Month: December 2025

ट्रेण्डिंग

IndiGo एअरलाइन्सचा माफीनामा; प्रवाशांना देणार रिफंड सुविधा

मुंबई, दि. ५ : गेल्या काही दिवसांमध्ये इंडिगो एयरलाइन्सची तब्बल ७५० उड्डाणे रद्द झाली होती. त्यामुळे हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले होते. देशभरात उड्डाण सेवा कोलमडलेल्या पार्श्वभूमीवर IndiGo Airlines ने शुक्रवारी (दि.५) निवेदन जारी करत प्रवाशांची माफी मागितली. “आम्ही सर्व प्रवाशांची माफी मागतो.” असे म्हणत त्यांनी माफीनामा जाहीर केला आहे. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी इंडिगोने मोठ्या […]Read More

पर्यटन

Indigo मुळे कहर, पुणे- मुंबई विमान तिकीट तब्बल 61 हजार

मुंबई, दि. ५ : Indigo Airlines कडून सध्या देशभर सुरु असलेल्या प्रचंड गोंधळाच्या स्थितीमुळे प्रवासी वैतागले आहेत. नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) या गोंधळाचं मुख्य कारण ठरलं आहे. इंडिगो एरलाईन्स कंपनीच्या ऑपरेशन समस्यांमुळे प्रवासी ताटकळलेले असताना, दुसरीकडे इतर विमान सेवा कंपन्यांनी दर वाढवले आहेत. पुणे ते मुंबई विमानाचे तिकीट तब्बल 61 हजारांवर गेलं आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यातील या मनपाकडून नागरिकांना मोफत WiFi

मुंबई, दि. ५ : मीरा-भाईंदर शहर लवकरच महाराष्ट्रातील पहिले ‘फ्री वायफाय’ देणारे (Free WiFi) शहर ठरणार आहे. मीरा-भाईंदर शहर डिजिटल करण्याच्या दिशेने महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकत्याच झालेल्या एका आढावा बैठकीत ही घोषणा केली. मीरा-भाईंदरमधील नागरिकांना ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची मोफत उपलब्धता देणारे हे वायफाय तंत्रज्ञान ‘प्रगतीची नवी लाट’ […]Read More

ट्रेण्डिंग

SBI मध्ये 996 पदांसाठी भरती

मुंबई, दि. ५ : SBI ने स्पेशालिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी भरती 2025 ची अधिकृत घोषणा केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 996 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत भरती पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. एसबीआय बँक SO भरती 2025 ची अधिकृत सूचना 2 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली. त्याच दिवशी ऑनलाइन अर्ज […]Read More

विज्ञान

पुण्यातील शास्त्रज्ञानी लावला विश्वातील सर्वात दूरच्या दीर्घिकेचा शोध

पुणे, दि. 5 : टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील (NCRA) संशोधक राशी जैन आणि योगेश वाडदेकर यांनी नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) च्या डेटाचे विश्लेषण करताना विश्वातील सर्वात दूरच्या आणि प्रारंभिक काळात अस्तित्वात असलेल्या अलकनंदा नावाच्या सर्पिल दीर्घिकेचा शोध लावला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही दीर्घिका विश्व केवळ 1.5 अब्ज […]Read More

देश विदेश

राज्यातील विद्यार्थ्यांना नर्सिंग शिक्षणासाठी जर्मनीचे दरवाजे खुले

मुंबई, दि. 5 : महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेमबर्ग राज्यादरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी आज महत्त्वपूर्ण संयुक्त करार करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी जर्मनीत प्रशिक्षण घेऊन करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.राज्याच्या वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि बाडेन-वुटेमबर्ग राज्याचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे […]Read More

अर्थ

RBI कडून रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी GDP मध्ये 8.2%

नवी दिल्ली,दि. ५ : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली असून, देशाच्या GDP मध्ये 8.2% वाढ नोंदवली गेली आहे. ही महत्त्वाची आर्थिक घडामोड देशाच्या वित्तीय धोरणात नवा टप्पा ठरली आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यांसारख्या सर्व प्रकारच्या कर्जांच्या EMI मध्ये घट होण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मौद्रिक […]Read More

आरोग्य

पान मसाला-सिगारेटवर नवीन कर- संसदेत विधेयक मंजूर

नवी दिल्ली, दि. 5 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत आरोग्य सुरक्षेतून राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यावर सिगारेट , पान मसाला सारख्या उत्पादनांवर सरकार अतिरिक्त कर लावेल. सरकारच्या तिजोरीत जमा होणारा अतिरिक्त पैसा राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापरण्यात येईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती […]Read More

महानगर

छत्रपती शिवाजी महाराज मैदान (दादर) येथे ‘दीपस्तंभ’ या माहिती पुस्तिकेचे

मुंबई, दि ५ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून चैत्यभूमी (दादर) येथे येणाऱ्या अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या सोयी-सुविधांमध्ये दरवर्षी सातत्याने आमुलाग्र सुधारणा आणि वृद्धी होत आहे. तसेच, जनसंपर्क विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त माहिती अनुयायांना माहिती पुस्तिकेतून उपलब्ध करून दिली जाते. […]Read More

राजकीय

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातूनआरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना

दिल्ली, दि ५: आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत सुविधेपासून वंचित आहेत. त्यांना या मुलभूत सुविधा देण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने आरे कॉलनी तसेच दिंडोशी वन क्षेत्रात राहणाऱ्या रहिवाश्यांना पंतप्रधान आवास योजनांच्या माध्यमातून घरे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम […]Read More