मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई गोवा महामार्गाचे काम अपूर्ण भूसंपादन आणि विविध विभागांच्या रखडलेल्या परवानग्या यामुळे आजवर रखडले होते मात्र आता यावर मार्ग काढून संपूर्ण महामार्ग काँक्रीटीकरण करून पुढील नऊ महिन्यात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी सभागृहात दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना आदिती तटकरे यांनी उपस्थित केली होती, […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा केवळ बोलाची कढी आणि बोलाचाच भात आहे. राज्यातील कोणाचंही समाधान न करणारा हा अर्थसंकल्प असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेची सुरुवात करताना ते बोलत होते, फडणवीसांनी विरोधकांना पंचामृत , शिंदे गटाला प्रसाद तर भाजपाच्या […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय आरोग्य अभियान (एचएनएम) अंतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका (आरबीएसके) शहरी व ग्रामीण एएनएम, जीएनएम , एलएचव्ही यांना रिक्त पदावर सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठीमंत्रालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत.15 वर्षापासुन अतिशय तुटपुंज्या मानधनावर खेडोपाडी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका साहय्यीका व शहरी भागात आपल्या जिवाची बाजी […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे अंतर्गत क्षेत्रीय पातळीवर संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या समतादूत प्रकल्पातील मनुष्यबळाचे समाज कल्याण विभागात समायोजन व्हावे या प्रमुख मागणीसाठी प्रकल्प अधिकारी व समतादूत मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण बसले आहेत.गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहीत कालावधीत ही समिती अहवाल देईल. निवृत्तीनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य करण्यात आल्याचे सांगतानाच संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सुमारे 18 लाख सरकारी निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उद्या १४ मार्च पासून बेमुदत संपावर जात आहेत. या संपामुळे शासकीय रुग्णालये, शाळा, कॉलेज, नगर पालिका, जिल्हा परिषदा, म्हाडा, तहसीलदार कार्यालय, यासह अनेक सरकारी विभागांचे कामकाज जवळपास ठप्प होणार आहे. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर कालपासून व्हायरल होत आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे. साईनाथ दुर्गे हे मुंबईबाहेर होते. सोमवारी सकाळी ते मुंबई विमानतळावर येताच दहिसर पोलिसांनी साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, […]Read More
लॉस अँजेलीस, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजचा दिवस भारतीय चित्रपटसृष्टीसाठी सुवर्णाक्षरात नोंदवून ठेवावा असा आहे. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात भारताला चार नामांकनं मिळाली होती. द एलिफेंट विस्परर्स’ या लघुपटाने बाजी मारली असून बेस्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. 41 मिनिटांचा हा लघुपट हत्ती आणि त्याला सांभाळणाऱ्या दांपत्याच्या आयुष्यावर भाष्य करतो. कार्तिकी गोन्सालवीस यांनी दिग्दर्शीत […]Read More
मुंबई , दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहरातील परिसरात सुरू असलेल्या अनेक बांधकामांमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. यामुळे, धुळीचे कण हे मुख्य प्रदूषक आहेत. या समस्येचा अभ्यास करून त्यावर तोडगा काढण्यासाठी सात जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. ए. संजीव कुमार हे या समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी 1 एप्रिल […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार उपलब्ध करून देताना परसबागांमधील भाज्या उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागासोबत करार करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा तारांकित प्रश्न काँग्रेसच्या वजाहत मिर्झा यांनी विचारला होता, त्याला केसरकर उत्तर देत होते.या परसबागांच्या […]Read More