Month: December 2025

राजकीय

बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ‘ रॅपीडो, उबेर ‘ सारख्या ॲप

मुंबई दि ३: शासकीय नियमावलीला फाटा देऊन बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करुन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ‘ रॅपीडो, उबेर यासारख्या ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्या विरोधात गुन्हे दाखल करा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत. शासनाने ई-बाईक धोरण नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार अनेक ॲप आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांनी व्यवसाय […]Read More

राजकीय

मीरा-भाईंदरच्या विकास प्रवासाला नवी गती !

मीरा-भाईंदर दि ३ :मीरा-भाईंदरकरांच्या अनेक दशकांच्या प्रतीक्षेला पूर्ण विराम देत आधुनिक एसटी डेपो, पार्किंग प्लाझा आणि मार्केट यार्ड प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन सोहळा परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भाईंदर रेल्वे स्टेशन पश्चिम येथे संपन्न झाला. हा ऐतिहासिक क्षण शहराच्या नावावर कोरला गेला. भाईंदर पश्चिम येथील बस आगाराची दयनीय अवस्था तसेच […]Read More

साहित्य

पत्रलेखक चंद्रकांत पाटणकर यांच्या पत्रपंढरी पुस्तकाचे झाले प्रकाशन

मुंबई, दि ३: गेल्या अर्धशतकापासूनसमाजातील विविध समस्यांवर आवाज उठवून न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ पत्रलेखक आणि शिवसैनिक चंद्रकांत पाटणकर यांच्या पत्रपंढरी ३ या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते दादर येथे करण्यात आले. पाटणकरांचे हे पुस्तक म्हणजे समाज भान जपणाऱ्या ‘जागल्या’चे आत्मकथन असून हे पुस्तक नव्या पिढीच्या पत्रलेखकांना सतत प्रेरणा देत राहील, अशी […]Read More

मनोरंजन

मराठमोळा दिग्दर्शक सचिन आंबातचा “असुरवन” चित्रपट ५ डिसेंबरला महाराष्ट्रात होणार

मुंबई, दि ३महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा येथील हमरापूर (आंबातपाडा) या गावातून आलेला सचिन रामचंद्र आंबात हा तरुण दिग्दर्शक आपली आदिवासी प्राचीन वारली परंपरा त्याच्या आगामी “असुरवन” चित्रपटातून लोकांपर्यंत पोहोचवत आहे. महाराष्ट्राच्या मातीत चित्रित झालेला “असुरवन” हा मराठी चित्रपट येत्या ५ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. स्वप्नस्वरूप प्रस्तुत, बहुप्रतिक्षित ‘असुरवन’ या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन […]Read More

अर्थ

RBI कडून या बँका सर्वांत सुरक्षित म्हणून घोषित

मुंबई,, दि. ३ : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बँक HDFC आणि आयसीआयसीआय ICICI बँक या देशातील सर्वांत सुरक्षित बँका म्हणून घोषित केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात या तीन बँकांना *Domestic Systemically Important Banks (D-SIBs)* म्हणून मान्यता दिली आहे. याचा अर्थ असा की या बँका देशाच्या […]Read More

ट्रेण्डिंग

Ray Ban ने भारतात लाँच केला AI स्मार्ट चष्मा

मुंबई, दि. ३ : भारतामध्ये Ray Ban चे Meta Gen 2 AI चष्मे आजपासून उपलब्ध झाले आहेत. या नवीन पिढीतील स्मार्ट ग्‍लासेसमध्ये अत्याधुनिक 3K Ultra HD व्हिडिओ कॅप्चर, Ultra-wide HDR तंत्रज्ञान आणि सुधारित Meta AI अनुभव देण्यात आला आहे. जवळपास 8 तासांची बॅटरी लाइफ, फक्त 20 मिनिटांत 50% फास्ट चार्जिंग आणि चार्जिंग केससह 48 तास […]Read More

महानगर

चिंचवडमध्ये संगीत आणि भक्तीच्या मिलापाने ६ ते १० डिसेंबर दरम्यान

मुंबई, दि ३श्री मयुरेश्वर अवतार श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांच्या ४६४ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन यंदा ६ ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान संजीवन समाधी मंदिर आणि श्री मंगलमूर्ती वाडा, चिंचवड येथे भव्य उत्साहात करण्यात आले आहे. यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘इथेनॉल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांना […]Read More

मराठवाडा

ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन

छ संभाजीनगर दि ३ : राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष, आपलं घर नळदुर्ग चे आधारवड, पन्नालाल सुराणायांचे दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9:30 च्या दरम्यान नळदुर्ग होऊन सोलापूरला नेत असताना वाटेत निधन झाले. त्यांचे वय 93 वर्ष होते. त्यांचे देहदान सोलापूर सिव्हिल मेडिकल कॉलेजला सकाळी देहदान करण्यात आले. पन्नालाल भाऊ हे दैनिक मराठवाडा चे […]Read More

महानगर

भारताचा गौरवशाली बौद्ध धम्म महोत्सव – “महामानवास मानवंदना”

मुंबई, दि ३: न्याय, समता, बंधुता आणि मानवता यांचे प्रणेते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, जगातील सर्व वंचितांना स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची नवी दिशा देणारे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कृतज्ञतापूर्वक मानवंदना देत, गत २५ वर्षांपासून मुंबईच्या हिरानंदानी भागात भव्य, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जाणीवेने परिपूर्ण असा “महामानवास मानवंदना” हा ऐतिहासिक महोत्सव साजरा केला जात आहे.हा महोत्सव आज […]Read More

ट्रेण्डिंग

Digital Arrest बाबत न्यायालयाकडून CBI ला महत्त्वपूर्ण निर्देश

नवी दिल्ली, दि. २ देशभरात वाढणाऱ्या ‘डिजिटल अटक’ (Digital Arrest) घोटाळ्यांची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) तातडीने तपास सुरू करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने ‘डिजिटल अटक’ घोटाळे, गुंतवणूक घोटाळे आणि अर्धवेळ नोकरीचे (Part-time job) घोटाळे या तीन प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची नोंद घेतली. खंडपीठाने स्पष्ट […]Read More