3.59 टक्क्यांनी वाढून 3,781.42 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 3,650.29 कोटी रुपयांचा नफा […]Read More

विज्ञान

खगोलप्रेमींसाठी पर्वणी, उद्या पहाटे पाहा चंद्र-शुक्र युती

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्यापासून दिवाळीला सुरुवात होत आहे. पृथ्वीवरील दिवाळी सोबतच उद्या खगोलप्रेमींना आकाश दिवाळीची पर्वणी पहायला मिळणार आहे. पूर्व क्षितिजावर चंद्र-शूक्र युतीची अपूर्व अनुभूती उद्या घेता येणार आहे. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी आणि आपल्या पृथ्वीला सर्वात जवळ असलेला शूक्र ग्रह पहाटे पूर्व क्षितिजावर अत्यंत ठळक स्वरूपात दर्शन देत असून ९ नोव्हेंबर […]Read More

ट्रेण्डिंग

तत्काळ नोकरी सोडा 4 लाख मिळवा, प्रसिद्ध कंपनीची अनोखी ऑफर

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही आंतरराष्ट्रीय कंपन्या कर्मचारी कपातीसाठी विविध युक्त्या करत आहेत.अ‍ॅमेझॉन कंपनी भारतातील सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. जगातील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने (Amazon) आपल्या कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. ऑन द स्पॉट नोकरी सोडा 4 लाख मिळवा अशी ही ऑफर आहे. अ‍ॅमेझॉन कंपनीने […]Read More

ऍग्रो

या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आणि धान्याचे लिलाव बंद… 

नाशिक दि ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती काल पासून शनिवार, 18 नोव्हेंबर पर्यंत दीपावली आणि साप्ताहिक सुट्ट्यानिमित्त तब्बल बारा दिवस कांदा लिलाव तर नऊ दिवस धान्य लिलाव बंद  ठेवण्याचा निर्णय लासलगाव बाजार समितीने जाहीर केला आहे. लासलगाव मर्चन्टस् असोसिएशनने कांदा आणि धान्य विभागातील व्यापारी वर्गाचे पत्रानुसार […]Read More

राजकीय

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार अग्रिम पीक विम्याची रक्कम

मुंबई दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क : राज्यातील जवळपास सुमारे 35 लाख शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर गोड बातमी असून, राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. याचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे 35 लाख 08 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. या विमा रक्कमा संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक […]Read More

पर्यावरण

पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस

सांगली/ कोल्हापूर दि ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम महाराष्ट्रात आज सकाळी मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडला. यामुळे काढणीला आलेल्या अनेक पिकांचे नुकसान झाले असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सांगली जिल्ह्यात आज पहाटे पासून अवकाळी पाऊसाला सुरुवात झाली. कालपासूनच सांगली शहरात आणि जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण होते. आज पहाटेपासून मात्र पाऊस पडत आहे. […]Read More