ठाणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक प्रभाकर काळे उपस्थित होते. Greetings on the birth anniversary of Shaheed Birsa Munda ML/KA/PGB15 Nov 2023Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताचे पहिले भारतरत्न पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना जयंती निमित्त आज येथे विनम्र अभिवादन केले. तसेच पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या बालदिनाच्याही बालदोस्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी जयंती निमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र […]Read More
मांड्या, कर्नाटक, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभरात ग्रामीण भागात शेतकरी तरुणांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहराच्या ओढीमुळे आणि शेती व्यवसायातील अनिश्चिततेमुळे मुली ग्रामीण शेतकरी तरुणांशी लग्न करण्यास फारशा राजी नाहीत.त्यामुळे शेतकरी तरुणांची लग्न या काळातील मोठा सामाजिक प्रश्न होऊ पाहत आहे.असेच वधू संकट कर्नाटकच्या ग्रामीण भागात निर्माण झाले आहे. शेतकरी तरूणांना […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऐन दिवाळीत आर्थिक राजधानी महानगरी मुंबईचा श्वास प्रचंड वायू प्रदुषणामुळे घुसमटला आहे. मुंबई महानगर पालिकेने प्रदुषण कमी करण्यासाठी फटाके वाजवण्यावर निर्बंध घातले असूनही नागरिकांकडून नियम धुडकावले जात असल्याने शहरातील हवेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुंबई हायकोर्टाने यापूर्वी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई आणि परिसरातील महापालिका अधिकाऱ्यांना वायू प्रदूषण कमी […]Read More
नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभर दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात आहे.फराळ, फटाके, विविध फॅशनचे कपडे,आकाशकंदील, नवीन इल्क्ट्रॉनिक्स वस्तू यांच्या विक्रीमुळे बाजाराला चांगला उठाव आला आहे. यातच राजधानी दिल्लीमध्ये मद्यपींनी दारूची प्रचंड खरेदी करून गेल्या वर्षीचा आकडा ओलांडल्याची माहिती समोर आली आहे. राजधानी दिल्लीत २०२२ च्या तुलनेत यावर्षी दिवाळीच्या कालावधीत […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील २६ जिल्हा परिषदा, २८९ पंचायत समित्या आणि २५७ नगरपालिका व नगर पंचायतींच्या निवडणुकाही रखडलेल्या आहेत. ओबीसी आरक्षण, सदस्यसंख्या वाढ आणि प्रभागरचना ही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. परिणामी म्हणजे १ जानेवारी २०२४ रोजी सर्वच्या सर्व महानगरपालिकांमध्ये […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय ‘किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाभियान’ ‘कुसुम’ योजनेत राज्यांना ९ लाख ४६ हजार ४७१ सौरपंप बसविण्यासाठी मान्यता दिली आहे. देशात यापैकी एकूण २ लक्ष ७२ हजार ९१६ सौरपंप स्थापित झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त सौर कृषिपंप महाराष्ट्रामध्ये महाऊर्जामार्फत बसविण्यात आले आहेत. […]Read More
कोल्हापूर, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृषी उत्पन्न बाजार समितीत दीपावली पाडव्याच्या मुहूर्ताला दरवर्षी गुळाचे सौदे पार पडत असतात.आज हे गुळाचे सौदे सुरू झाले. यावेळी गुळाला ११ हजार रूपयांचा विक्रमी दर मिळाला. यावेळी गुळाला चांगला दर मिळाल्यानं गुळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. केंद्र सरकारकडून कोल्हापुरी गुळाला जीआय (जॉग्राफिकल इंडेक्स) मानांकन प्राप्त […]Read More
ठाणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार आज गडकरी रंगायतन येथे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, अभिनेते विजय गोखले, साहित्यिक डॉ. प्रदीप […]Read More
नागपूर, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरातील प्रसिद्ध असलेल्या श्री पोद्दारेश्वर राम मंदिरात अन्नकुट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळेला भगवंताला विविध प्रकारच्या अन्न पदार्थाचा नैवेद्य दाखविण्यात आलेला होता. आरती झाल्यानंतर भगवंताला नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसादाचे वितरण देखील करण्यात आले. ML/KA/SL 14 Nov. 2023Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                