पुणे, दि २०: रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या पुढाकाराने आणि अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत नुमवी शाळेसमोर, बाजीराव रोड, लोखंडे तालीम चौक, पुणे येथे होणार आहे. […]Read More
मुंबई, दि २०बृहन्मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदी श्री. प्रभाकर शिंदे यांची आज (दिनांक २० फेब्रुवारी २०२६) बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या बिनविरोध निवडीची घोषणा केली. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ पार पडल्यानंतर सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या महानगरपालिका विशेष सभेत स्थायी समितीवर २६ महानगरपालिका सदस्यांची […]Read More
मुंबई, दि २०- महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांना व कार्यकर्त्यांना अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असे दर्जेदार प्रशिक्षण देणार असल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने घेतली आहे. नुकतीच १८ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्य सहकारी संघाच्या संचालक समितीची सभा पुणे येथे पार पडली. या प्रसंगी सध्याच्या स्पर्धेत टिकायचे असेल व राज्यातील सहकार प्रशिक्षित करायचा असेल तर दर्जेदार प्रशिक्षण देण्याची […]Read More
पुणे, दि २०: अलीकडे फॅशन शोचे पर्व फुटलेले आहे. तीन वर्षांच्या बालकांपासून पन्नाशी गाठलेल्या महिला – पुरुषांचेही फॅशन शो होत असतात. या सर्व फॅशन शो पेक्षा एक आगळा – वेगळा, सामाजिक बांधिलकी आणि महिला आरोग्य जनजागृती घडवणारा फॅशन शो कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने स्वप्नील गोगावले एन्टरटेनमेंट आणि आई फाऊंडेशन यांच्या वतीने एलप्रो मॉल,चिंचवड येथे मोठ्या […]Read More
पुणे, दि २०: जेव्हा सेवा हीच साधना ठरते आणि निसर्गाविषयी संवेदनशीलता जीवनाचा मूलमंत्र बनते, तेव्हा समाजाला नवी दिशा देणारे पवित्र संकल्प जन्माला येतात. मानवसेवा व लोककल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचा भव्य शुभारंभ रविवार, 22 फेब्रुवारी 2026, सकाळी 8 […]Read More
मुंबई, दि १९बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती अध्यक्षपदी श्रीमती राजेश्री राजेश शिरवडकर यांची आज (दिनांक २० फेब्रुवारी २०२६) बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या बिनविरोध निवडीची घोषणा केली. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ पार पडल्यानंतर सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महानगरपालिका विशेष सभेत शिक्षण समितीवर २२ महानगरपालिका […]Read More
मुंबई, दि २०: माजी लष्कर प्रमुखांच्या पुस्तकातील एका संदर्भाचा संसदेत उल्लेख झाल्यांनतर केंद्र सरकार या मुद्यावर / विषयावर हादरलेले-गोंधळले दिसू लागले आहे.परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते सैन्यदलातील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना निवृत्ती नंतर किमान २० वर्षे आत्मचरित्र व आठवणी लिहिण्यास बंदी घालण्याचा कायदा केंद्र सरकार लवकरच आणीत असल्याची बाब दिल्लीतील एका मोठ्या वृत्त समूहाने उघड केली आहे. किंबहुना […]Read More
पोर्टब्लेयर दिनांक 19 ~ छत्रपती शिवाजी महाराज यांचा 396 वा जयंती महोत्सव आज अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशच्या राजधानी पोर्टब्लेयर (दीपनगर) येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पोर्टब्लेयर मधील महाराष्ट्र मंडळ तर्फे येथील मराठी तरुण तरुणींनी एकता यात्रा भव्य शोभायात्रा आणि बाईक रॅली काढली. शिवजयंती निमित्त आयोजित एकता रॅलीचा […]Read More
मुंबई, दि १९भारतीय इतिहासातील जाज्वल्यमान नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य स्थापनेचा तो विलक्षण प्रवास आणि महाराजांचे उत्तुंग व्यक्तिमत्व पुन्हा एकदा एका भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, ‘राजा शिवाजी’ या द्विभाषिक (मराठी आणि हिंदी) चित्रपटाचे अधिकृत पोस्टर आज शिवाजी जयंती दिनी प्रदर्शित करण्यात आले. इतिहास साक्षी […]Read More
ठाणे दि १९ : अठरा फेब्रुवारी रोजी सरवली ता.भिवंडी या गावी संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने तथा ठाणे जिल्हा कुस्ती तालीम संघ आयोजित महाराष्ट्र केसरी आणि प्रौढ अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेकरिता निवड चाचणी घेण्यात आली. या स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील ४ पैलवानांनी प्रेक्षणीय […]Read More