Month: April 2023

देश विदेश

या देशात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन कावेरी

खार्तुम, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताने सुदानमधून आपल्या अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एक बचाव मोहीम – ऑपरेशन कावेरी – सुरू केली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचावकार्य सध्या सुरू असून, सोमवारपर्यंत सुमारे 500 भारतीय बंदर सुदानला पोहोचले आहेत.हिंसाचारग्रस्त आफ्रिकन देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने दोन C-130s विमाने आणि नौदलाचे जहाज […]Read More

अर्थ

पीएम केअर फंडात सार्वजनीक क्षेत्रातील कंपन्यांचे 2913 कोटींचे योगदान

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सार्वजनीक क्षेत्रातील म्हणजेच सरकारी कंपन्यांचे देशाच्या पायाभूत क्षेत्रामध्ये अनमोल असे योगदान आहे. पीएम केअर्स फंडाला लिस्टेड कंपन्यांनी दिलेल्या देणग्यांमध्ये सरकारी कंपन्यांचे योगदान मोठे आहे.राष्ट्रीय शेअर बाजारावर (एनएसई) सूचीबद्ध कंपन्यांवर नजर ठेवणारी फर्म प्राइमइन्फोबेस डॉट कॉमने केलेल्या डेटा विश्लेषणात, सरकारी कंपन्यांनी पीएम केअर्समध्ये सुमारे २,९१३.६ कोटी रुपयांचे योगदान दिले […]Read More

देश विदेश

देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

कोची, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधील कोची येथे भारतातील पहिल्या वॉटर मेट्रोचे लोकार्पण केले. या प्रकल्पाची किंमत 1,137 कोटी रुपये आहे. वॉटर मेट्रो कोची आणि आसपासच्या 10 बेटांना जोडेल. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने या बोटींची निर्मिती केली आहे. या प्रकल्पात 78 इलेक्ट्रिक बोटी आणि 38 टर्मिनल आहेत. यावेळी पंतप्रधान […]Read More

देश विदेश

हिंदुस्थान समर्थक पाकिस्तानी नागरिक तारिक फतेह यांचे निधन

टोरंटो, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॅनाडास्थित पाकिस्तानी वंशाचे ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार तारिक फतेह (७३) यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कँन्सरशी लढा देत होते. तारिक फतेह हे दशहतवाद आणि इस्लामाबद्दल परखड मत व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक वेळा पाकिस्तानाला खडेबोल सुनावले होते आणि भारतातील एनडीए सरकारचं समर्थन सुद्धा केलं […]Read More

महानगर

आता हवेतील प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेचा टास्क फोर्स

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ): मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकासकामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे हवेचा गुणवत्ता स्तर खालावत चालला आहे. प्रदूषणासाठी धूळ हाही एक घटक वारंवार कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे हवेचे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने धूळ नियंत्रण करण्यासाठी मुंबई महापालिकेने कृती दल अर्थात टास्क फोर्स नेमण्याचे ठरवले आहे . प्रत्येक विभागामध्ये तीन विषयांसाठी […]Read More

बिझनेस

दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका ;तात्काळ सर्वेक्षण स्थगित करा

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बारसू रिफायनरीसाठी होणारे सर्वेक्षण तात्काळ स्थगित करून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी व त्यावर मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका, अशी विनंती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्वीट करत सरकारला केली आहे. रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. त्या […]Read More

राजकीय

अत्याचार थांबवा आणि संवाद साधा

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बारसू येथे सुरु असणारी खोके सरकारची दडपशाही अतिशय दुर्दैवी आहे आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र गायब आहेत. निसर्गसंपन्न कोकण जपणाऱ्या भूमिपुत्रांवर हे रावणराज्य चालवणारे सरकार पोलीसांकडून वार करण्यास मागे पुढे पाहणार नाही असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे.. पहिल्यांदा हा […]Read More

पर्यावरण

नागपूरात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस

नागपूर, दि. २५ : नागपुरात आज पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, संपूर्ण नागपूरात दुपार नंतर सोसाट्याचा वाऱ्यासह आणि विजांचा कडकडाटात रिमझिम पाऊस पडला. वातावरणात अचानक बदल झाल्याने रस्त्यावरील नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत होते. हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात सायंकाळ पर्यंत रिमझिम पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला.नागपूरात आणखी […]Read More

महानगर

ईट राईट मिलेट मेळावा आणि वॉकथॉन

ठाणे , दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जगभरात साजरे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या अनुषंगाने भारतीय अन्न संरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारा (FSSAI) ठाणे महानगरपालिका, न्यूट्रिलाइट व Assocham यांच्या संयुक्त विद्यमाने गावदेवी मैदान, ठाणे येथे एकदिवसीय ईट राईट मिलेट मेळावा व वॉकेथॉन उपक्रमाचे २९ एप्रिल २०२३ रोजी आयोजन करण्यात येत आहे.प्राधिकरणाच्या इट राइट इंडियाच्या विविध उपक्रम […]Read More

ट्रेण्डिंग

महाराष्ट्र दिनी राज्यस्तरीय मोडी लिपी स्पर्धा

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक मोडी लिपी प्रसार समिती, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि शिवराज्याभिषेक समिती यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र दिनी १ मे २०२३ ला महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर या चार शहरांमध्ये एकाचवेळी आणि एकाच दिवशी सुंदर मोडी हस्ताक्षर स्पर्धा आणि मोडी लिप्यंतर स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. मोडी लिपीच्या प्रचारासाठी […]Read More