Month: December 2025

विदर्भ

बालभारतीकडून मोठी कारवाई, हजारो बेकायदेशीर पाठ्यपुस्तके जप्त

नागपूर, दि. १७ : महाराष्ट्र शासनाच्या शालेय पाठ्यपुस्तक निर्मिती व प्रकाशनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘बालभारती’ संस्थेने बुधवारी नागपूरमध्ये मोठी कारवाई केली. हिंगणा MIDC परिसरातील दिग्दोह येथील प्रतिभा प्रिंटिंग प्रेसवर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान हजारो पाठ्यपुस्तके बेकायदेशीररीत्या छापली जात असल्याचे उघडकीस आले. बालभारतीचे उत्पादन अधिकारी राजेश पोटदुखे यांनी पत्रकारांना सांगितले की, “डुप्लिकेट पुस्तके छापली जात असल्याची […]Read More

महाराष्ट्र

धि गोवा हिंदु असोसिएशनचे रंगभूमीवर पुनरागमन

मराठी नाट्यसृष्टी तसेच रसिक प्रेक्षकांसमोर सातत्याने दर्जेदार नाटके व संगीत नाटके सादर करणारी अग्रगण्य संस्था “धि गोवा हिंदु असोसिएशन” काही काळानंतर पुन्हा एकदा रंगभूमीची सेवा करण्यासाठी सज्ज झाली आहे. धि गोवा हिंदु असोसिएशन आणि सुकल्प चित्र यांच्या संयुक्त विद्यमाने “सुभेदार गेस्ट हाऊस” हे एक नवे कोरे मराठी नाटक लवकरच रंगभूमीवर सादर होणार आहे. या नाटकाचे […]Read More

राजकीय

राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखणार

मुंबई दि १७ : राज्यातील गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयानुसार सांस्कृतिक कार्य विभागाच्या यापुर्वीच्या (दि. २० जानेवारी २०२५) शासन निर्णयातील गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्याबाबतच्या तरतूदींची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. यामध्ये आता राज्य […]Read More

राजकीय

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम

मुंबई दि १७ : महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम १४ (२) मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका वेळेत आणि कालबध्द रितीने व्हाव्यात या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत […]Read More

बिझनेस

रुपयाचा ऐतिहासिक नीचांक ९१.०७ : भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील गंभीर आव्हान

– जितेश सावंत भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात कालचा दिवस आणखी एक काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या रुपयाच्या सातत्यपूर्ण घसरणीने काल डॉलरच्या तुलनेत ९१.०७ या नव्या ऐतिहासिक नीचांकी पातळीला स्पर्श केला. ही घसरण केवळ विनिमय दरापुरती मर्यादित नसून, ती महागाई, गुंतवणुकीवरील दबाव आणि आर्थिक अस्थिरतेची स्पष्ट सूचना देणारी आहे. जागतिक अर्थकारणातील वाढती […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय(संक्षिप्त एकूण – २)

बुधवार दिनांक. 17 डिसेंबर 2025१) महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. २) गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखणार, सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती.ML/ML/MSRead More

देश विदेश

IMA तून उत्तीर्ण झालेली पहिली महिला लष्करी अधिकारी : मराठी

डेहराडून, दि. 16 : येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या 93 वर्षांच्या गौरवशाली परंपरेत एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरची 23 वर्षीय सई जाधव ही अकॅडमीमधून उत्तीर्ण होणारी पहिली महिला लष्करी अधिकारी ठरली आहे. 1932 मध्ये स्थापन झालेल्या या प्रतिष्ठित अकॅडमीमधून आतापर्यंत 67,000 पेक्षा जास्त अधिकारी बाहेर पडले, मात्र त्यात एकही महिला नव्हती. सईच्या यशामुळे […]Read More

ट्रेण्डिंग

ठाणे–कल्याण मार्गावरील भुयारी रेल्वे सुरू करण्याची योजना विचाराधीन

मुंबई, दि. १६ : मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण-़डोंबिवली स्थानकांतील गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रशासन एक महत्त्वपूर्ण आराखडा तयार करत आहे. प्रस्तावित ७वी आणि ८वी रेल्वे लाईन उभारणीदरम्यान काही भागात थेट भुयारी (अंडरग्राउंड) रेल्वे मार्ग टाकण्याचा पर्याय गांभीर्याने विचाराधीन आहे. १०.८ किलोमीटर लांबीचा ठाणे-कल्याण रेल्वे पट्टा हा मध्य रेल्वेच्या सर्वात व्यस्त विभागांपैकी एक असून दररोज सुमारे […]Read More

देश विदेश

या आखाती देशात एका वर्षात तब्बल 340 जणांना फाशीची शिक्षा

आखातातील श्रीमंत देश सौदी अरेबियामध्ये 2025 मध्ये तब्बल 340 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली असून हा आकडा देशाच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. यामुळे मानवी हक्क संघटनांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.सौदी अरेबियाने यंदा मृत्युदंडाच्या बाबतीत स्वतःचाच विक्रम मोडला आहे. डिसेंबर 2025 पर्यंत अधिकृत आकडेवारीनुसार 340 लोकांना फाशी देण्यात आली. यातील बहुसंख्य शिक्षा अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांशी […]Read More

मनोरंजन

निलेश साबळेंचे झी-मराठी मंचावर पुनरागमन

मुंबई, दि. १६ : चला हवा येऊ द्या,या कॉमेडी शोच्या माध्यमातून दशकभराहून अधिक काळ प्रेक्षकांना हसवणारे सूत्रसंचालक निलेश साबळे यांनी काही काळ ब्रेक घेतला होता. आता ते त्यांच्या हक्काच्या झी मराठी प्लॅटफॉर्मवरुन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अभिनेता भाऊ कदमही निलेश सोबत या नवीन कार्यक्रमात दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिवसांपासून सोशल मीडियावर […]Read More