Month: December 2025

ऍग्रो

केंद्रीय कृषीमंत्र्यांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल

नवी दिल्ली.दि. ११ : खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. कृषीमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिल्याचं ओमराजे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राकडून शेतकऱ्यांना मदतीसाठी निधी मागणारा प्रस्ताव आला आहे, असे असत्य विधान केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केल्याचा आरोप करत ओम राजे निंबाळकर यांनी लोकसभा अध्यक्षांकडे हक्क भंग दाखल केला आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

Indigo प्रवाशांना देणार गिफ्ट व्हाऊचर

मुंबई, दि. ११ : Indigo एअरलाईन्सने अलीकडील उड्डाणातील गोंधळामुळे त्रास झालेल्या प्रवाशांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर देण्याची घोषणा केली आहे. हे व्हाऊचर पुढील १२ महिन्यांपर्यंत कोणत्याही इंडिगो प्रवासासाठी वापरता येणार आहे. इंडिगो, भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी, डिसेंबर ३ ते ५ या कालावधीत झालेल्या मोठ्या उड्डाण गोंधळामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे […]Read More

ट्रेण्डिंग

BYJU’S ला दिलासा, १ अब्ज डॉलर्सची नुकसानभरपाई रद्द

मुंबई, दि. ११ : Ed Tech प्लॅटफॉर्म BYJU’S ची मूळ कंपनी थिंक Think and Learn Pvt. Ltd संस्थापकांच्या निवेदनानुसार, अमेरिकेच्या दिवाळखोरी न्यायालयाने बायजू रवींद्रन यांच्याविरुद्धचा १ अब्ज डॉलर्सचा नुकसानभरपाईचा निर्णय रद्द केला आहे. गेल्या महिन्यात डेलावेअर न्यायालयाने एका निर्णयात रवींद्रन यांना १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम देण्याचे आदेश दिले होते. त्यात असे म्हटले होते की, […]Read More

ट्रेण्डिंग

नेरुळ ते मुंबई फक्त ३० मिनिटांत, १५ डिसेंबरपासून फेरीबोट सुरु

मुंबई, दि. ११ : नेरुळ ते भाऊचा धक्का प्रवासी फेरी सेवा १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सेवेमुळे सध्या ९० मिनिटांचा रस्ते प्रवास केवळ ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. सिडकोने उभारलेल्या नेरुळ पॅसेंजर वॉटर टर्मिनल (NPWT) साठी ही सेवा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. सुरुवातीला दररोज चार ट्रिप्स आणि २० आसनी फेरी या मार्गावर धावेल. प्रति प्रवासी […]Read More

ट्रेण्डिंग

गोवा क्लब आग प्रकरणी लुथरा ब्रदर्सना थायलंडमध्ये अटक

गोव्यातील बिर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये ६ डिसेंबर रोजी लागलेल्या भीषण आगीत तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांनी देश सोडून थायलंडला पलायन केले. तपास यंत्रणांनी शोधमोहीम सुरू केल्यानंतर अखेर भारतीय एजन्सींनी थाई पोलिसांच्या मदतीने या दोघांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्याच्या रात्रीच लुथरा ब्रदर्सनी […]Read More

विदर्भ

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

​नागपूर, दि. ११ : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अकृषिक परवानगीची अट रद्द केल्यानंतर आता त्यापुढील ‘सनद’ घेण्याची अटही रद्द करण्यात आली असून या संदर्भातील ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक २०२५’ महसूलमंत्री चंद्रशेखर बानकुळे यांनी विधानसभेत मांडले. ​ • नेमका बदल काय? महसूल मंत्री […]Read More

बिझनेस

भारत-चीनसह 5 आशियाई देशांवर मेक्सिकोकडून 50% टॅरिफ

नवी दिल्ली, दि. ११ : अमेरिकेचा शेजारी देश मेक्सिकोनेही अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. मेक्सिकोने भारतीय वस्तूंवर ५०% कर लादला आहे. मेक्सिकोच्या सिनेटने भारत, चीन आणि इतर अनेक आशियाई देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर ५०% पर्यंत वाढीव कर लादण्यास मान्यता दिली. हे नवीन कर पुढील वर्षी लागू होतील. देशांतर्गत व्यावसायिक गटांचा विरोध आणि प्रभावित देशांच्या आक्षेपांना न […]Read More

विदर्भ

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज भ्रष्टाचारातील अहवाल २ महिन्यात सादर

नागपूर, दि ११ वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज ईटीएस मोजणी अहवाल २ महिन्यात सादर करा असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत.वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आल्या आहेत.यामुळे सरकारचा ६०० कोटींचा महसूल बुडाल्याची तक्रार अमोल कोमावार यांनी केली आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज प्रकरणी आज विधानसभा […]Read More

विदर्भ

मुंबईतील ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना मिळणार दिलासा

मुंबई, दि. ११: गेल्या काही वर्षांपासून भोगवटा प्रमाणपत्र (‘ओसी’) अभावी कायदेशीर अडचणी आणि आर्थिक भुर्दंड सोसणाऱ्या मुंबईकरांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील सुमारे २० हजार इमारतींना नियमित करण्यासाठी ‘सुधारीत भोगवटा अभय योजना’ लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. याचा फायदा वर्षानुवर्षे ओसीपासून वंचित दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना मिळेल. विधानसभेत […]Read More

देश विदेश

कोल्हापुरी चपलांच्या जागतिक प्रसारासाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य

मुंबई, दि.११ : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झाला. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली–भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. शतकांपासून वापरात असलेल्या पारंपरिक चप्पल निर्मितीच्या पद्धती, प्राडाच्या आधुनिक […]Read More