सरकार आपल्या दारी, पण निवडणूक घ्यायला घाबरी

 सरकार आपल्या दारी, पण निवडणूक घ्यायला घाबरी

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या स्थगिती वरून हल्लाबोल करत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकार डरपोक असल्याची टीका केली आहे.

काल रात्री अचानक ११ वाजता मुंबई विद्यापीठाचं पत्र निघालं, पुढील आदेशापर्यंत सिनेट निवडणुका स्थगित केल्या त्यामुळे हे सरकार पळपुटे आहे असेही ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

याआधी सिनेटच्या १० पैकी ८ मग १० पैकी १० सीट आम्ही जिंकलो, आमचा विजय चांगल्या मताधिक्यानं होत होता.
रजिस्ट्रेशन सुरू झालं, निवडणुका जाहीर झाल्यानंतर ही स्थगिती आली, असं घडलं तरी काय? काही गडबड झालीय का? अशी शंका येत आहे असे ते म्हणाले.

मणिपूरसारखं वातावरण वगैरे नाही, कुठेही भांडणं मारामारी न होता, ही निवडणूक होत होती, हे सगळे पदवीधर होते.
अचानक काय घडलं? पत्रकात लिहिल्याप्रमाणे बैठक कुठे किती वाजता झाली हे कुणालाच माहीत नाही. पत्रातच त्याचा उल्लेख नाही.कुलगुरू ,
उप कुलगुरू फोन बंद करून बसलेत. निवडणूक होणार कधी? सव्वा लाख वोटर्सनं स्वतःच्या खिशातून पैसे दिलेत त्याचे काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बोगस मतदार कमी करून सव्वा लाखावरून ९५,००० वर आकडा आलाय.. मग आता ही भूमिका का?
घटनाबाह्य मुख्यमंत्री डरपोक आहेत, घाबरत होते म्हणून भाजपात उडी मारली, स्थानिक स्वराज्य निवडणुका होत नाही.. आता विद्यापीठाच्या पण निवडणुका थांबवल्या. कोण किती कोणासोबत हेही ज्यांना नाही माहीती, या दोन उपमुख्यमंत्र्यांचा काय उपयोग?

लोकसभा निवडणुकांचंही असंच होईल, पालिका प्रशासनच चालवतेय, पदवीधरांची सुशिक्षित मतदारांची चूक काय?
सिनेट तुमचं सरकार पाडणार नाहीय, तुमचं सरकार आम्ही पाडणार आहोत. सगळीकडे गेल्यावर्षी भाजपचा मिंधे गटाचा पराभव झालाय असा टोला आदित्य ठाकरे यांनी यावेळी हाणला.

ML/KA/SL

18 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *