नागपुरात साफसफाईच्या कामांना वेग

नागपूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले होते. झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलेले होते. रस्त्यांना नदीचे स्वरुप आलेले होते. घरात पाणी शिरल्यामुळे अन्न धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झालेली होती. रस्त्यावर चिखल साचलेला होता. अनेकांना रेस्क्यू करून वाचविण्यात आले. भयंकर अश्या प्रकारचा पूर काल नागपूरकरांनी अनुभवला.
रस्ते खरवडल्या गेले, रस्त्यावर चिखल साचलेला असून पाऊस कमी झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली असून रस्ता वरील गाळ काढण्यात येत असून साफसफाई करण्यात येत आहे. ज्या भागात विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे अश्या भागात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. ज्या भागात झाडे कोसळली होती त्या भागात पडलेली झाडे कापून रस्ता मोकळा करण्यात येत आहे. रस्त्याची साफसफाई करण्यात येत असून गाळ काढला जात आहे. नागरिकांना जाण्यायेण्या साठी रस्ता मोकळा करून देण्यात येत आहे.
ML/KA/SL
24 Sept. 2023