Month: June 2023

महानगर

वर्षा ताईच्या नेतृत्वात मला काम करायला आवडेल- भाई जगताप

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):मुंबईत आधी भाई होते आता ताई आहेत आणि माझ्या बहिणीच्या नेतृत्वाखाली मला काम करायला आवडेल असे मत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना मांडले.मुंबई काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान वर्षाताई गायकवाड यांना मिळाल्याने मला मोठा आनंद झाला असून त्यांच्यानेतृत्वात आम्ही पूर्ण क्षमतेने […]Read More

अर्थ

भारतीय GDP चा उच्चांक, इंग्लंड, फ्रान्स, रशियाला टाकले मागे

नवी दिल्ली : जागतिक पातळीवर प्रगतीचे अनेक मार्ग चोखाळत भारतीय अर्थव्यवस्था आता GDP च्या बाबतीत जगातील पहिल्या पाच देशांमध्ये समाविष्ट झाली आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनानं अर्थात जीडीपीनं नवा विक्रम प्रस्थापित करत जीडीपी ३.७५ ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे. यामुळं जागतीक अर्थव्यवस्थेत भारताचा टक्का वाढत असल्याचं हे द्योतक आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट […]Read More

देश विदेश

भारतीय महिला हॉकी संघाने जिंकला ज्युनियर आशिया कप

टोकीओ, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस येणार असे चित्र सध्या दिसत आहे. भारतीय संघाने रविवारी ज्युनियर आशिया कप हॉकी स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला आहे. मुमताजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने फायनलमध्ये चार वेळच्या किताब विजेत्या दक्षिण कोरियाचा पराभव केला. भारताने २-१ अशा फरकाने रोमहर्षक विजयाची […]Read More

देश विदेश

WTC गमावल्यानंतर आता ICC ची भारतीय क्रिकेटपटूंवर कठोर कारवाई

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय क्रिकेट संघाला WTC च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून धक्कादायक पराभव सहन करावा लागला. भारतीय क्रिकेट चाहते टिम इंडियावर नाराज झाला आहेत. समाजमाध्यमांवरही क्रिकेटपटूंवर जोरदार टिका होत आहे. त्यातच आता ICC ने भारतीय क्रिकेट संघावर कठोर दंडात्मक कारवाई केली आहे. भारतीय खेळाडूंना १०० टक्के मानधनाची रक्कम दंडाच्या स्वरुपात द्यावी […]Read More

महिला

एक प्रतिष्ठित सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ…गगनदीप कांग

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गगनदीप कांग एक प्रतिष्ठित सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत आणि रॉयल सोसायटीच्या फेलो म्हणून निवडून आलेल्या पहिल्या भारतीय महिला आहेत. संसर्गजन्य रोगांच्या क्षेत्रात, विशेषत: रोटाव्हायरस आणि लसींच्या विकासावरील तिच्या महत्त्वपूर्ण संशोधनाचा भारतातील सार्वजनिक आरोग्यावर महत्त्वपूर्ण परिणाम झाला आहे. गगनदीप कांग यांच्या कार्याने केवळ वैज्ञानिक प्रगतीच नाही तर असंख्य जीव वाचविण्यात मदत केली आहे, […]Read More

महानगर

शरद पवार यांच्या विचारांचे निर्जंतुनिकरणं करण्यासाठी राज्यभर लसीकरण सभा

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शरद पवार यांच्या विचारांचे निर्जंतुनिकरणं करण्यासाठी राज्यभर लसीकरण सभा व बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.याची सुरुवात दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ फोडून व चैत्यभूमी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादनाने होणार आहे, अशी माहिती एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलचे अध्यक्ष डॉ.गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक […]Read More

खान्देश

समृद्धी महामार्गावर अपघातात चार ठार,

नाशिक, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यात मध्यरात्री इनोव्हा कारच्या भीषण अपघातात चार जण ठार झाले तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली. शिर्डी ते भरवीर हा सुमारे ८० किलोमीटर मार्गाचा दुसरा टप्पा सुरू नुकताच सुरू झाला असून गेल्या आठवड्यात याच महामार्गावर अपघातात तीन जण ठार झाले होते. […]Read More

राजकीय

वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नसल्याचा फडणवीसांचा दावा खोटा

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. वारकरी स्वतः पोलिसांनी केलेला अत्याचार सांगत आहेत परंतु राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र ते दिसत नाही. लाठीचार्जचे व्हीडीओ डिलीट करण्यासाठी आता सरकारकडून मीडियावर दबाव आणला जात आहे आणि दुसरीकडे लाठीहल्ला झालाच नाही, असे फडणवीस निर्लज्जपणे सांगत […]Read More

ऍग्रो

वसुलीबाज कृषी मंत्री सत्तारची हकालपट्टी करा…

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अकोल्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावाने कृषी विभागाने धाडी टाकून व्यावसायिकांकडून पैसे मागितल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या धाड पथकात कृषीमंत्री अब्दूल सत्तारांचा स्विय सहायक दिपक गवळी सह इतर अनेक खाजगी लोकांचा समावेश होता. तर आपल्याच सांगण्यावरून या धाडी टाकण्यात आल्या आहेत, त्यात चुकीचे काहीच झाले नाही असे कृषीमंत्री […]Read More

पर्यावरण

खवळलेल्या समुद्रात पर्यटकांची स्टंटबाजी…

सिंधुदुर्ग, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे खवळलेल्या मालवण समुद्रकिनारी पर्यटकांची धोकादायक स्टंटबाजी सुरू असल्याचे दिसून आले आहे. बिपर जॉय वादळामुळे अरबी समुद्राला उधाण आले आहे. मालवण समुद्र किनारी देखील मोठं मोठ्या लाटा उसळत असून 13 जून पर्यँत मालवण ते वसईच्या किनार पट्टी भागात 3.5 ते 5.1 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान […]Read More