उसाला ज्यादा दर देण्याच्या मागणीसाठी आक्रोश पदयात्रा

 उसाला ज्यादा दर देण्याच्या मागणीसाठी आक्रोश पदयात्रा

कोल्हापूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील वर्षी गाळप केलेल्या उसाला प्रति टन अतिरिक्त 400 रुपये दर देण्याची मागणी केली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आजपासून संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 22 दिवस, 522 किलोमीटर आक्रोश पदयात्रा करीत 37 साखर कारखान्यांच्या दारात जाऊन 400 रुपयांची मागणी करणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील
शिरोळ इथल्या दत्त साखर कारखान्यापासून आज सकाळी आठ वाजता आक्रोश पदयात्रेला प्रारंभ झाला. ऊसाचा दुसरा हप्ता प्रतिटन 400 रुपये तसंच साखर कारखान्यांचे वजन काटे डिजिटल केल्याशिवाय ऊस गाळपास परवानगी देऊ नये, या मागणीसाठी ही पदयात्रा काढण्यात आली आहे.

ही पदयात्रा गुरूदत्त, जवाहर, घोरपडे, शाहू, वारणा, क्रांती, वसंतदादा, राजारामबापू, आदी 37 साखर कारखान्यांवर 22 दिवस 522 किलोमीटर इतकी निघेल . आक्रोश पदयात्रेचा समारोप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22 वी ऊस परिषद 7 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे. 7 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत ही पदयात्रा सामील होणार आहे.

जोपर्यंत 400 रुपयांचा दुसरा हप्ता दिला जात नाही, तोपर्यंत एकाही साखर कारखान्याची ऊस तोड सुरू होणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना दिला Protest march to demand higher price of sugarcaneसाखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा आहे आणि त्यांनी तो दिलाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आता माघार नाही, असा पवित्रा राजू शेट्टी यांनी घेतला आहे.

मागील वर्षी 522 किलोमीटर परिसरात येणाऱ्या 37 साखर कारखान्यांनी तब्बल 3 कोटी टन उसाचं गाळप केलं आहे. म्हणजेच त्यांच्याकडून 1200 कोटी रुपये येणे आहेत. ते 1200 कोटी रुपये आले तर ते 15 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात जाणार आहेत आणि ते पैसे नाही आले तर ते केवळ 37 कुटुंबातच पैसे राहणार आहेत, असं राजू शेट्टी यांचे म्हणणं आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी केवळ एफआरपीच दिली आहे.
पुणे, अहमदनगर जिल्ह्यात 8 साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा 400 ते 500 रुपये अधिक दिले आहेत. दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची रिकव्हरी पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त आहे, तरीही दुसरा हप्ता देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

ML/KA/PGB 17 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *