Month: June 2023

विदर्भ

आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेच्या वतीने 76 विशेष रेल्वे

नागपूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोट्यवधी वारकऱ्यांच्या आस्थेचा विषय असलेल्या पंढरपूर वारीने मध्य रेल्वेलाही आकर्षित केले आहे. वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन व्हावे त्यांचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टीने यंदा मध्य रेल्वेतर्फे पंढरपूर आषाढी वारीसाठी तब्बल 76 रेल्वे गाड्या चालविण्याची तयारी मध्य रेल्वेने केली आहे. 76 special trains on behalf of Central Railway for Ashadhi […]Read More

अर्थ

बाजार(Stock Market) विक्रमी शिखराजवळ

मुंबई, दि. 17 (जितेश सावंत):  जागतिक बाजारातील सकारात्मकता, देशांतर्गत डेटा,मजबूत FII गुंतवणूक या जोरावर भारतीय बाजाराने आठवड्याचा शेवट विक्रमी उच्चांकी पातळीवर केला. यूएस फेडचे आणखी दोन दर वाढीचे संकेत,चीनमधील मंदावलेली वाढ आणि भारताची वाढती व्यापार तूट(भारताची व्यापार तूट 5 महिन्यांच्या उच्चांकावर) rising trade deficit.याकडे बाजाराने दुर्लक्ष केले.चांगल्या CPI, WPI आणि IIP डेटाने गुंतवणूकदारांचा आशावाद पल्लवित […]Read More

राजकीय

पाठ्यक्रमातून काढाल, पण लोकांच्या मनातून काढू शकत नाही

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):आमचे आदर्श स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार किंवा अन्य कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकांचे धडे तुम्ही पाठ्यक्रमातून काढू शकाल. पण, लोकांच्या मनातून त्यांना कधीही काढता येणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या कार्यक्रमानंतर मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते. कर्नाटक सरकारने काल […]Read More

देश विदेश

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटनस्पर्धेत भारताचे हे खेळाडू उपात्य फेरीत दाखल

जाकार्ता, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या अव्वल भारतीय पुरुष दुहेरी जोडीने शुक्रवारी जकार्ता येथे सुरू असलेल्या इंडोनेशिया ओपन 2023 पुरुष दुहेरी स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मोहम्मद रियान अर्दियान्टो आणि फजर अल्फियान या इंडोनेशियाच्या जोडीचा 21-13, 21-21 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. याशिवाय पुरुष एकेरीत एचएस […]Read More

कोकण

पाऊस लांबला,अवघ्या पंधरा टक्के क्षेत्रावर पेरणी

रत्नागिरी, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मृग नक्षत्र लागून आठवडा उलटून गेला तरी अद्याप मान्सूनचा पत्ता नाही. कोकणात काही ठिकाणा मान्सूनपूर्व पावसाच्या सरी झाल्या असल्या तरीही अद्याप मान्सूनची चाहूल नसल्याने भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरवर्षी ७ ते १० जून या कालावधीत बहुसंख्य शेतकरी भात पेरणीची कामे पूर्ण करतात. यंदा पावसामुळे पेरण्या रखडल्या […]Read More

विदर्भ

वणी जवळ सापडली विशालकाय डायनोसॉर ची जिवाष्मे

यवतमाळ, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील बोर्डा जवळ विरकुंड गावानजिक येथील भूशास्त्र संशोधक प्रा सुरेश चोपणे ह्यांना ६ कोटी वर्षापूर्वीच्या लेट क्रिटाशीयस काळातील विशालकाय डायनोसॉर प्राण्यांचे जीवाष्म सापडले आहेत.दोन वर्षांपूर्वी पायाचे एक अष्मीभूत हाड त्यांना सापडले होते. यवतमाळ जिल्ह्यातील डायनोसॉर जीवाष्म आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे. ते यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 20 […]Read More

ट्रेण्डिंग

गुजरातमध्ये थैमान घालून बिपरजॉय राजस्थानकडे रवाना

अहमदाबाद, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आठवडाभर अरबी समुद्रात घोंगावणारा बिपरजॉय वादळ काल सायंकाळी 6.30 वाजता गुजरातमधील जखाऊ किनारपट्टीवर धडकले. बिपरजॉय चक्रीवादळ जखाऊ किनारपट्टीला धडकल्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा प्रभाव कच्छ-सौराष्ट्र 8 जिल्ह्यांत राहिला. त्यातून मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे व खांब कोसळले. वादळामुळे भावनगरमध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर 22 […]Read More

ट्रेण्डिंग

UPSC च्या तयारीसाठी ५० हजारांचे आर्थिक सहाय्य

पुणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचा निकाल लागला असून उत्तीर्ण उमेदवार आता मुख्य परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी तर्फे राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२३ साठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे […]Read More

पर्यावरण

एनआयओ संस्थेच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वर्सोवा, चार बांगला येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी (NIO) द्वारे करण्यात आलेल्या अपूर्ण आणि चुकीच्या सागरी जैवविविधता अहवालाचा परिणाम म्हणून मच्छीमार आता नामशेष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील मच्छिमारांनी 12 जून रोजी सकाळी चार बंगला परिसरात असलेल्या संघटनेच्या कार्यालयाबाहेर ‘मच्छीमार जन-उद्रेक’ निदर्शने करून आपला असंतोष आणि संघटनेचा निषेध […]Read More

करिअर

भारतीय रेल्वेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय रेल्वेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. रेल्वेमध्ये 772 पदे रिक्त आहेत. ज्यासाठी 24 वर्षांपर्यंतचे 10वी उत्तीर्ण उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.in वर जाऊन 7 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. रेल्वेने जाहीर केलेल्या बंपर भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षा न घेता थेट 10वीच्या गुणांच्या आधारे केली […]Read More