Month: March 2023

क्रीडा

डायनॅमिक जोडीने पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या डायनॅमिक दुहेरी जोडीने रविवारी स्विस ओपन सुपर सीरिज 300 बॅडमिंटन स्पर्धेत रेन झियांग्यू आणि टॅन कियांग यांचा पराभव करून पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या आणि सात्विकसाईराज आणि चिराग या दुसऱ्या मानांकित भारतीय जोडीने अंतिम फेरीत त्यांच्या बिगरमानांकित चीनच्या प्रतिस्पर्ध्यांचा २१-१९, […]Read More

राजकीय

मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘सत्याग्रह’

मुंबई , दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राहुल गांधी यांनी अदानी उद्योगसमुहातील महाघोटाळा उघड केल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारची जगभर नाच्चकी झाली आहे. अदानीच्या कंपनीत वीस हजार कोटी रुपयांचा काळा पैसा आला तो कोणाचा आहे याची चौकशी करण्याची मागणी करत राहुल गांधींनी अदानी-मोदींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्यामुळेच राजकीय आकसातून त्यांच्यावर कारवाई केली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]Read More

राजकीय

राष्ट्रवादी पुन्हा.. वारे परिवर्तनाचे… ध्यास प्रगतीचा…या टॅगलाईनखाली राष्ट्रवादीच्या दौर्‍याची सुरुवात…

नंदुरबार, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आजपासून “राष्ट्रवादी पुन्हा… वारे परिवर्तनाचे… ध्यास प्रगतीचा…” या दौऱ्याला सुरुवात केली. राज्यात परिवर्तनाच्या लढाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. चार दिवसाच्या या दौऱ्यात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातील पक्षाच्या […]Read More

Uncategorized

जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब नदीवरील पुलाची पाहणी

जम्मू , दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब नदीवरील पुलाची पाहणी केली, जो या वर्षाच्या अखेरीस रेल्वे वाहतुकीसाठी कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. याप्रसंगी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये केंद्रीय मंत्री ट्रॉलीवर बसलेले असताना व्यासपीठावरील लोक झेंडे फडकवताना दिसले. ML/KA/PGB 26 Mar 2023Read More

पश्चिम महाराष्ट्र

कथक नृत्याद्वारे मांडला ‘अनादी-अनंत, श्री गणेशाचा’ महिमा

पुणे , दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तबला, मृदंग, बासरी, पेटीच्या सुश्राव्य ध्वनी सह गणरायाची स्तुती करणा-या शब्दसुमनांच्या साथीने नृत्यांगनांनी कथक मधून गणरायाला नमन केले. महाराष्ट्रातील अष्टविनायक क्षेत्रांचे महत्व आणि पौराणिक कथांचे नृत्याद्वारे सादरीकरण करून अनादी अनंत असलेल्या ओंकार स्वरूपी गणरायाची महती पुणेकरांसमोर सादर झाली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

मेट्रो लवकरच रुबी हॉल स्थानकापर्यंत

पुणे , दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मंगळवार पेठ (RTO), पुणे रेल्वे स्थानक ही ठिकाणे लवकरच मेट्रोद्वारे जोडली जाणार आहेत.पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही मार्गिका २०२२ मध्ये प्रवाशांसाठी सुरू केल्यानंतर आता लवकरच फुगेवाडी स्थानक- सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक – सिव्हिल कोर्ट इंटरचेंज […]Read More

पर्यटन

कोडाईकनालमध्ये भेट देण्याची ठिकाणे

कोडाईकनाल, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  प्रिन्सेस ऑफ हिल्स म्हणून संदर्भित, कोडाईकनाल हे निसर्गरम्य दृश्यांसह आणखी एक दक्षिणेचे आकर्षण आहे जे तुम्हाला अधिकसाठी परत येण्यास मदत करेल. हे हिल स्टेशन देखील हनिमूनचे आवडते आहे परंतु ते अधिक रोमँटिक बनवते ते म्हणजे कुरिंजीचे फूल. हे 12 वर्षातून फक्त एकदाच फुलते आणि तुम्ही खोऱ्यात पसरलेल्या निळ्या सुंदरांना […]Read More

ट्रेण्डिंग

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांंच्यावर गुन्हा दाखल

मुंबई, दि. २५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : दादरच्या प्रभादेवी परिसरात काही महिन्यांपूर्वी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आल्याने त्यातून उफाळलेल्या वादात पुढे गोळीबार झाला होता. गोळीबार आमदार सदा सरवणकर यांनी केल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र सदा सरवणकर यांनी तो गोळीबार केला नव्हता, पण त्यांच्या पिस्तुलातून गोळीबार झाल्याचे पोलीस तपासातून […]Read More

अर्थ

आता आकासा ही घेणार आकाशझेप

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील विमान उड्डाण क्षेत्रात दिवसेंदिवस उर्जितावस्था प्राप्त होताना दिसत आहे. केवळ ७ महिन्यांपूर्वी बाजारात दाखल झालेली अकासा एअर या वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा विचार करीत आहे. शेअर बाजारातील प्रभावी व्यक्ती म्हणून ख्याती असलेले राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीची असलेल्या अकासा एअरने तिचे कामकाज वाढवण्याच्या योजनेवर प्रयत्न […]Read More

ट्रेण्डिंग

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित 

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन  संस्थगित  झाल्याची घोषणा अध्यक्ष  राहूल नार्वेकर यांनी केली. पुढील पावसाळी अधिवेशन  १७ जुलै रोजी  होणार आहे. या अधिवेशनात  १८ दिवस कामकाज  झाले. त्यात एकूण १६५.५० मिनिटांच्या कामकाजात ४ तास ५१ मिनिटे तहकूबीमुळे वाया गेले तर दर रोज ९ तास १० मिनीटं  सरासरी कामकाज  करण्यात आले.  प्रश्नोत्तरांच्या […]Read More