नाशिक, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सलग पाच दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत. या सहा दिवसांमध्ये सुमारे ७ लाख क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची आवक ठप्प झाली आहे. या आवकेच्या रूपाने सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल खोळंबली आहे. दरम्यान उद्या पणनमंत्र्यांकडे होणाऱ्या बैठकीकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी जिल्ह्यातील […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑनलाईन व्यवहार वाढल्याने देशातील नागरिकांचे आर्थिक व्यवहार सुलभ झाले असले तरीही साबयर क्राईमने उच्चांक गाठला आहे.सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाईन व्यवहारातून हातोहात फसवणूक होऊन त्यांना लाखोंचा गंडा घातला जात आहे. याबाबत आयआयटी कानपूर यांनी केलेल्या अभ्यासातून धक्कादायक सत्य समोर आले आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांतील एकूण […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे.यामुळे भारत सरकार आता परदेशांतील खलिस्तानवाद्यांविरोधात कठोर पावले उचलत आहे. भारत सरकारने कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये उपस्थित असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे आणि त्यांचे ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया म्हणजेच OCI कार्ड रद्द करण्याचे आदेश दिले […]Read More
हांगझोऊ, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय नेमबाजांनी रविवारी महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकून आशियाई क्रीडा स्पर्धेत आपले खाते उघडले. मेहुली घोष, रमिता जिंदाल आणि आशी चोक्सी या त्रिकुटाने १८८६ गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. चीनने १८९६.६ गुणांसह सुवर्णपदक जिंकून नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केला. मेहुली आणि रमिता यांनी आठ नेमबाजांच्या अंतिम […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘वंदे भारत’ या अद्ययावत सुसज्ज ट्रेन्सचे जाळे आता देशभर विस्तारत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला आहे. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सर्व वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला. नव्याने लाँच झालेल्या वंदे भारत ट्रेन्समुळे अकरा राज्यांतील प्रवासाचा […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर शहरात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पाणी साठले आणि पूर परिस्थिती निर्माण झाली. नागपूरातील ही भयावह स्थिती सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट, गलथान आणि अनियंत्रित कारभाराचे पाप आहे. पुरामुळे शहरातील सुमारे दहा हजाराहून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवन उपयोगी साहित्य पुरात भिजले आहे. त्यामुळे या नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली […]Read More
बीड, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारलेले होती, यामुळे पिके देखील करपत चाललेली होती. मात्र काल सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली, बीड ,अंबाजोगाई, आष्टी, माजलगावसह अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही गावाचा संपर्क देखील तुटला आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. […]Read More
नवी मुंबई, दि, २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा प्रतिदिन 450 द.ल.लि. क्षमतेचा मोरबे धरण प्रकल्प संपूर्ण 100% भरला असून 88 मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी पार केल्याने आज 24 सप्टेंबर रोजी रात्री 1.30 वाजता सांडव्याचे दोन्ही दरवाजे 15 से.मी. उघडण्यात आलेले आहेत आणि त्यातून 675 क्युसेक इतका […]Read More
नागपूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले होते. झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलेले होते. रस्त्यांना नदीचे स्वरुप आलेले होते. घरात पाणी शिरल्यामुळे अन्न धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झालेली होती. रस्त्यावर चिखल साचलेला होता. अनेकांना रेस्क्यू करून वाचविण्यात आले. भयंकर अश्या प्रकारचा पूर काल नागपूरकरांनी अनुभवला. रस्ते […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई उपनगरात अंधेरीचा विघ्नहर्ता म्हणून ख्याती पावलेला बाळगोपाळ मित्र मंडळाचा गणेशोत्सव यंदा वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. कोव्हिडनंतर पर्यावरण पूरक उत्सवाची कास धरताना मंडळाने यंदा सुमारे २२ फुटांची कागदी गणेशमूर्ती स्थापन केली आहे. बाळगोपाळ मित्र मंडळ यावर्षी ४९ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. अंधेरीच्या पूर्व भागातील प्रकाशवाडी परिसरात त्यावेळी कामगारवर्ग […]Read More