Month: October 2023

खान्देश

येवल्यात झाली घोडे बाजाराला सुरूवात

नाशिक दि १८ (एम एमसी न्यूज नेटवर्क): गेल्या 350 वर्षांपासून नवरात्रीच्या काळामध्ये दसऱ्याच्या काळात येवला बाजार समितीच्या आवारात घोड्यांचा सर्वात मोठा बाजार भरत असून त्याला काल सुरूवात झाली. येवला शहरात 350 वर्षाची परंपरा असलेला घोडेबाजार हा मंगळवारी भरत असतो. येवल्याचे संस्थापक राजे रघुजीबाबा यांनी हा सतराव्या शतकापासून हा घोडे बाजार येवला शहारात भरवण्यास सुरुवात केली […]Read More

आरोग्य

‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पात सुमारे साठ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाच्या ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्पाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला. यात ६४,१९८ शाळांमधून ५९,३१,४१० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून समाज माध्यमांतून यासंदर्भातील १५ लाखांहून अधिक व्हीडिओ शेअर झाले आहेत. या अनुषंगाने सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्रभावी १०० शाळांचा लवकरच मुंबई येथे एका कार्यक्रमात सत्कार केला […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

उसाला ज्यादा दर देण्याच्या मागणीसाठी आक्रोश पदयात्रा

कोल्हापूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील वर्षी गाळप केलेल्या उसाला प्रति टन अतिरिक्त 400 रुपये दर देण्याची मागणी केली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आजपासून संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 22 दिवस, 522 किलोमीटर आक्रोश पदयात्रा करीत 37 साखर कारखान्यांच्या दारात जाऊन 400 रुपयांची मागणी करणार […]Read More

सांस्कृतिक

राष्ट्रपतींच्या हस्ते ६९ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली. दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आज पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. २४ ऑगस्टला पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडसह दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सहभागी झाले होते. […]Read More

राजकीय

विधानसभा अध्यक्षांना फटकारत न्यायालयाने दिली अखेरची संधी

नवी दिल्ली, दि.१७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांकडून चालढकल केली जात असल्याच्या विरोधातील याचिकांवर सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांना कठोर शब्दांत फटकारलं असून आता शेवटची संधी असं म्हणून ३० ऑक्टोबरला पुढील सुनावणीची तारीख दिली आहे.सुनावणी लवकरात लवकर करून निर्णय […]Read More

महानगर

समलैंगिक लग्नसंबंधाला मान्यता देण्याचा अधिकार कायदेमंडळाला

मुंबई, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण भाष्य केले आहे.अशा विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं आज आपली भूमिका स्पष्ट केली. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर थेट निर्णय देणं सर्वोच्च न्यायालयानं टाळलं.न्यायालयाने म्हटले आहे की, ‘आम्ही कायद्याचा अर्थ लावू […]Read More

राजकीय

येरवड्यातील जागेचा निर्णय शासनाचा , माझा संबंध नाही

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पुण्यातील येरवडा तुरुंगापरिसरात असणाऱ्या पोलिसांच्या जागेबाबतचा निर्णय शासनाने नेमलेल्या समितीने घेतला होता त्याच्याशी माझा संबंधच नाही असे स्पष्टीकरण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत दिले. ही जमीन आजही गृहखात्याच्या ताब्यात आहे त्यामुळे त्याबाबत चौकशी करण्याचे प्रयोजनच नाही असेही पवार यांनी सांगितले. या जागेबाबत सन २००८ साली शासनाने […]Read More

राजकीय

मनोज जरांगे उद्यापासून महाराष्ट्र दौऱ्यावर…

जालना, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उद्या पुण्यात शिवनेरी येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन मनोज जरांगेंच्या राज्यभरातील दौऱ्याला सुरुवात होणार आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांचे परवाच्या विराट सभेनंतर पुन्हा उद्या पासून दौरे,भेटीगाठी सुरू होणार असून हा गाठी भेटी दौरा आहे,ही सभा नसल्याची प्रतिक्रया जरांगे यांनी दिली आहे. आम्ही समाजाचा आशीर्वाद […]Read More

सांस्कृतिक

प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर

सांगली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सुप्रसिद्ध अभिनेते, नाट्यनिर्माते प्रशांत दामले यांना यंदाचा विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबरला रंगभूमी दिनी प्रशांत दामले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. गौरवपदक, रोख रक्कम 25 हजार, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ अस या पुरस्काराचे स्वरूप आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विध्यामंदिर समिती मार्फत गेली 55 वर्ष हा पुरस्कारदिला जातो. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर […]Read More

महानगर

राज्यात धनगरांची आरक्षण जागर यात्रा

कोल्हापूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  धनगर समाजाचे प्रमुख नेते आ गोपीचंद पडळकर यांच्या महाराष्ट्रभर चालू असलेल्या धनगर आरक्षण जागर यात्रेच्या निमित्तानं धनगर समाजाच्यावतीनं येत्या दिनांक १७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथं धनगर समाजाच्या वतीनं धनगर आरक्षण जागर मेळावा पार पडला .. महाराष्ट्रात धनगर जागर यात्रा सुरू झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र […]Read More