मुंबई दि ११ : राज्यासमोर अनेक अडचणी आहेत मात्र त्यातून मार्ग काढण्याची क्षमता आपल्या राज्याची असल्यामुळेच देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असणारे राज्य आपलेच असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. गेले दोन दिवस विधानसभेत झालेल्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यावरील कर्ज वाढते आहे याची चिंता करण्यापेक्षा ते कुठे […]Read More
मुंबई, दि ११: वर्षा या शासकीय निवासस्थानी ६८ व्या ‘महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या अधिकृत बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण व मानाच्या गदेचे पूजन राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने या भव्य स्पर्धेचे आयोजन दिनांक १८ मार्च ते २२ मार्च २०२६ या […]Read More
मुंबई, दि ११आवाज ही मानवाला दिलेली देणगी आहे. आवाज आणि ध्वनी यातील फरक संगीत शिक्षकांना ओळखता आला पाहिजे. संगीत शिकविताना तसेच अर्थपूर्ण संवाद साधताना आवाजातील चढ उतारांमधील समतोल साधणेही तितकेच गरजेचे आहे. आवाजातील सकारात्मकता ओळखता आली की, संभाषण हृदयापर्यंत सहज भिडते, अशा शब्दात प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांनी संवादाचे महत्त्व पटवून दिले. […]Read More
मुंबई, दि ११मुंबईतील उद्यानांमध्ये बांबू लागवड करण्याबाबतची सखोल माहिती देण्यासाठी कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष श्री. पाशा पटेल यांच्यासह बांबू लागवड क्षेत्रातील विविध तज्ज्ञांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात गुरुवारी (दिनांक १२ मार्च २०२६) ‘बांबू लागवड, विविध योजना व महत्त्व’ या विषयावर […]Read More
मुंबई, दि ११गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा ३ – ब अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी बोगदा खनन संयंत्र (TBM) चे सुटे भाग ‘शाफ्ट’मध्ये उतरविण्याची प्रक्रिया आज (दिनांक ११ मार्च २०२६) औपचारिकरीत्या सुरू करण्यात आली. नियोजित वेळापत्रकाच्या तुलनेत तब्बल तीन महिने अगोदर ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने […]Read More
मुंबई, दि १०हजारो गिरणी कामगार आणि वारसांनी आझाद मैदानावरील महाआंदोलनात मोठ्या संख्येने सामील होऊन संताप व्यक्त केला! आजचा मोर्चा अभूतपूर्व ठरला!आझाद मैदानावरील कामगारांच्या आंदोलनात लढा समितीचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी सांगितले जो पर्यंत रखडलेल्या घरांचा हक्क मार्गी लागत नाही,तो पर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही.विधानसभा आणि मैदानामध्ये हा लढा नेटाने लढविला जाईल.ज्या गिरणी कामगारांनी स्वातंत्र्यलढ्यात […]Read More
पुणे, दि १०: बिहारमधील गया येथे असलेल्या ऐतिहासिक ”महाबोधी महाविहार”च्या व्यवस्थापनाचा अधिकार पूर्णपणे बौद्ध धम्मियांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी पुण्यात धरणे आंदोलन करण्यात आले. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (जिल्हाधिकारी कार्यालयासमोर) येथे पुणे परिसरातील भिक्खू संघाच्या वतीने हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात भन्ते डॉ. नागघोष महाथेरो, भन्ते बुद्धघोष महाथेरो, भन्ते शाक्यपुत्र, भन्ते राजरत्न, शक्यपुत्र राहुल,धम्मरखीत, भन्ते […]Read More
मुंबई, दि १०गोरेगाव (पश्चिम) येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील ३ दुकानांचे तसेच ५डी रस्त्यावरील १० दुकानांच्या वाढीव बांधकामांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘पी दक्षिण’ विभागाकडून आज (दिनांक १० मार्च २०२६) निष्कासन करण्यात आले. उपायुक्त (परिमंडळ-४) श्रीमती भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (पी दक्षिण विभाग) श्री. अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. गोरेगाव (पश्चिम) येथील स्वामी […]Read More
पुणे, दि १०: प्रत्येक सरकारी योजनेमागील हेतू विधायक असला तरी प्रभावी अंमलबजावणीच्या अभावामुळे अनेक योजना जनसामान्यांपर्यंत अपेक्षित प्रमाणात पोहोचत नाहीत. ‘विकसित भारत’ ही संकल्पना प्रेरणादायी असली, तरी तिच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व भारतीयांची सामूहिक जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे, असे मत माजी खासदार तथा पुण्याच्या माजी महापौर वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले. एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी […]Read More
मुंबई दि १० : गेल्या वर्षी मंजूर करण्यात आलेल्या एक लाख तेरा हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांचा हिशेबच लागत नाहीत. अनेक योजनांना निधीच उपलब्ध करून देण्यात आला नाही, या अर्थसंकल्पात देखील तीच स्थिती असेल. राज्यावरील कर्ज डोंगर वाढवूनच विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न दिसत आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करताना राज्याचं कर्ज सहा पट करून ठेवलं आहे […]Read More