एलन मस्क भारताला देणार सॅटेलाइट इंटरनेट सेवा

 एलन मस्क भारताला देणार सॅटेलाइट इंटरनेट सेवा

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंकला लवकरच भारतात व्हॉइस आणि डेटा कम्युनिकेशन सेवा देण्यासाठी परवाना मिळण्याची शक्यता आहे. डेटा स्टोअरेज आणि ट्रान्सफर नॉर्म्सवर स्टारलिंककडून मिळालेल्या प्रतिसादावर भारत सरकार समाधानी असल्याचे ET अहवालात म्हटले आहे.

स्टारलिंक ही SpaceX ची उपकंपनी आहे. परवाना मिळाल्यानंतर ती भारतातील व्यक्ती आणि संस्थांना उपग्रह ब्रॉडबँड, व्हॉइस आणि संदेश सेवा प्रदान करण्यास सक्षम असेल. मंजूर झाल्यास स्टारलिंक ही GMPCS परवाना प्राप्त करणारी तिसरी कंपनी असेल. स्टारलिंक सध्या 60 पेक्षा जास्त देशांमध्ये आपली सेवा प्रदान करते.

यापूर्वी भारती एअरटेल समर्थित कंपनी वनवेब आणि रिलायन्स जिओ यांना उपग्रह सेवा प्रदान करण्याचा परवाना मिळाला आहे. दुसरीकडे, जेफ बेझोस यांच्या कंपनी अमेझॉननेही दूरसंचार विभागाकडे परवान्यासाठी अर्ज केला आहे, मात्र सरकारने अद्याप त्यावर चर्चा केलेली नाही.

स्टारलिंकचे काम दुर्गम भागांना उपग्रहाद्वारे जलद इंटरनेटने जोडण्याचे आहे. यामध्ये, कंपनी एक किट प्रदान करते ज्यामध्ये राउटर, वीज पुरवठा, केबल आणि माउंटिंग ट्रायपॉडचा समावेश आहे. हाय-स्पीड इंटरनेटसाठी, डिश खुल्या आकाशाखाली ठेवली जाते. स्टारलिंकचे अॅप iOS आणि Android वर उपलब्ध आहे, जे सेटअपपासून मॉनिटरिंगपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेते.

SL/KA/SL

8 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *