Month: December 2025

क्रीडा

क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीसह 20 मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि. २६ : क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीसह देशभरातील २० मुलांना यंदा राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालकांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो. वैभव सूर्यवंशीने क्रिकेट क्षेत्रात लहान वयातच उल्लेखनीय यश मिळवले असून त्याच्या कामगिरीची दखल घेऊन त्याला हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्याच्यासह विज्ञान, कला, संस्कृती, […]Read More

बिझनेस

या पेयांना चहा म्हणून नका – FASSAI चे निर्देश

नवी दिल्ली, दि. 26 : अन्न सुरक्षा नियामकाने (FSSAI) चहासंदर्भात एक नवा आदेश जारी केला आहे. कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीपासून प्राप्त झालेल्या पेयांनाच ‘चहा’ म्हणून लेबल केले जाऊ शकते, उदा. ब्लॅक टी, ग्रीन टी, कांग्रा टी किंवा इन्स्टंट टी! हर्बल इन्फ्यूजन, फ्लॉवर-आधारित किंवा इतर वनस्पती-आधारित पेये जसे की कॅमोमाइल, पेपरमिंट किंवा आले यांना ‘चहा’ म्हणून ब्रँड […]Read More

मनोरंजन

टीव्हीवरच्या जाहिरातींवर TRAI कडून निर्बंध

नवी दिल्ली, दि. २६ : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्राय (TRAI) ने टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींबाबत महत्वाचे निर्देश दिले आहेत. जास्त जाहिरातींमुळे कार्यक्रमात व्यत्यय येतो आणि पाहण्याचा आनंद कमी होतो. त्यामुळे हा नियम दर्शकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कार्यक्रमांची गुणवत्ता टिकवणे आणि दर्शकांना चांगला अनुभव देणे हा ट्रायचा उद्देश आहे. ट्रायची ही नियमावली 2012 आणि […]Read More

महानगर

*परिषदेच्या राज्यस्तरीय आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा

मुंबई, दि २६:अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारया पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.. परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाला 2025 चा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे..बेला, चामोर्शी, नांदगाव-मनमाड, पनवेल, आंबेगाव, किनवट, संग्रामपूर, अंबाजोगाई आणि मुंबई […]Read More

पर्यावरण

हिंगोलीत पकडलेली मगर ईरई डॅमच्या पाण्यात झाली निसर्गमुक्त

चंद्रपूर दि २६ :– हिंगोली येथून रेस्क्यू करून आणलेल्या मगरीला चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा–आंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या इरई धरण परिसरात निसर्गमुक्त करण्यात आले. या मगरीची लांबी तब्बल ८ फूट होती. ही मगर हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरण परिसरातील उसाच्या शेतात आढळून आली होती. मानवी वस्तीजवळ मगर आल्याने संभाव्य धोका लक्षात घेता, वन विभागाने तातडीने कारवाई करत […]Read More

पर्यावरण

अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यांवर संपूर्ण बंदी

नवी दिल्ली, दि. २५ : जनआंदोलनासमोर नमते घेत केंद्र सरकारने अखेर राज्यांना अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाणपट्ट्यां संपूर्ण बंदी घालण्याचे आणि संरक्षित क्षेत्रे (protected zones) विस्तारित करण्याचे आदेश दिले आहेत. केवळ 100 मीटर उंचीवरील पर्वतरांगा मानल्या जातील या अरवलीच्या नवीन व्याख्येवर झालेल्या आंदोलनानंतर कारवाई करण्यात आली. या निर्णयाचा उद्देश दिल्लीपासून गुजरातपर्यंत पसरलेल्या जगातील सर्वात जुन्या पर्वतरांगापैकी […]Read More

देश विदेश

उपचारांसाठी तब्बल 8 तास प्रतीक्षा, भारतीय तरुणाचा कॅनडामध्ये मृत्यू

कॅनडामधील एडमंटन शहरात भारतीय वंशाचा ४४ वर्षीय तरुण छातीत दुखत असताना तब्बल आठ तास उपचारासाठी प्रतीक्षा करत राहिला आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कॅनडाच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.प्रशांत श्रीकुमार यांना २२ डिसेंबर रोजी कामावर असताना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांना एडमोंटन येथील ग्रे नन्स कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. […]Read More

ट्रेण्डिंग

उबर-ओला-रॅपिडोसाठी केंद्र सरकारचा नवा नियम

मुंबई, दि. २५ : कॅब बुकिंगच्या नावाखाली सुरू असलेली ‘आधी टिप द्या, मग राईड मिळवा’ ही पद्धत केंद्र सरकारकडून बंद करण्यात आली आहे. उबर, ओला, रॅपिडो आणि नम्मा यात्रीसारख्या कॅब अ‍ॅग्रिगेटर अ‍ॅप्सवर राईड सुरू होण्याआधी टिप मागण्याससुद्धा सक्त मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा बदल करत कॅब अ‍ॅप्सवर महिला चालक निवडण्याचा पर्याय […]Read More

ट्रेण्डिंग

नवीन विमान कंपन्यांना सरकारची मंजूरी

मुंबई, दि. २५ : केंद्र सरकारने इच्छुक एअरलाईन्ससोबत झालेल्या बैठकीनंतर भारतात नव्या एअरलाईन्सना ऑपरेशनची परवानगी दिली आहे. नागरिक उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले की त्यांनी गेल्या आठवड्यात शंख एअर, अलहिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसच्या टीमची भेट घेतली. यापैकी शंख एअरला आधीच एनओसी मिळाली होती, तर अलहिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसला या आठवड्यात एनओसी […]Read More

राजकीय

उत्तर भारतीयांकडून ओबीसी आरक्षणाची मागणी

मुंबई, दि. २५ : मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमध्ये उत्तर भारतीय मतदारांचे प्रमाण लक्षणीय असल्याने सर्वच पक्षांत त्यांची मते मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उत्तर भारतीय ओबीसी विभागाच्या बैठकीत महाराष्ट्रात ओबीसी दर्जा द्यावा, अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली. ठाण्यात झालेल्या महापंचायतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते. उत्तर भारतातून आलेल्या ओबीसी समाजाचे […]Read More