Month: August 2023

राजकीय

गौरी गणपती, दिवाळीसाठी देखील आनंदाचा शिधा

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील शिधापत्रिकाधारकाना गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल असा हा शिधा अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद तसेच अमरावती विभागातील […]Read More

करिअर

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 312 पदांसाठी रिक्त जागा

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL), भारत सरकारच्या महारत्न कंपन्यांपैकी एक, विविध विभागांमध्ये अभियंता, अधिकारी आणि सहाय्यक व्यवस्थापकाच्या 300 हून अधिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि केमिकल ट्रेडमधील अभियंता पदे तसेच इतर पदांची नियमित भरती करावयाची आहे. तथापि, माहिती प्रणाली (IS) अधिकारी पदांवर […]Read More

Lifestyle

हेल्दी आणि चविष्ट असे ओटमील कॅसरोल बनवा

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नाश्त्यात असे काही खाणे अनेकांना आवडते. जे हेल्दी आणि चविष्ट तर असतेच पण पोटही चांगले भरते. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही ओटमिल पुलावची सोपी रेसिपी करून पाहू शकता. चविष्ट असण्यासोबतच दलिया पुलावची ही रेसिपी पौष्टिकतेनेही परिपूर्ण आहे. यासोबतच ते खाल्ल्यानंतर अनेक तास पोट भरलेले राहते. ओटमील कॅसरोल बनवण्यासाठी साहित्यओटमील पुलाव […]Read More

राजकीय

बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेतून सर्व आदिवासी पाडे जोडले जाणार…

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हा प्रकल्प सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा असेल. एकंदर 6838 कि.मी. लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. आदिवासी गावे […]Read More

राजकीय

राज्यातून कॅसिनो कायदाच पूर्णतः हद्दपार

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्य शासनाने महाराष्ट्र कॅसिनोज (नियंत्रण आणि कर) अधिनियम, 1976 पारीत केला आहे. मात्र जवळपास 45 वर्षे होऊन गेली तरी देखील तो अंमलात येऊ शकलेला नाही. या अधिनियमाची अंमलबजावणी राज्यात करावयाची […]Read More

पर्यावरण

हेलियमच्या पाळणाघरात झाला हेलियम डे साजरा…

सिंधुदुर्ग, दि. १८ ()एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक हेलियम दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम डे साजरा करण्यात आला. 18 ऑगस्ट 1868 साली सूर्यग्रहणाच्या दिवशी विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागला होता. त्यामुळे विजयदुर्ग किल्ल्याला हेलियमचे पाळणाघर म्हणून देखील संबोधले जाते. सिंधुभूमी फाउंडेशन , सिंधुदुर्ग यांच्या वतीने मागील 15 वर्षे येथे हेलियम डे […]Read More

महानगर

सरकार आपल्या दारी, पण निवडणूक घ्यायला घाबरी

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या स्थगिती वरून हल्लाबोल करत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकार डरपोक असल्याची टीका केली आहे. काल रात्री अचानक ११ वाजता मुंबई विद्यापीठाचं पत्र निघालं, पुढील आदेशापर्यंत सिनेट निवडणुका स्थगित केल्या त्यामुळे हे सरकार पळपुटे आहे असेही ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. याआधी […]Read More

शिक्षण

या शाळेत आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना शंकर महादेवन देणार संगीत शिक्षण

डोंबिवली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निसर्गदत्त सुरेल गळा असुनही आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे संगिताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यापासून अनेक विद्यार्थी वंचित राहतात. काही सेवाभावी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना संगीत शिक्षण देण्याचे उपक्रम हाती घेतले जातात. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ या डोंबिवली येथील प्रतिथयश शिक्षण संस्थेकडून असाच एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. शिक्षण संस्था […]Read More

महानगर

या रुग्णालयात झाली कॅन्सरवरील प्रोटॉन थेरपीला सुरुवात

खारघर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॅन्सरवरील उपचारांतील अत्यंत महागडी समजली जाणारी प्रोटॉन थेरपी आता नवी मुंबईोतील खारघर येथील रुग्णालयात सवलतीच्या दरात उपलब्ध झाली आहे. १५ ऑगस्टपासून रुग्णांना ही थेरपी देण्यास सुरुवात झाली आहे. टाटा मेमोरियल सेंटर (TMC) च्या ACTREC खारघर केंद्रात प्रोटॉन थेरपीने उपचाराला सुरुवात झाली आहे. येथे कॅन्सर रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार […]Read More

विज्ञान

चांद्रयान मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा यशस्वी, ‘विक्रम’ लँडर झाले वेगळे

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्रोने चांद्रयान-३ मोहिमेबद्दलची एक आनंदाची बातमी समोर आली आहे. चांद्रयानमधील विक्रम लँडर प्रॉपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले आहे. गेल्या १ महिना ३ दिवसांपासून प्रॉपल्शन मॉड्यूलच्या पाठीवर विक्रम लँडर होता. चांद्रयान-३ चे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून १४ जुलै रोजी करण्यात आले होते, त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला […]Read More