Month: December 2025

साहित्य

पाटणा बुक फेअरमध्ये पुस्तकाची किंमत तब्बल 15 कोटी

पाटणा, दि. ९ : ४१ व्या पाटणा बुक फेअरमध्ये ‘मैं’नावाचे पुस्तक सर्वाधिक चर्चेत आहे. या पुस्तकाची किंमत 15 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.संपूर्ण जगात या पुस्तकाच्या केवल तीनच प्रती असल्याचे म्हटले जात आहे. पाटणा बुक फेअरमध्ये या पुस्तकाला मोठ्या भव्य पद्धतीने प्रदर्शित करण्यात आले. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पुस्तकाची पाने उलटण्याची परवानगी कोणाला नव्हती. […]Read More

ट्रेण्डिंग

आई दलित असल्यास मुलीलाही मिळेल जात प्रमाणपत्र

पुद्दुचेरी, दि. ९ : सर्वोच्च न्यायालयाने जाती प्रमाणपत्राबाबत एका महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलांना त्यांच्या आईच्या जातीच्या आधारावर अनुसूचित जाती चे प्रमाणपत्र जारी करण्याची परवानगी देणारा आदेश नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. “बदलत्या काळात, आईच्या जातीच्या आधारावर जात प्रमाणपत्र का जारी करू नये?” असे खंडपीठाने नमूद केले. पुद्दुचेरीतील एका विशिष्ट प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने […]Read More

शिक्षण

पुण्यात अनधिकृत अभ्यासिका आणि पेइंग गेस्ट होस्टेलवर होणार कारवाई

पुणे, दि. ९ : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी राज्यभरातील लाखो विद्यार्थी वास्तव्य करतात. पुण्यातील काही भागांचे अर्थकारण तर या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांतून मिळणाऱ्या उत्पन्नावर आधारित आहे. असे असले तरीही आता पुणेकरांना या विद्यार्थ्यांचा त्रास होऊ लागला आहे. याला कारणीभूत ठरल्या आहेत ती गल्लोगल्ली सुरु झालेल्या अनधिकृत अभ्यासिका आणि पेईंग […]Read More

ट्रेण्डिंग

आधार कार्डाच्या फोटोकॉपीवर लवकरच प्रतिबंध

मुंबई, दि. 9 : आधार कार्डाच्या फोटोकॉपी गोळा करून ठेवण्यास हॉटेल, कार्यक्रम आयोजक आणि अशाच इतर संस्थांना प्रतिबंध करणारा एक नवीन नियम लवकरच जारी केला जाणार आहे. आधार कार्डाच्या फोटोकॉपी जमा करून ठेवण्याची ही पद्धत सध्याच्या आधार कायद्याचे उल्लंघन करते. याबाबत UIDAI कडून लवकरच नवीन नियम जारी केला जाईल. UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश […]Read More

देश विदेश

इंडिगो प्रकरणी हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली, दि. ९ : Indigo Airlines ने प्रचंड अनियोजनामुळे आठवड्याभराहून अधिककाळ देशभरातील प्रवाशांना वेठीला धरले होते. ३ हजाराहून अधिक विमाने रद्द झाल्याने हजारो लोकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. त्यानंतर सरकारने Indigo ला प्रवाशांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तरीही काही प्रवाशांनी विमान कंपनी विरोधात न्यायालयात धाव घेतली. इंडिगोच्या अनागोंदी कारभाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज […]Read More

महानगर

राणी बागेत उभारण्यात येणार ‘विदेशी प्राणी विभाग’

मुंबई, दि. ९ : मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयांच्या १० एकर जागेवर लवकरच ‘विदेशी प्राणी विभाग’उभारण्यात येणार आहे. यामध्ये १८ दुर्मिळ आणि विदेशी प्रजातींसाठी आधुनिक निवाऱ्यांची उभारणी केली जाणार आहे. यामध्ये पांढरा सिंह, चित्ता, लिंबूर, झेब्रा यांसारख्या प्राण्यांचा समावेश असणार आहे. यासाठी पालिका अंदाजित ४९८ कोटी रुपये खर्च करणार आहे. […]Read More

पर्यावरण

वनताराच्या कामाबद्दल अनंत अंबानींना ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड

मुंबई, दि. ९ : वन्यजीव संवर्धन आणि प्राणी कल्याण क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अमेरिकेत झालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार समारंभात अनंत अंबानी यांना ग्लोबल ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वनताराच्या माध्यमातून प्राण्यांच्या बचाव, उपचार, पुनर्वसन आणि संवर्धनात त्यांच्या नेतृत्वासाठी हा सन्मान त्यांना देण्यात आला. या कामगिरीसह, अनंत अंबानी यांनी एक विशेष विक्रमही प्रस्थापित केला आहे. हा सन्मान […]Read More

राजकीय

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकर शेठ यांचे नाव द्यावे,आमदार

मुंबई, दि ९मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकर शेठ यांचे नाव द्यावे अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्दाद्वारे सभापती महोदयांना केली.गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मुंबईकर जनता पश्चिम रेल्वे मार्गावरील ‘मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानका’ला ‘नाना जगन्नाथ शंकरशेठ’ यांचे नाव देण्याची मागणी करीत आहेत. नाना शंकरशेठ हे ‘ग्रेट ईस्टर्न रेल्वे’ या […]Read More

राजकीय

प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्‍याकामी पाच दिवसांची मुदतवाढ

मुंबई, दि ९माननीय राज्‍य निवडणूक आयोगाने मतदार यादीशी संबंधित सुधारित कार्यक्रम आज मंगळवार, दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर केला आहे. त्‍यानुसार, महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्‍याची मुदत सोमवार, दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजीपर्यंत म्‍हणजेच पाच दिवस वाढवण्‍यात आली आहे. महाराष्‍ट्र राज्‍यातील २९ महानगरपालिकांच्‍या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम माननीय […]Read More

देश विदेश

जर्मन विद्यापिठाकडून अनंत गाडगीळ यांचा बहुमान

मुंबई दि ९ : जर्मनीतील प्रसिद्ध हायडेलबर्ग विद्यापीठाने यंदाच्या हिवाळी सत्रामधील ‘आंतरराष्ट्रीय वक्ता’ म्हणून कॅांग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंत गाडगीळ यांना आमंत्रित केले असून या आठवड्यामधे ‘ भारतीय राजकिय पद्धती व लोकशाही पुढची आवाहने” या विषयावर गाडगीळ यांचे जर्मनीत व्याख्यान सदर विद्यापिठातर्फे आयोजित करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी नोबेल नामांकित प्रा हार्ष मानदर, किल विद्यापीठाचे प्रा […]Read More