Month: September 2023

खान्देश

बस आणि कार अपघातात चार जण ठार

नाशिक, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील करंजाळी येथे काल सायंकाळी एसटी बस आणि कार यांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, दोन जण गंभीर जखमींना नाशिक येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.Four killed […]Read More

अर्थ

बाजार (Stock Market) विक्रमी उच्चांकाच्या जवळ

मुंबई, दि. 9 (जितेश सावंत): सकारात्मक देशांतर्गत मॅक्रो डेटा, देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून सततची खरेदी आणि आगामी बैठकीत यूएस फेडरल रिझर्व्हकडून दर विराम देण्‍याची आशा यामुळे भारतीय बाजाराने सलग दुस-या आठवड्यात मजबूत वाढ नोंदवली.मान्सूनची घट आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे निर्माण झालेल्या महागाईच्या चिंतेला गुंतवणूकदारानी या आठवड्यात स्वीकारल्याचे चित्र दिसले.शेवटच्या दिवशी निफ्टीने 19,800 ची महत्त्वपूर्ण पातळी पुन्हा गाठली […]Read More

राजकीय

माहिती लपवल्या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्दोष

नागपूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  निवडणूक शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप असलेले भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रथमश्रेणी न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. या प्रकरणाचा निकाल मंगळवार ५ सप्टेंबर रोजी लागणार होता. परंतू न्यायालयाने निकालाची तारीख ८ सप्टेंबर निश्चित केली होती. शपथपत्रात लपवलेले […]Read More

महानगर

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन एफआयआर हायकोर्टानं रद्द केले आहेत. त्यामुळं रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. High Court relief to IPS officer Rashmi Shuklaराज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना हे दोन्ही एफआयआर नोंदवण्यात आले होते. हे दोन्ही एफआयआर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार नोंदवण्यात आले होते. […]Read More

महाराष्ट्र

नाशिकमधील धरणे भरली, मराठवाड्याला पाणी मिळणार

नाशिक, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर आणि गंगापूर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने अहमदनगर आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पाण्याचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग आज 1 वाजता 300 क्यूसेक्स होता. दुपारी 3 वाजता 1314 क्यूसेक ने वाढवून एकूण 1614 क्यूसेक करण्यात आला. तर गंगापूर धरण विसर्ग […]Read More

Lifestyle

नाश्त्यासाठी चविष्ट पनीर पराठा बनवा

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जर तुम्हाला सकाळी लवकर ऑफिस किंवा शाळा-कॉलेजला जाण्याची घाई असेल आणि तुमच्या मुलांना नाश्ता देणे हे तुमच्यासाठी आव्हानात्मक काम असेल, तर तुम्ही नाश्त्यासाठी पनीर पराठा बनवू शकता. होय, अशा प्रकारे तुम्ही मुलांना सकाळी आरोग्यदायी आणि प्रथिनेयुक्त आहार देऊ शकाल, जेणेकरून त्यांना शाळा-कॉलेजमध्ये दिवसभर उर्जा मिळेल. तुम्ही पनीर पराठ्यासोबत चटणी, […]Read More

पर्यटन

लिटल ल्हासा

धर्मशाळा, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  धर्मशाळा आणि मॅक्लिओड गंज यांचा उल्लेख केल्यावर सुंदर दृश्ये आणि प्राचीन मठ या दोन गोष्टी पर्यटकांच्या मनात येतात. धौलाधर पर्वतरांगांच्या नजरेतून दिसणारे विचित्र हिल स्टेशन, धर्मशाळा हे परमपूज्य दलाई लामा यांचे निवासस्थान आहे. धर्मशाळेपासून 10 किमी अंतरावर असलेले मॅक्लॉड गंज तिबेटी लोकांच्या मोठ्या लोकसंख्येसाठी ‘लिटल ल्हासा’ म्हणून ओळखले जाते. […]Read More

कोकण

पोलादपूर महाबळेश्वर मार्गवर दरड कोसळली.

अलिबाग, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील कुंभळवणे गावाजवळ दरड कोसळली त्यामुळे वाहतूक एकेरी मार्गाने सुरू आहे. काही काळ विश्रांती घेतल्या नंतर पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानंतर गेल्या २५ तासात पोलादपूर तालुक्यात ४१ मी मी पाऊस पडला आहे शुक्रवारी सकाळी पासून मुसळधार पाऊस सुरू झाला असून […]Read More

राजकीय

ठाणे जिल्ह्यात वीज वितरण व्यवस्था होणार बळकट

ठाणे, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण , सुधारित वितरण क्षेत्र आणि बळकटीकरण करणे यासाठी साडे चार हजार कोटींचा विशेष आराखडा तयार करण्यात आला असून येत्या पाच ही योजना पूर्ण करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय पंचायत राज खात्याचे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. ठाणे जिल्हाधिकारी […]Read More

राजकीय

भारत जोडोच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यभर काँग्रेसच्या पदयात्रा.

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त गुरुवारी ७ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षातर्फे पत्रकारपरिषदा, भारत जोडो पद यात्रा आणि सभांचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस नेत्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकारिषदा घेऊन महागाई वाढवून सर्वसामान्यांची लूट करणा-या मोदी सरकारची पोलखोल केली आणि त्यानंतर पदयात्रा काढून सभा घेतल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]Read More