Month: December 2025

महानगर

लीलावती परिसरातील वाहतूक कोंडी सोडवावी, आमदार मिलिंद नार्वेकर

मुंबई, दि ९वांद्रे व खार पश्चिम भागातील होत असलेली मोठी वाहतूक कोंडी सोडवावी याबाबत आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विशेष सूचनेद्वारे सभापतींकडे हिवाळी अधिवेशनामध्ये सूचना मांडली. वांद्रे व खार पश्चिम भागातील बहुतांश गल्ल्यामधील टुमदार बंगले, दुमजली घरे आणि बैठ्या चाळी हळूहळू इतिहास जमा होत आहेत. त्याजागी मोठ-मोठे टॉवर उभे राहत आहेत. त्यामुळे या भागातील लोकसंख्येत वाढ […]Read More

राजकीय

बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी नसबंदी आणि बचाव केंद्रात वाढ

नागपूर दि ९ : राज्यातील अनेक भागात बिबट्यांचा वाढता त्रास , दहशत , त्यांचे हल्ले यावर उपाय म्हणून बिबट्यांना शेड्युल एक मधून दोन मध्ये आणण्यासाठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा सुरू केला आहे, त्यांची नसबंदी करण्याची परवानगी केंद्राने दिली आहे, त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे याशिवाय त्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पिंजरे उपलब्ध करुन त्यांची बचाव […]Read More

राजकीय

आता तुकडेबंदीची अट रद्द, सातबारा होणार नावावर

नागपूर दि ९ : राज्यातील शहरी भागातील प्लॉटिंग करताना अथवा जमिनीचा तुकडा विकत घेताना तुकडेबंदी आणि गुंठेवारी कायद्याचा भंग करण्यात आलेल्या घर अथवा जमीन मालकांना संबंधित मालमत्ता त्यांच्या नावे होण्यासाठी जमीन महसूल कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या सुधारणेच्या मुळे १५ ऑक्टोबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२५ दरम्यानच्याच अशा व्यवहारांचा समावेश असेल […]Read More

विदर्भ

मुंबईत छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकावर महाराजांचा अश्वारूढ पुतळा निश्चितच

नागपूर दि ९ : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या नवीन पुनर्विकास आराखड्यामध्ये स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत पुन्हा दिली. या संदर्भातील मुद्दा भास्कर जाधव यांनी उपस्थित केला होता. जुन्या आराखड्यानुसार त्यात पुतळा उभारण्याची तरतूद नव्हती त्यामुळेच रेल्वे राज्यमंत्री यांनी लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात […]Read More

विदर्भ

गुटखा विक्री साठी मोक्का आणि भिवंडीत विशेष मोहीम

नागपूर दि ९ : राज्यातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात पान , तंबाखू , अंमली पदार्थ पदार्थ मिळण्याच्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, वारंवार असे गुन्हे करणाऱ्यांवर कायद्यात बदल करून अशा लोकांवर मोक्का लावण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. याशिवाय भिवंडीत याबाबत एक विशेष मोहीम राबविण्यात येईल असेही ते म्हणाले. […]Read More

राजकीय

फलटण, महिला डॉक्टरची आत्महत्या फसवणूक आणि शारीरिक शोषणामुळेच

नागपूर दि ९ : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्ये प्रकरणी अटकेत असणारा संबंधित पोलिस अधिकारीच जबाबदार असून , त्यानेच तिचे शारीरिक शोषण आणि फसवणूक केल्याचे आजवरच्या तपासात उघडकीस आलं आहे, तिच्या हातावरील हस्ताक्षर तिचंच आहे आणि गळफास लावून घेऊनच ती आत्महत्या झाली असल्याचं ही तपासात निष्पन्न झालं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More

ट्रेण्डिंग

दुचाकी वाहनांना मिळणार पसंतीचा नोंदणी क्रमांक

मुंबई,दि. ८ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम) येथे दुचाकी वाहनांच्या नोंदणी मालिकेत बदल करण्यात आला आहे. एमएचओ-२-जीक्यू ही चालू मालिका संपुष्टात येत आहे. नवीन एमएचओ जीआर मालिका लवकरच सुरू होणार असून आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आरटीओकडून जाहीर करण्यात आली आहे.एका क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्या क्रमांकांची यादी कार्यालयाच्या नोटीस […]Read More

देश विदेश

आजही Indigo ची 400 हून अधिक विमाने रद्द

मुंबई, दि. ८ : Indigo Airlines ने देशभर घातलेल्या अभूतपूर्व गोंधळाच्या आजच्या सलग सातवा दिवशीही ४०० हून अधिक विमाने रद्द करण्यात आली. गेल्या मंगळवारपासून देशातील सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी असलेल्या इंडिगोने ४,५०० हून अधिक विमान उड्डाणे रद्द केली आहेत, ज्यामुळे हा त्यांच्या इतिहासातील सर्वात गंभीर विमान वाहतूक संकट ठरला आहे.सोमवारी इंडिगोच्या संकटाचा परिणाम त्यांच्या […]Read More

राजकीय

‘मुंबई ते गुवाहाटी व्हाया सूरत’ – शिंदेंच्या बंडावर येतंय पुस्तक

मुंबई, दि. ८ : सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडे तीन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड केले होते. या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. शिवसेनेच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या बंडावर ‘मुंबई ते गुवाहाटी व्हाया सूरत’ असं पुस्तक लिहिण्याचा आणि लेखक बनण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस उदय सामंत यांनी बोलून […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

१३ ते २१ डिसेंबर दरम्यान NBT आयोजित ‘पुणे पुस्तक महोत्सव’

पुणे, दि. ८ : राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT) द्वारे १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव ’होणार आहे. भारतीय भाषांमधील पुस्तकांची ८०० दालने, लिटरेचर फेस्टिव्हल, बालकांसाठी चिल्ड्रेन कॉर्नर, लेखकांसाठी ऑर्थर कॉर्नर, दररोज पुस्तकांची प्रकाशने, सांस्कृतिक कार्यक्रम अशा एकापेक्षा एक कार्यक्रमांनी यंदाचा ‘पुणे पुस्तक महोत्सव’ रंगणार आहे. या महोत्सवाला […]Read More