Month: December 2025

राजकीय

डोंबिवलीत भाजपाचा विजय! दोन महिला उमेदवार निवडून आल्या बिनविरोध! मुख्यमंत्र्यांनी

ठाणे, दि ३१कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. वार्ड क्रमांक १८ आणि वार्ड क्रमांक २६(क) मधून कोणतेही नामांकन दाखल झाले नाही. त्यामुळे या दोन्ही वार्डांतून भाजपाच्या दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्या. वार्ड क्रमांक १८ (कचोरे विभाग) मधून रेखा चौधरी आणि वार्ड क्रमांक २६(क) मधून आसावरी केदार नवरे बिनविरोध विजयी झाल्या.भाजप पदाधिकाऱ्यांना […]Read More

विदर्भ

अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील तीन एकर जमीन

अमरावती दि ३१ : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ एकर ८ आर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. चिखलदरा येथील सुमारे साडे सात एकर जमीन १९७५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून […]Read More

राजकीय

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम

मुंबई दि. ३१ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ दिवसांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात तसेच एसटीची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येत आहे.या मोहिमेंतर्गत बसस्थानकातील बैठक व्यवस्था, […]Read More

देश विदेश

सोशल मीडियावरील अश्लील कंटेंटबाबत केंद्राचा इशारा

नवी दिल्ली, दि. ३० : केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना अश्लील सामग्रीबाबत इशारा दिला आहे. यात म्हटले आहे की कंपन्यांनी अश्लील, असभ्य, पोर्नोग्राफिक, मुलांशी संबंधित लैंगिक शोषणाचे आणि इतर प्रकारच्या बेकायदेशीर सामग्रीवर त्वरित बंदी घालावी. जर कंपन्यांनी कारवाई केली नाही, तर त्यांच्यावर खटला चालवला जाईल. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (Meity) ही सल्लागार सूचना […]Read More

देश विदेश

संरक्षण क्षेत्रासाठी 79 हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी

नवी दिल्ली, दि. ३० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला गती देत संरक्षण क्षेत्रासाठी 79,000 कोटी रुपये रुपयांच्या खरेदी प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवला आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) घेतलेल्या या निर्णयामुळे केवळ देशाच्या सीमा अधिक सुरक्षित होणार नसून, भारतीय संरक्षण कंपन्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नवीन संरक्षण खरेदी नियमावलीनुसार (DPM), […]Read More

ट्रेण्डिंग

फक्त 1850 रुपयांमध्ये विमान प्रवास, Air India Express ची ऑफर

मुंबई, दि. 30 : Air India Express ने प्रवाशांसाठी आनंदाची बातमी जाहीर केली. कंपनीने त्यांचा मासिक “पे डे सेल” सुरू केला आहे. या सेल अंतर्गत देशांतर्गत प्रवाशांसाठी विमान तिकिटे १,९५० रुपयांपासून सुरू होतात, तर परदेशात प्रवास करण्याची योजना आखणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय तिकिटे ५,५९० रुपयांपासून सुरू होतील. या विशेष भाड्यांवरील तिकिटे १ जानेवारी २०२६ पर्यंत एअरलाइनच्या अधिकृत […]Read More

महानगर

३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस

मुंबई, दि. ३० : मुंबईतील प्रसिद्ध जे जे रुग्णालयात १९९२ साली घडलेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा खटला आता ३३ वर्षांच्या विलंबानंतर पुढच्या टप्प्यावर पोहोचला आहे. या खटल्यात विशेष टाडा न्यायालयाने दोन आरोपींच्या विरोधात अतिरिक्त पुराव्यांची नुकतीच नोंद करून घेतली आहे. फारुख मन्सुरी ऊर्फ फारुख टकला आणि त्रिभुवन रमापती सिंह ऊर्फ श्रीकांत राय या दोन आरोपींविरूद्ध अतिरिक्त […]Read More

ट्रेण्डिंग

गुजरातमध्ये स्थापन होणार Indian AI Research Organisation

अहमदाबाद, दि. ३० : गुजरातमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाला नवे बळ मिळणार आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गिफ्ट सिटी येथे “इंडियन एआय रिसर्च ऑर्गनायझेशन” (IAIRO) स्थापन करण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. या संस्थेची उभारणी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स (IPA) यांच्या त्रिपक्षीय भागीदारीत सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलवर करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश […]Read More

राजकीय

शिवसेनेने प्रसिद्ध केले मुंबई मॉडेलचे ‘पॉकेट बुक’

मुंबई, दि. ३० : शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या ‘सॅफ्रॉन ॲण्ड ब्लॅक मुंबई’ या ‘पॉकेट बुक’मधून ठाकरी तेजपर्व अन‌् काळ्या गद्दारयुगाची तुलना’ करण्यात आली आहे. ही पुस्तिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतींना सविनय अर्पण करण्यात आली आहेत. या पुस्तिकेत मुंबई महापालिकेचे काटेकोर अर्थनियोजन, जगातील सर्वाधिक स्वस्त व बेस्ट बससेवा, मुंबई पब्लिक स्कूलचा यशस्वी प्रयोग, जगातील सर्वाधिक […]Read More

पर्यटन

राज्यातील हा विमानतळ ग्राहक समाधान सर्व्हेमध्ये देशात प्रथमस्थानी

मुंबई, दि. 30 : छत्रपती संभाजीनगर विमानतळाने देशातील सर्व विमानतळांना मागे टाकत ग्राहक समाधान सर्वेक्षणात पहिला क्रमांक मिळवला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जुलै ते डिसेंबर २०२५ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात ६२ विमानतळांचे मूल्यांकन झाले असून खजुराहो, भोपाळ आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळांना ५ पैकी ४.९९ रेटिंग मिळाले आहे. २०२४ मध्ये १३व्या स्थानी असलेले हे विमानतळ आता पहिल्या […]Read More