पुणे, दि १०कृष्ण मुरारी, सुंदरा, दर्याचं पाणी, लई भारी दिसते पोर तसेच आता नुकतच आलेलं गायिका सई गोडबोलेच्या सुमधुर आवाजातील साईरत्न एंटरटेनमेंट प्रॉडक्शनची निर्मिती असलेलं “तुरु तुरू” गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून हे गाणं तब्बल दोन दिवसात १ मिलियन व्ह्यूज पार गेलं आहे. या गाण्याला सोशल मीडियावर लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या गाण्यात बिग […]Read More
मुंबई, दि. १०:- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागांचा पदभार स्वीकारला. यावेळी अन्न व नागरी […]Read More
मुंबई, दि १०: चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलच्या १९७६ बॅचचे स्नेहसंमेलन नुकतेच गिरगाव येथे शाळेच्या वागळे सभागृहामध्ये संपन्न झाले . भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे देखील या बॅचचे माजी विद्यार्थी नात्याने या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहून ते शाळेच्या रम्य आठवणीने गहिवरून गेले. या कार्यक्रमाला इजराइल, युरोप, अमेरिका इत्यादी देशातूनही विद्यार्थी आले होते. कार्यक्रमाला […]Read More
चंद्रपूर दि १० :– शिवसेनेच्या उबाठा गटाने भाजपशी हातमिळवणी करत चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर महापौर पदासाठी निवडून आल्या आहेत. खांडेकर यांनी ३२ मते मिळवत चंद्रपूरच्या महापौरपदावर सरशी मिळवली. काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांना ३१ मते मिळाली. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक तर MIM चा एक सदस्य तटस्थ राहिला. ठाकरे सेनेच्या पाठिंब्याने ही चुरशीची निवडणूक […]Read More
मुंबई ता. ९: मुंबई येथे आझाद मैदानावर पाणी स्वच्छता कर्मचारी यांचे आंदोलनातील घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.महाराष्ट्र राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशन या योजनेमध्ये काम करणारे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कंत्राटी कर्मचारी यांचे मागील सुमारे पाच महिन्यापासून प्रलंबित मागण्यासाठी शासनाने मानधन दिलेले नाही. महाराष्ट्र न्याय प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर […]Read More
पुणे, दि ९: भारतीय परंपरा, संस्कृती आणि वारसा जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने कशिश फाउंडेशन आणि एफ स्टुडिओ इंटरनॅशनल तर्फे आयोजित ‘ फॅशन वर्ल्ड टुर”चा शुभारंभ कोथरूड , पुणे येथे करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे सौंदर्य, परंपरा आणि पौराणिक वारसा आंतरराष्ट्रीय मंचावर सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे ७५ पेक्षा अधिक […]Read More
मुंबई दि ९ : 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी राज्यभरात क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, या निकालांमधून भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांनी स्पष्ट पसंती दिली आहे. 12 जिल्हा परिषदांपैकी सर्व ठिकाणी भाजपा आणि महायुतीचीच सत्ता येणार असून 125 पंचायत समित्यांपैकी 50 पेक्षा अधिक ठिकाणी भाजपा सत्ता स्थापन करेल, […]Read More
मुंबई, दि ९घाटकोपर – विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर क्र. 2 मधील हुतात्मा रवींद्र म्हात्रे मैदानावर संत श्री गजानन महाराज (शेगाव) यांचा प्रकटदिन सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. संत श्री गजानन महाराज (शेगाव) सेवा मंडळ, विक्रोळी यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सकाळी महाराजांच्या प्रतिमेची विधीवत स्थापना व पूजाविधी पार पडला. दिवसभर भाविकांनी […]Read More
मुंबई, दि 9: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार हे शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २३ ऑगस्ट २०२३ च्या शासन निर्णयान्वये अन्वये निशुल्क करण्यात आलेले असून ते आजही पूर्वीप्रमाणेच नि:शुल्क आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या नागरिकांच्या सनदेमधील परिशिष्ठ-तीन मध्ये सेवा सुविधा पुरविण्यासाठी 6 जून 2015 च्या शासन […]Read More
पुणे दि ९ : मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटून तब्बल ३० तास वाहतूक ठप्प राहिली. या कोंडीमुळे विशेषतः महिला, लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांचे हाल झाले. धक्कादायक बाब म्हणजे घटनेला पाच दिवस उलटूनही वाहतूक अजून पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. या घटनेतून एक्सप्रेसवेवरील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेचा पूर्ण अपयश समोर आले असून, अशा प्रसंगी जबाबदारी […]Read More