mmc

महाराष्ट्र

महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिक्कामोर्तब केले. त्यानंतर रेवदंडा येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांनीही आप्पासाहेबांची आज […]Read More

राजकीय

अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवडे घ्यावे

मुंबई, दि. ८  (एमएमसी न्यूज नेटवर्क)  :  नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा यंदा […]Read More

विदर्भ

दीक्षाभूमीवर ‘माता रमाई ‘ च्या पुतळ्याचे अनावरण

नागपूर, दि. ८  (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नागपुरातील दीक्षाभूमीवर डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांच्या अर्धाकृती पुतळयाचे अनावरण दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचे प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आले . महाराष्ट्रातील अनेक संस्थांच्या मागणीवरून माता रमाई चा पुतळा बसविण्याचा दीक्षाभूमी स्मारक समितीने निर्णय घेतल्याने लाखो बौद्ध महिलांनी आनंद व्यक्त […]Read More

राजकीय

९ मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधिमंडळाचे सन 2023 चे पाहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारीपासून पासून मुंबई येथे होत आहे. 27 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. या अधिवेशनात राज्याचा या वर्षाचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी मांडला जाणार आहे. कोण कोण होते उपस्थित विधानभवन येथे आज विधानसभा तसेच विधान […]Read More

राजकीय

वेगळ्या विदर्भ राज्यासाठी,विदर्भ निर्माण यात्रा

बुलडाणा, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भ राज्य वेगळे व्हावे यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक झाली आहे. वेगळ्या विदर्भासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती “विदर्भ निर्माण यात्रा” काढणार असून येत्या 21 फेब्रुवारीपासून या यात्रेला प्रारंभ करण्यात येणार आहे. पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळापासून तर पूर्व विदर्भातून सिरोंचा येथून ही यात्रा […]Read More

क्रीडा

महाराष्ट्राचे नवव्या दिवशी ८३ पदकांसह अग्रस्थान कायम

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरात मधील राष्ट्रीय क्रीडास्पर्धांपाठोपाठ मध्यप्रदेश येथे आयोजित पाचव्या ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धेत राज्याच्या संघातील युवा खेळाडू नेत्रदीपक कामगिरी करत आहेत. जागतिक स्तरावरील स्पर्धा गाजवण्याची क्षमता असलेले युवा खेळाडू सध्या ‘खेलो इंडिया’ मध्ये पदकांचे मानकरी ठरत आहेत. याच दर्जेदार कामगिरीमुळे महाराष्ट्राचे खेळाडू निश्चितपणे आगामी काळामध्ये ऑलम्पिक सारखी स्पर्धा गाजवतील, […]Read More

देश विदेश

या राज्यात ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेसाठी विमान प्रवास मोफत

भोपाळ,दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र आणि राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना जाहिर करत असतात. रेल्वे आणि बसच्या भाड्यातही ज्येष्ठांना विशेष सवलत दिली जाते. यापुढे  जाऊन आता मध्यप्रदेश सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत विमान सुविधा देऊ करणार आहे. मुख्यमंत्र्यांची घोषणा याबाबतची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली आहे. भिंड येथील संत रविदास यांच्या जयंती आणि चंबळ […]Read More

क्रीडा

नाराज झालेला राहुल द्रविड कसोटी सामना करणार रद्द?

नागपूर,दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे ९ फेब्रुवारी पासून नागपुरमध्ये  भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान कसोटी मालिकेतील  पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र सामन्याआधी प्रशिक्षक राहुल द्रविड खेळपट्टीवरुन नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा सामना दुसऱ्या ठिकाणी खेळवला जाणार असून आयोजक तयारी करत आहेत.  मिडिया रिपोर्टनुसार राहुल द्रविडने सामन्यासाठी दुसऱी खेळपट्टी निवडली […]Read More

देश विदेश

तुर्कस्तानात २ दिवसात ५ भूकंप, ५ हजार नागरिकांचा मृत्यू

अंकारा,दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल सकाळपासून एकापाठोपाठ एक बसलेल्या भूकंपाच्या ५ भीषण धक्क्यांमुळे मध्यपूर्वतील तुर्कस्तान आणि सिरियामध्ये हाहाकार माजला आहे. तुर्कस्नातमध्ये काल तीन मोठे भूंकप झाल्यानंतर  आज पुन्हा दोन भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी झाली असून शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या. या घटनेत आत्तापर्यंत पाच हजार नागरिकांचा मृत्यू झाला […]Read More

देश विदेश

तुर्कस्तानने मानले भारताचे विशेष आभार

अंकारा,दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्यपूर्वेतील तुर्कस्तान आणि आजूबाजुच्या देशांमध्ये काल झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी हजारो लोकांचा मृत्यू झाला असून अनेक शहरे उद्ध्वस्थ झाली आहेत. अशा परिस्थितीत भारताने तुर्कस्तानला  मदतीचा हात पुढे केला. आपत्तीनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या राज्याच्या परराष्ट्रमंत्र्यांना दिल्लीतील तुर्दूकस्तानच्या दूतावासात आपला शोक संदेश पाठवला. राज्याचे परराष्ट्र मंत्री व्ही मुरलीधरन यांनी तुर्कियेचे भारतातील […]Read More