Month: December 2025

देश विदेश

आता सर्व स्मार्टफोन्समध्ये असणार हे सरकारी ॲप

नवी दिल्ली, दि. १ : केंद्रीय दूरसंचार विभागाने मोबाईल हँडसेटच्या उत्पादकांना आणि आयातदारांना संचार साथी – Sanchar Saathi हे सरकारी अॅप सर्व नवीन उपकरणांमध्ये ९० दिवसांच्या आत प्री-इंस्टॉल केलेले असल्याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. भारताच्या डिजिटल सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठा बदल घडवणारा मानला जात आहे. २८ नोव्हेंबरच्या निर्देशानुसार, आदेश जारी केल्यापासून ९० दिवसांनंतर भारतात उत्पादित […]Read More

ट्रेण्डिंग

जग भयंकर मंदीच्या उंबरठ्यावर – जगप्रसिद्ध लेखकाचा इशारा

मुंबई, दि. १ : जगप्रसिद्ध रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक आणि गुंतवणूक तज्ज्ञ रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावरून जागतिक अर्थव्यवस्थेबाबत गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की जग “इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक मंदीच्या” उंबरठ्यावर आहे आणि ही घसरण प्रत्यक्षात सुरू झाली आहे. कियोसाकींच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या […]Read More

ट्रेण्डिंग

चित्रपती व्ही. शांताराम यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर

मुंबई, दि. 1 : भारतीय चित्रपटसृष्टीला नवा आयाम देणारे ख्यातनाम दिग्दर्शक शांताराम राजाराम वणकुद्रे अर्थातच व्ही. शांताराम यांचा असामान्य, प्रेरणादायी जीवनपट आता पहिल्यांदाच एका भव्यदिव्य चित्रपटातून उलगडणार आहे. स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे धडपड, प्रयोगशीलता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कलाप्रेम यांचा दिव्य संगम यात अनुभवायला मिळणार आहे. राजकमल […]Read More

महानगर

बांगलादेशी तृतीयपंथी, त्यांना आश्रय देणार्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.-कृष्णा आडेलकर

मुंबई, दि १:देशाला व महाराष्ट्राला घातक असलेले घुसखोर बांगलादेशी व्यक्ती ( तृतीयपंथी) व त्यांना आश्रय देणार्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करु,असा इशारा घाटकोपर (पश्चिम )येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा मनोहर आडेलकर यांनी सोमवारी दिला.ते मुंबई प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. कृष्णा आडेलकर म्हणाले,मुंबईत बांग्लादेशातून आलेल्या बांग्लादेशी तृतीयपंथी यांची […]Read More

पर्यटन

या विमानतळांवरील प्रवास शुल्क तब्बल 22 पट वाढण्याची शक्यता

दिल्ली आणि मुंबई या देशातील दोन प्रमुख विमानतळांरून विमान प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना लवकरच एक मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. दूरसंचार वाद निवारण आणि अपीलीय न्यायाधिकरणने (TDSAT) दिलेल्या एका महत्त्वपूर्ण आदेशामुळे या दोन प्रमुख विमानतळांवरील प्रवासाचे शुल्क तब्बल 22 पटीने वाढू शकते. 2008-09 ते 2013-14 या आर्थिक वर्षांदरम्यान वापरकर्ता शुल्काच्या गणनेची पद्धत बदलल्यामुळे ही […]Read More

देश विदेश

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अभियंत्याला जन्मठेप

नवी दिल्ली, दि. १ : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा ब्राह्मोस एअरोस्पेस कंपनीचा अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवाल याला हेरगिरी प्रकरणात 2018 साली लखनऊ ATS ने नागपुरातून अटक केली होती. आधी न्यायालयाने अग्रवालला जन्मठेप शिक्षा सुनावली होती, आज हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात झालेल्या सुनावणी मध्ये निशांत अग्रवालला दिलासा मिळाला असून जन्मठेप रद्द करत तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. -नागपूर […]Read More

मनोरंजन

‘द फोक आख्यान’चे संगीतकार देणार मराठी चित्रपटाला संगीत

मुंबई, दि. १ : लोककलेला मानाचा मुजरा करत संपूर्ण राज्यभरात लोकप्रिय ठरलेल्या ‘द फोक आख्यान’ च्या टीमकडे चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शक यांच्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या सिनेमा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला ‘द फोक आख्यान’ची टिम संगीत देणार आहे. या चित्रपटासाठी त्यांनी पाच दमदार गाणी तयार […]Read More

ट्रेण्डिंग

या दिवशी राज्यातील सर्व शाळा राहणार बंद

पुणे, दि. १ : महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. पुण्यात आज पार पडलेल्या बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाने निर्णय घेतला आहे. हे आंदोलन मुख्यतः शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सक्ती, संच मान्यता (staffing approval) संदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यासाठी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी आहे. या आंदोलनामुळे राज्यातील […]Read More

महानगर

पोक्सो (POCSO) कायद्याविषयी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जनजागृती

मुंबई, दि १लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण पोक्सो (Protection of Children from Sexual Offences Act) कायद्याविषयी जागरुकता वाढविण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या उपक्रम अंतर्गत मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील महानगरपालिका शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुला-मुलींना पोक्सोकायद्याविषयी (POCSO) मार्गदर्शन करण्यात आले. या जनजागृती उपक्रमासाठी ‘अभया’ या विशेष नाटिकेचा आधार […]Read More

महानगर

नवी मुंबई विमानतळावर प्रवासी चाचणी यशस्वी

मुंबई, दि. १ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमाने झेपावण्याची तयारी आता अंतीम टप्प्यात आली आहे. विमानतळ प्रशासनाने २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी झालेली पहिली प्रवासी चाचणी यशस्वी पूर्ण झाल्याची माहिती जाहीर केली. २५ डिसेंबरपासून विमानतळावर नियमित उड्डाणांना सुरुवात होणार असल्याने ही चाचणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शेकडो स्वयंसेवकांना प्रवासी बनवून पूर्ण प्रक्रिया पार […]Read More