Month: March 2023

महानगर

फोडा आणि झोडा ही सत्ताधाऱ्यांची सध्याची निती

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात गुंडगिरी वाढली आहे, धार्मिक तेढ वाढली आहे. फोडा आणि झोडा अशी निती सत्ताधाऱ्यांनी राबवायला सुरुवात केली आहे असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत आज केला. विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाची सुरूवात करताना ते बोलत होते. राज्यात धमक्यांचे सत्र सुरू आहे त्यातून खुद्द […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

गडकरी प्रकरणी बेळगावच्या हिंडलगा जेल वर पोलिसांचा छापा

बेळगाव, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘गुगल पे’वर 10 कोटी पाठवा आणि पोलिसांना सांगू नका, अशा आशयाचा फोन बेळगावच्या तुरुंगातील कुख्यात आरोपीने दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी सकाळी केला. जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांथा असे फोन करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याने यापूर्वी 14 जानेवारी 2023 रोजी गडकरींच्या कार्यालयात तीन फोन केले होते. त्यावेळी […]Read More

महानगर

खोटी कागदपत्रे तयार करून केली तब्बल ६५ बांधकामे

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट असलेल्या २७ गावातील ६५ विकासकांनी महापालिकेची खोटी कागदपत्रे तयार करून बांधकामे रेरा मध्ये नोंदणी करून बांधली त्यासाठी विशेष तपास समिती नेमली आहे, याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून संबधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई केली जाईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. याबाबतची […]Read More

Featured

आशा भोसले यांना प्रदान होणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपल्या सुमधूर स्वरांनी संगीत क्षेत्रात “‘चतुरस्र” हा शब्दही थीटा पडावा अशी चौफेर कामगिरी बजावत, गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण आशाताई भोसले यांना आज सायंकाळी एका भव्यदिव्य सोहळ्यात राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अश्या महाराष्ट्र भूषण […]Read More

महानगर

सावरकर , राहुल गांधी आणि खोके यांनी पुन्हा विधानसभा ठप्प

मुंबई दि २४– विधिमंडळ आवारात राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारणाऱ्याना निलंबित करा अशी मागणी काँग्रेसच्या नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली. याला भाजपाच्या आशीष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं, मुख्यमंत्र्यांना उद्देशून खोक्यांच्या घोषणा देणाऱ्यांना ही निलंबित करा अशी मागणी केली. यावर सुरू झालेल्या गदारोळामुळे विधानसभेचा एक तास वाया गेला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ पायाऱ्यांवरचे […]Read More

ट्रेण्डिंग

राहुल गांधी लोकसभा सदस्य म्हणून अपात्र

नवी दिल्ली, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॉंग्रेस पक्षाला हादरा देणारी आणि देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण करणारी एक घडामोड आज घडली आहे. काल सुरत उच्च न्यायालयाने कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टिका केल्या प्रकरणी मानहानीच्या गुन्हा अंतर्गत दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी आता राहुल गांधी […]Read More

महाराष्ट्र

संजय राऊत यांची मुख्य नेते पदावरून गच्छंती

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले. यानंतर आता शिंदे गटाने कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. बऱ्याच शिवसेनेच्या शाखा या शिंदे गटाच्या नेत्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. यापुढे जात आज शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी […]Read More

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

पुणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यभूषण फांऊंडेशनतर्फे गेल्या 33 वर्षांपासून दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुण्यभूषण पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मोहन आगाशे यांना हा पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. याबरोबरच सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना देखील गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष […]Read More

सांस्कृतिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात पहिल्या प्रयोगास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महानगरपालिकेद्वारे दक्षिण मुंबईत नव्यानेच उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग सादर होत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आलेली रंगभूमीवरील प्रकाशयोजना आणि ध्वनी व्यवस्था, आरामदायक आसने, नाट्यगृहातील प्रत्येक रांगेदरम्यान राखलेली पुरेशी उंची आणि अंतर, नाट्यगृहात असणाऱ्या सोयी सुविधा आणि […]Read More

Featured

शहीद दिनानिमित्त राज्यपालांचे भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहीद दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज (दि. २३) राजभवन येथे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते. Governor pays tribute to Shahid Bhagat Singh, Rajguru, Sukhdev Maharashtra Governor Ramesh Bais offered […]Read More