Month: December 2025

महानगर

शिवडी येथे सनबर्न’ रद्द करण्यासाठी झाले आंदोलन

मुंबई, दि १८- नेहमीच वादग्रस्त राहिलेला आणि गोवा, पुणे येथून हद्दपार झाल्यानंतर ‘सनबर्न फेस्टिवल’ यावर्षी शिवडी, मुंबई येथे १९ ते २१ डिसेंबरला होणार आहे. या अमली पदार्थांचे अतीसेवन, युवकांचे मृत्यू, अश्लीलता आणि शासनाचा कर बुडवलेला कार्यक्रम यांसाठी कुप्रसिद्ध असलेला ‘सनबर्न फेस्टिवल’ तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी आज शिवड़ी येथे ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’च्या वतीने जोरदार जनआंदोलन करण्यात […]Read More

ट्रेण्डिंग

ChatGPT Images 1.5 झालं लॉन्च

OpenAI ने नुकतेच ChatGPT Images 1.5 हे नवे व्हर्जन सादर केले आहे. या अपडेटमुळे वापरकर्त्यांना फोटोज तयार करणे, एडिट करणे आणि क्रिएटिव्ह व्हिज्युअल्स बनवणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे. कंपनीचे CEO सॅम ऑल्टमन यांनी या फीचरचे डेमो दाखवले असून यातून साध्या इन्स्ट्रक्शनवरूनही उच्च दर्जाचे परिणाम मिळतात. उदाहरणार्थ, एखाद्या फोटोला 3D डॉल्स, स्केचेस, प्लश टॉयज, डूडल्स […]Read More

महानगर

*स्त्री हक्कांच्या नव्या पर्वाची सुरुवात : समानतेचा निर्धार

मुंबई, दि १८: – स्त्री मुक्ती चळवळीला ५० वर्ष पूर्ण झाल्याने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटरमध्ये येत्या २०,२१ आणि २२ डिसेंबरला तीन दिवसीय राज्यव्यापी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत गेल्या ५० वर्षांतील स्त्री चळवळीचा आढावा आणि पुढील ५० वर्षांच्या कामाची दिशाही ठरविण्यात येणार आहे. परिषदेची माहिती देताना महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या अध्यक्ष शारदा […]Read More

राजकीय

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक शिवसंग्राम लढणार – डॉ ज्योती मेटे

मुंबई, दि १८आज मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई येथील शिवसंग्रामचे जिल्हाअध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांची बैठक संपन्न झाली. यात आगामी काळात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीत लोकनेते विनायकराव मेटे विकास आघाडी च्या माध्यमातून शिवसंग्राम या निवडणुका लढणार असल्याचे या बैठकीत सर्वानुमते निश्चित करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसंग्राम अध्यक्ष […]Read More

ट्रेण्डिंग

भारताचा HOMEBOUND ऑस्करच्या शर्यतीत

मुंबई, दि. १८ : भारतीय दिग्दर्शक नीरज घायवान यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला HOMEBOUND हा चित्रपट प्रतिष्ठित **98व्या अकादमी पुरस्कारांमध्ये (Oscars 2026) Best International Feature Film या श्रेणीत शॉर्टलिस्ट झाला आहे. धर्मा प्रॉडक्शन्सचे प्रमुख *करण जोहर* यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करत संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, “हा प्रवास आमच्यासाठी अभिमानाचा आहे आणि […]Read More

ट्रेण्डिंग

Google Pay ने लाँच केलं पहिले क्रेडिट कार्ड

मुंबई, दि. १८ : Google ने भारतात आपले पहिले जागतिक क्रेडिट कार्ड लाँच केले असून ते अ‍ॅक्सिस बँकेच्या सहकार्याने RuPay नेटवर्कवर उपलब्ध झाले आहे. या कार्डची खासियत म्हणजे ते थेट UPI शी लिंक करता येते, ज्यामुळे ग्राहकांना दुकानं आणि व्यापाऱ्यांकडे सहज पेमेंट करता येते. गुगल पे क्रेडिट कार्डचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे प्रत्येक व्यवहारावर मिळणारे […]Read More

महानगर

प्राणीप्रेमींचा मदतीसाठी मुंबईकर सरसावेल

मुंबई, 18: शहरातील प्राणीप्रेमींसाठी बांद्रा येथे मुंबईकर एकवटले आणि अनोख्या प्राणीप्रेमींचे दर्शन घडले. ब्रांदा येथे ‘महजॉंग – पॉज विथ अ पर्पज’ या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शीतल झुबीन आणि तनिका ठक्कर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रमा आयोजित केली होती.प्राणीप्रेमींच्या मदतीसाठी हा निधी संकलन उपक्रम फर-रिडाज अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन ट्रस्टसाठी समर्पित होता. फरिदा बजाज यांनी […]Read More

राजकीय

महसूल विभागाचा ‘डिजिटल’ कायापालट!

मुंबई, दि. १८ :छोट्या-छोट्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडता कामा नयेत, अशा सक्त सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाचे स्वतंत्र डाटा सेंटर आणि महसूल विभागाच्या तांत्रिक सक्षमीकरणाबाबतच्या उच्चस्तरीय बैठकीत केली. ते म्हणाले,”जमिनीचा डाटा हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा असून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि विभागाच्या सक्षमीकरणासाठी अधिकाऱ्यांनी तयारी करावी. महसूल विभागाला देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी […]Read More

मनोरंजन

धमाल मनोरंजक ‘गोट्या गँगस्टर’चा ट्रेलर लाँच

पुणे, दि १८राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या गोट्या नावाचा तरूण आणि त्याचे मित्र गँग तयार करण्याचा प्रयत्न करतात, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय धमाल होते याची रंजक गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार असून, २६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

आरोग्य,शिक्षण,पाणी पुरवठ्याच्या मुद्दयावर बसपा निवडणूक रिंगणात!डॉ.हुलगेश चलवादींची माहिती*

पुणे, दि १८ मोडकळीस आलेल्या महानगर पालिकेच्या शाळा, पाणीपुरवठा करतांना पेठा आणि उपनगर असा केला जाणारा भेदभाव आणि आरोग्य सोयीसुविधेसह सर्वसामान्यांच्या मुद्यांवर बहुजन समाज पक्ष १५ जानेवारीला होवू घातलेली पुणे, पिंपरी-चिंचवड महानगर पालिका निवडणूक लढवेल, अशी माहिती पक्षाचे प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी गुरूवारी (ता.१८) दिली. शहरात लोकसंख्येचा वाढता दबाव […]Read More