Milind

राजकीय

अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान गैरहजर सचिवांवर कारवाईचे अध्यक्षांचे निर्देश

मुंबई दि १३ : अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांच्या आजच्या विभागांच्या चर्चेदरम्यान कोणकोणत्या विभागांचे प्रधान सचिव अथवा अतिरिक्त मुख्य सचिव सभागृह अधिकारी गॅलरीत गैरहजर होते, त्यांच्यावर काय कारवाई केली याचा अहवाल सोमवारी प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर आपल्याला सदर करावा असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत विधानकार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. अशा प्रकारे चर्चा सुरू असताना संबंधित […]Read More

महानगर

महापालिका अधिकाऱ्यांनी महालक्ष्मी येथील लहान पाळीव प्राण्यांच्या रुग्णालयास भेट देऊन

मुंबई, दि १३बृहन्मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी ताशी ५० किलो क्षमतेची इन्सिनरेटर यंत्रणा उभारण्यात आली असून ती आता कार्यान्वित होण्यास सज्ज आहे. या सुविधेमुळे प्राण्यांच्या मृतदेहांची सुरक्षित व पर्यावरणपूरक विल्हेवाट लावणे शक्य होईल, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिली […]Read More

महिला

जागतिक महिला दिन मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरला

टिटवाळा, दि १३: ८ मार्च रोजी स्वराज्य शिवशक्ती महिला मंडळ, टिटवाळा व स्वराज्य कोकण प्रतिष्ठान (रजि.) (ता. कल्याण) यांच्या वतीने जागतिक महिला दिन अत्यंत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.या निमित्ताने बेघर माऊली निवारा केंद्र, टिटवाळा येथे जाऊन तेथील आपल्या वृद्ध माऊलींना सन्मानाचा फेटा, साडी व खणानारळाने ओटी भरून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या समवेत […]Read More

महानगर

मार्क्सवादी कम्युनिस्टपक्षाच्या वतीने महाड चवदार तळे सत्याग्रह मानवी हक्क परिषद

मुंबई, दि १३कोकणातील महाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन कार्यक्रमाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार 20 मार्च रोजी होणार आहे. भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत, महाड चवदार तळे सत्याग्रहाचे खूप मोठे महत्व आहे.याच सत्याग्रह आंदोलनातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय नेतृत्व उदयास आले व दलितांच्या आत्मसन्मानाच्या लढाईचा प्रारंभ झाला.या […]Read More

महानगर

शहरातील पायाभूत सुविधा, नागरी समस्यांबाबत शिवसेना नगरसेवकांची पालिका आयुक्तांशी चर्चा

उल्हासनगर, दि १३: उल्हासनगर शहरातील पायाभूत सुविधा,नागरी समस्यांवर तातडीने उपयोजना आणि विकासकामांना गती देण्याच्या अनुषंगाने शिवसेना नगरसेवकांनी पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन शहरातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने शिवसेना नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांची भेट घेतली.उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पत्रकारिता संपली तर समाज संपेल – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत

पुणे, दि १३पत्रकारिता आणि साहित्याचा जवळचा संबंध आहे. पत्रकारांनी वेगवेगळ्या क्षेत्रात रस निर्माण करून काम करावे. त्यामुळे लिखाण व्यापक, फुलेल आणि बहुअंगी होईल. पत्रकारांनी प्रचंड वाचन केले पाहिजे. मोजके आणि सकस लिहिले पाहिजे. वाटेल ते लिहू नये. चुकीवर प्रहार करावा आणि चांगल्याला चांगले म्हणावे, त्याचे कौतुक करावे. पत्रकारांनी भूमिका घेतली पाहिजे. पत्रकारिता संपली, तर समाज […]Read More

राजकीय

ई-रिक्षां व ई-बाईकसाठीही परमिट (परवाना ) बंधनकारक करण्याचा निर्णय

मुंबई दि १३ : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तथापि, प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई-बाईकनां यापुढे मोटार वाहन विभागाकडे रितसर नोंदणी करुन परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की,आतापर्यंत […]Read More

शिक्षण

विद्यार्थिनी शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीसाठी आता वित्तीय संस्थांचा सहभाग

मुंबई दि १३ : महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक शुल्क शासनाकडून प्रतिपूर्ती होण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी आता वित्तीय संस्थांशी करार करण्यात येणार आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली. याबाबतचा मूळ प्रश्न रईस शेख यांनी उपस्थित केला होता त्यावर कैलास पाटील, सुधीर मुनगंटीवार, यांनी उपप्रश्न विचारले. हे शुल्क सर्व संबंधित महाविद्यालयाला सरकारने […]Read More

राजकीय

मालवाहतुकीचे सर्व चेकपोस्ट रद्द करण्याचा सरकारचा निर्णय

मुंबई दि १३ : राज्यातील विविध जिल्ह्यात मालवाहतुकीच्या तपासणीसाठी उभारण्यात आलेली सर्व चेकपोस्ट रद्द करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे मात्र त्यापोटी द्यायच्या नुकसानभरपाई ची रक्कम देण्यासाठी वित्त विभागात प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. संबंधित लक्षवेधी सूचना नाना पटोले यांनी उपस्थित केली होती . संबंधित सर्व चेकपोस्ट ठेकेदाराला २००८ साली पंचवीस […]Read More

मराठवाडा

राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता

मुंबई दि १३ : राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. […]Read More