Milind

पश्चिम महाराष्ट्र

चतुरस्त्र अभिनेते रविंद्र देवधर यांना बलराज साहनी पुरस्कार प्रदान.

मुंबई, दि. ४ : परदेशात जाऊन पैसे कमवायचे आणि विदेशात स्थायिक होऊन कुटुंबियांना भारतातच खितपत पडू द्यायचे, कुणी वृद्धाश्रमात तर कुणी कुठे, अशा विदारक परिस्थितीवर कोरडे ओढणाऱ्या ‘मी भारतीय’ या दीर्घांकाचे यशस्वी निर्माते, अभिनेते रविंद्र देवधर यांना बलराज साहनी, साहिर लुधियानवी फौंडेशनतर्फे मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, संत साहित्याचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. […]Read More

देश विदेश

चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री. किन जी यांनी महापौर श्रीमती रितू

मुंबई, दि ४चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री. किन जी यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज (दिनांक ४ मार्च २०२६) सदिच्छा भेट घेतली. महापौरपदी विराजमान झाल्याबद्दल महापौर श्रीमती रितू तावडे यांचे वाणिज्यदूत श्री. किन जी यांनी अभिनंदन केले. या सदिच्छा भेटीदरम्यान भारत-चीन तसेच मुंबई आणि चीनमधील प्रमुख शहरांदरम्यान द्विपक्षीय सहकार्य […]Read More

राजकीय

फुलांची होळी उपक्रमात वापरलेल्या फुलांचा सेंद्रिय खत निर्मितीसाठी उपयोग करणार.

मुंबई, दि ४ होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक कर्तव्यही सर्वांनी पार पाडावे, त्यासाठी मुंबईची महापौर या नात्याने स्वतः कृतीतून संदेश द्यावा, या उद्देशाने ‘फुलांची होळी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित केला, असे उद्गार मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी काढले. या उपक्रमात वापरात आलेल्या फुलांचा सेंद्रिय खत […]Read More

राजकीय

एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे!

मुंबई दि ४ : मुंबई–पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित ‘शिवनेरी’ बस सेवेची झेप आता राज्यभर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच मुंबई–पुणे मार्गाच्या पलीकडे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांदरम्यान शिवनेरी धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. सन २००२ मध्ये सुरू झालेल्या शिवनेरी सेवेने वक्तशीरपणा, […]Read More

राजकीय

वनजमिनींची चुकीची नोंद हटवण्यासाठी सरकार सर्वोच्च न्यायालयात….

मुंबई दि ४ : राज्यातील वनजमिनींची नोंद आणि सर्वेक्षण आणीबाणी काळात अत्यंत घाईने आणि गडबडीत करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी नव्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार वन जमिनींची नोंद कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात तातडीची याचिका दाखल करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. याबाबतची लक्षवेधी सूचना निलेश राणे यांनी उपस्थित […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

बारामतीत ‘किसान सन्मान’ कार्यक्रम; स्टिहल इंडियाकडून देशव्यापी ‘परिवर्तन यात्रा’चा शुभारंभ

बारामती, दि ४: भारतीय शेतीला तांत्रिक बळकटी देत यांत्रिकीकरणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने स्टिहल इंडिया तर्फे कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), बारामती येथे ‘किसान सन्मान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत शेतीत मोलाचे योगदान देणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास परिंद प्रभू देसाई (व्यवस्थापकीय संचालक, स्टिहल इंडिया), […]Read More

राजकीय

राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांना यापुढे स्वतंत्र क्रमांक

मुंबई दि ४ : राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांना नोंदणी नंतर स्वतंत्र क्रमांक देण्यात येणार असून, याची माहिती संबंधित गावाच्या ग्रामसभेत उपलब्ध करून देण्यात येईल आणि मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्त्यांची स्वतंत्र वेबसाईट सुरू करून त्यावरही माहिती टाकली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत जाहीर केलं. यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. मूळ प्रश्न […]Read More

महानगर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनुयायी स्व. चंद्रकला पाठक यांना मरणोत्तर महर्षि

मुंबई, दि. ४ : अंबरनाथ येथील अध्यात्ममार्गी कृष्णाजी विश्वनाथ केतकर उपाख्य प्रसाद महाराज यांची सख्खी भाची आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कट्टर अनुयायी स्व. चंद्रकला पाठक यांनी केलेल्या देहदानाबद्दल केंद्रीय मंत्रालयातर्फे इंदूर येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार सोहळ्यात स्व. चंद्रकला पाठक यांना ‘महर्षि दधिची सन्मान’ हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात […]Read More

महानगर

वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग @ १६८१ जणांवर वाहतुक पोलिसांची

ठाणे, ता.०३ मार्च २०२६ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील पाच परिमंडळात होळी आणि धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतुक शाखेने वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्या १ हजार ६८१ जणांवर कारवाई केली. पोलिसांच्या नाकाबंदीत १९६ मद्यपी चालक तावडीत सापडले. यासह विनाहेल्मेट ८३६, फ्रंट सीट २२७, विरुद्ध दिशेने येणारे १४ आणि ४०८ ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

के एस बी लिमिटेड कडून २०२५ वर्षात उल्लेखनीय विक्री वाढ;

पुणे, दि ३: के एस बी लिमिटेड ने २०२५ या वर्षात एकूण २,६९६ कोटी रुपयांचे विक्री उत्पन्न नोंदवून मागील वर्षाच्या तुलनेत ६.४२ टक्के वाढ साध्य केली आहे. चौथ्या तिमाहीत ७८४ कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदले गेले असून, त्यात ७.९३ टक्के वाढ झाली आहे. वर्षभरातील करपूर्व नफा ३५२.६ कोटी रुपये इतका झाला असून, नफ्यात सातत्यपूर्ण वाढ दिसून […]Read More