Month: December 2025

राजकीय

‘संचार साथी’ ॲप विरोधात विरोधकांचा हल्लाबोल

नवी दिल्ली, दि. २ : सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना केंद्र सरकारने डिजिटल सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दूरसंचार विभागाने (DOT) सर्व स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना राज्य सरकारद्वारे विकसित करण्यात आलेले सायबर सिक्युरिटी ‘संचार साथी’ हे ॲप प्रत्येक डिव्हाइसमध्ये प्री-इन्स्टॉल करण्याचे निर्देश सोमवारी (दि.१) दिले. या निर्णयावरून राजकीय विश्वात खळबळ उडाली असून आता केंद्रीय दूरसंचार […]Read More

ट्रेण्डिंग

१ जानेवारीपासून बदलणार Digital Banking चे नियम

मुंबई, दि. २ : RBI ने डिजिटल बँकिंगसाठी सात नवीन मास्टर डायरेक्टर्स जारी केले आहेत. ते १ जानेवारी २०२६ पासून देशभरात लागू केले जातील. या नवीन नियमांचे उद्दिष्ट एक राष्ट्र, एक नियम धोरणांतर्गत डिजिटल बँकिंग स्वच्छ, सुरक्षित आणि सोपे करणे आहे. RBIच्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक बँकेला आता स्वतःचे डिजिटल बँकिंग धोरण विकसित करावे लागेल. हे […]Read More

देश विदेश

पाकिस्तानमध्ये HIV चा प्रकोप

इस्लामाबाद, दि. २ : पाकिस्तानमध्ये HIV संसर्गाने आता महामारीचे रूप धारण केले आहे. गेल्या पंधरा वर्षांत पाकिस्तान मध्ये HIV च्या प्रकरणांमध्ये 200 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, म्हणजेच प्रकरणांची संख्या तिप्पट झाली आहे. 2010 मध्ये जिथे एकूण प्रकरणे 16,000 होती, तिथे 2024 पर्यंत ही संख्या वाढून 48,000 झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), पाकिस्तान पूर्व […]Read More

ट्रेण्डिंग

२५,४८७ कॉन्स्टेबल पदांची भरती, १०वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

नवी दिल्ली, दि. २ : कर्मचारी निवड आयोगाने २०२६ भरती प्रक्रियेअंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (CAPFs), सचिवालय सुरक्षा दल (SSF) आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमन (GD) पदांसाठी एकूण २५,४८७ कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी १०वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. संगणक-आधारित परीक्षा फेब्रुवारी ते एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित केली जाईल. जे उमेदवार पहिल्यांदा अर्ज […]Read More

सांस्कृतिक

उत्तराखंडमध्ये पुढील महिन्यात सुरू होतोय अर्धकुंभ

डेहराडून, दि. २ : उत्तराखंडमधील हरिद्वारमधील २०२७ मध्ये होणाऱ्या अर्धकुंभ मेळ्याच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. अर्धकुंभ कार्यक्रम १४ जानेवारीपासून सुरू होऊन २० एप्रिल रोजी संपेल. ९७ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात १० प्रमुख स्नानांचा समावेश आहे, ज्यामध्ये पहिल्यांदाच चार शाही अमृत स्नानांचा समावेश आहे, जो एक ऐतिहासिक निर्णय मानला जातो. अनेक दिवसांपासून अर्धकुंभाच्या तारखांबाबत गोंधळ होता. […]Read More

बिझनेस

ऊर्जा प्रकल्पांमध्ये बांबू बायोमास अनिवार्य

मुंबई, २ डिसेंबर : महाराष्ट्र सरकारने ऊर्जा क्षेत्रात हरित पर्यायांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नव्याने जाहीर झालेल्या महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ अंतर्गत राज्यातील सर्व पात्र ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमध्ये ५ ते ७ टक्के बांबू बायोमास मिश्रण अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे पारंपरिक इंधनांवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार आहे. सरकारने […]Read More

राजकीय

निवडणूक आयोगाच्या घोळामुळे निकाल लांबणीवर

नागपूर दि २ : निवडणूक आयोगाच्या घोळामुळे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता लांबणीवर गेले आहेत. ज्या ठिकाणी निकाल प्रलंबित होते, फक्त त्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलायला पाहिजे होत्या. मात्र चुकीच्या पद्धतीने निवडणुका पुढे ढकलल्यामुळे आता सर्वच निकाल लांबले आहेत. यामुळे उमेदवारांचा भ्रमनिरास झाला असून सर्वच पक्षांच्या नेत्यांचा विरोध असल्याची टीका राज्याचे महसूल मंत्री तथा […]Read More

राजकीय

पुण्यातील मालधक्का चौकातील एमएसआरडीसीची जागा पुन्हा सार्वजनिक हितासाठी – उपसभापती

मुंबई प्रतिनिधी :पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ताब्यातील महत्त्वपूर्ण जागा पुन्हा शासनाकडे हस्तांतरित करून ती जनहितासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तातडीचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. विधानभवनात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना याबाबत ठोस मार्गदर्शक सूचना दिल्या. ही जागा पूर्वी सार्वजनिक बांधकाम […]Read More

महानगर

जागतिक एड्स दिन निमित्ताने मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेद्वारे “स्वयम

मुंबई, दि २जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने समाज माध्यम (सोशल मीडिया) इन्फ्ल्यूएन्सर या चांगल्या उपक्रमाचे उद्घाटन आज करण्यात आले. ज्या इन्फ्ल्यूएन्सरचे हजारो फॉलोअर्स आहेत, असे इन्फ्ल्यूएन्सर मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे (MDACS) चे उपक्रम वेगवेगळ्या स्तरावर पोहोचवतील. आरोग्याशी संबंधित जनजागृती करणारे उपक्रम प्राथमिक आरोग्य क्षेत्रामध्ये आणणे आवश्यक आहे. अशा पुढाकारामुळे महानगरपालिकेचे, शासनाचे उपक्रम आणि पुढाकार समाजातील […]Read More

राजकीय

माझ्यावर जो आरोप करण्यात आला त्याच्याशी माझा दुरान्वये संबंध नाही

मुंबई दि. २ डिसेंबर – माझ्यावर जो आरोप करण्यात आला त्याच्याशी माझा दुरान्वये संबंध नाही, मात्र स्वतः कृत्य करायचं आणि दुसर्‍यावर गलिच्छ आरोप करायचे हा धंदा त्यांनी आयुष्यभर केलेला आहे यापेक्षा अधिक सांगायचं नाही. त्यामुळे जे हिस्ट्रीशिटर आहेत त्यांची यापूर्वीची हिस्ट्री समजून घेत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या आरोपाची सखोल चौकशी करावी आणि जे दोषी असतील […]Read More