mmc

ट्रेण्डिंग

भयंकर – दोन महिन्यांच्या बाळाला माकडाने फेकले छपरावरून

लखनौ, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क)  : माकडांच्या टोळ्यांचा मानवी क्षेत्रात घुसुन उच्छाद माजवण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आजवर पिकांची नासाडी करणारी ही मर्कटे आता मानवी जीवाला धोका निर्माण करत आहेत. उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यामधील तिंदवारी पोलीस स्थानकामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील छापर गावामध्ये माकडांची दहशत मागील बऱ्याच काळापासून आहे. मागील दोन महिन्यांपासून […]Read More

ट्रेण्डिंग

शेतीमध्ये पीक लागवड आणि कीड नियंत्रण यासाठी आता इस्रोकडून सहकार्य

नागपूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो द्वारे कृषी विभागासोबत सामंजस्य करार केले जात असून त्या माध्यमातून शेतीमध्ये पिकांची लागवड, कीड व्यवस्थापन याबाबत रिमोट सेन्सिंग अर्थात दूर संवेदन तंत्रज्ञानाद्वारे तंत्रज्ञान हस्तांतरित केलं जात आहे.   यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई , पीक व्यवस्थापन तसेच इतर योजना यामध्ये लाभ होतो अशी माहिती […]Read More

ट्रेण्डिंग

स्वराज्यरक्षक’ या भूमीकेवर मी ठाम

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :’स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. ‘स्वराज्यरक्षक’ ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे स्वराज्यरक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.   सातत्याने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बेतालपणापासून जनतेचे […]Read More

ट्रेण्डिंग

मराठी भाषेचा सहजसाध्य वापर आणि वावर सर्वत्र व्हावा

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज मुंबईत गौरवपूर्ण रीतीने विश्व मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. मराठी भाषेत खूप मोठ्या प्रमाणात बदल होत गेले आहेत. आधीच्या काळात सतरावे शतक, ब्रिटिशांच्या राज्यात अनेक बदल झाले. साहित्याचे लोकशाहीकरण झाले. मराठी भाषा ही संस्कृतीशी जशी संबंधित आहे तशी ती रोजगार, पर्यटन, उद्योगांनाही संबंध आहे. धार्मिक कॉरिडॉर तयार करताना […]Read More

देश विदेश

सियाचीन युद्धक्षेत्रावर नियुक्त झालेली ही आहे पहिली महिला अधिकारी

नवी दिल्ली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रचंंड बर्फांच्छादीत सियाचीन ही जगातील सर्वांत उंच आणि खडतर युद्धभूमी आहे. या अतिशय आव्हानात्मक अशा युद्धक्षेत्रावर आता पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याची निवड झाली आहे. महिला कॅप्टन शिवा थापा हीला 15 हजार, 632 फूट उंचीवर सियाचीन सिमेवर नियुक्त करण्यात आले आहे. भारतीय लष्करातून अशी नेमणूक होणारी शिवा ही […]Read More

Featured

देवेन भारती मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या सोबत एका नवीन पदाची निर्मिती करण्यात आली असून विशेष पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची त्या नवीन पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.   मुंबईचे पोलीस आयुक्त हे पद राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या समकक्ष मानले जाते, विवेक फणसळकर हे या पदावर आहेत , मात्र आणखी एक विशेष […]Read More

देश विदेश

राष्ट्रीय हरीत हायड्रोजन मिशनला मंजुरी

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या विकासाची चक्र वेगवान ठेवण्यासाठी सर्वांत महत्त्वाची बाबत म्हणजे इंधन. देशातील वाढती इंधनाची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकार पर्यायी इंधनाचा स्त्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन मिशनला परवानगी देत, याच्या अंमलबजावणीसाठी  19,744 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पायलट प्रोजेक्टसाठी यांपैकी 1466 कोटींचा वापर होणार आहे, […]Read More

बिझनेस

आता ‘डाबर’ विकणार मसाले

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दंतमंजनासारख्या रोजच्या वापरातील वस्तू पासून आयुर्वेदीक औषधांपर्यंत देशातील मोठे मार्केट व्यापणारी डाबर कंपनी आता मसाला मार्केटमध्ये पदार्पण करत आहे. भारतातील लोकप्रिय मसाला ब्रँड बादशाह मसाल्यात डाबरने मोठा हिस्सा  विकत घेतला आहे. आता बादशाह मसाला कंपनीत डाबरचा 51 टक्के वाटा आहे. डाबर इंडियाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार , 2 जानेवारी 2023 […]Read More

महानगर

राज्य वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :काल रात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप आज सरकारशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला आहे.   आज संपकरी कर्मचारी संघटनांशी उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली . तिन्ही कंपन्यांमधील विविध कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कामगार संघटना सामील असलेल्या या संपाबाबत फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका घोषीत केली ,त्यानुसार कंपन्यांचे खाजगीकरण करायचे […]Read More

मराठवाडा

तृणधान्याची रांगोळी ठरली आकर्षण

औरंगाबाद, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड येथील कृषी महोत्सवात तृणधान्य पासून तयार करण्यात आलेली रांगोळी ठरली आहे महोत्सवाचे मुख्य आकर्षण. यंदा आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड राज्यस्तरीय कृषी महोत्सवात एक स्टॉल लावण्यात आला असून मानवी जीवनात तृण धान्याचे महत्व समजून घेण्यासाठी कृषी महोत्सवात कृषी […]Read More