Month: October 2025

ट्रेण्डिंग

IMD चा हाय अलर्ट- महाराष्ट्रावर घोंगावतय ‘Montha’ चक्रीवादळ

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं जोरदार पुनरागमन झालं असून आता महाराष्ट्रावर एक मोठं संकट घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोंथा चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला देखील बसण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, तर अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर तीव्र दाबात होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून […]Read More

राजकीय

इतरांना ॲनाकोंडा म्हणणारे उद्धव ठाकरे स्वतः घरात बसलेले ‘अजगर’

मुंबई दि २७ : उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना निराशेने घेरलेले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. त्याच मानसिक अवस्थेत आज उद्धव ठाकरे यांनी पुन्हा गरळ ओकली. इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं कारण ते घरात बसलेले अजगर आहेत. जे फक्त पडून राहतात, आणि दुसऱ्यांच्या मेहनतीवर […]Read More

महानगर

ठाण्यात मुसळधार पावसात छटपूजेसाठी महिलांची गर्दी..

कृत्रिम तलावात छटपूजा साजरी करत पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश… ठाणे, ता. 27: गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहरात काही सामाजिक संस्थांसह महापालिका प्रशासनाकडून देखील छटपूजेची तयारी केली जात आहे. यंदा ठाणे शहरात २० ठिकाणी छट पूजेसाठी सोयी सुविधा उपलब्ध करुन दिली गेली होती. यामध्ये सात ते आठ ठिकाणी महापालिकेच्या वतीने कृत्रीम तलाव तयार निर्माण केले होते. […]Read More

देश विदेश

पहिली AI मंत्री देणार 83 मुलांना जन्म – अल्बानियाच्या पंतप्रधानांची

अल्बानियाच्या पंतप्रधान एडी रामा यांनी एक अनोखी आणि क्रांतिकारी घोषणा करत जगाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी जाहीर केले की देशाची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मंत्री डिएला ही “गर्भवती” असून ती ८३ AI सहाय्यकांना जन्म देणार आहे. ही घोषणा बर्लिनमध्ये आयोजित ग्लोबल डायलॉग कॉन्फरन्समध्ये करण्यात आली आणि तंत्रज्ञान तसेच राजकारणाच्या क्षेत्रात ती चर्चेचा विषय ठरली आहे. […]Read More

देश विदेश

उद्यापासून 12 राज्यांमध्ये मतदार यादी फेर निरिक्षण सुरू

नवी दिल्ली, दि. २७ : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत महत्त्वाची घोषणा केली आहे. उद्यापासून देशभरातील १२ राज्यांमध्ये SIR (विशेष सखोल फेरनिरीक्षण) करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. १२ राज्यांमध्ये SIR चा दुसरा टप्पा उद्यापासून सुरु होईल. या टप्प्यात मतदार यादी अद्ययावत केली जाईल. नवी मतदार जोडले जातील. सोबतच […]Read More

राजकीय

वरळी येथील शिवसेना (उबठा)निर्धार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि २७वरळी येथील शिवसेनेचा निर्धार मेळाव्याचे आयोजन आज वरळी येथील एनएससीआय डोम येथे करण्यात आले होते. परंतु पावसामुळे या ठिकाणी शिवसैनिक जमतील की नाही याची खात्री नव्हती. संध्याकाळच्या वेळेस पाऊस मोठ्या प्रमाणात पडला होता त्यामुळे या निर्धार मेळाव्यावर पावसा मुळे गर्दी ओसरते की काय असा प्रश्न येथील आयोजकांच्या मनात होता. परंतु पाऊस पडत असून […]Read More

विज्ञान

जयंत नारळीकरांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, दि. २७ : जगप्रसिद्ध खगोलभौतिकशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाईल, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांच्या धर्तीवर २०२५ चे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर केले आहेत. या वर्षी एकूण २३ शास्त्रज्ञ आणि एका संघाला सन्मानित केले जाईल. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील हे देशातील सर्वोच्च पुरस्कार आहेत. […]Read More

ट्रेण्डिंग

देशात प्रथमच होणार घरगुती उत्पन्न सर्वेक्षण

नवी दिल्ली, दि. २७ : देशात पहिल्यांदाच घरगुती उत्पन्न सर्वेक्षण होणार आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये राष्ट्रीय घरगुती उत्पन्न सर्वेक्षण (NHIS) सुरू करण्याची सरकारची योजना आहे, असे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव सौरभ गर्ग यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. भारतात पहिल्यांदाच, एक सर्वेक्षण सुरू आहे ज्यामध्ये प्रत्येक घराच्या उत्पन्नाचा संपूर्ण […]Read More

ट्रेण्डिंग

‘रामायण कंट्री’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या देशात भव्य राममंदिराची उभारणी

पोर्ट ऑफ स्पेन,दि. २७ : भारताशी सांस्कृतिक संबंध असलेल्या त्रिनिदाद आणि टोबॅगो देशात भव्य राममंदिराची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाला सरकारने मंजूरी दिली असून, याचा उद्देश हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीला प्रोत्साहन देणे आहे. या देशाला ‘रामायण कंट्री’ म्हणून ओळखले जाते आणि येथे ‘मिनी अयोध्या’ उभारण्याचाही प्रस्ताव आहे. सुमारे 15 लाख लोकसंख्या असलेल्या या […]Read More

देश विदेश

रशियाने केली पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी

मॉस्को, दि. २७ : रशियाने जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची, बुरेव्हेस्टनिकची यशस्वी चाचणी केली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी सांगितले की, क्षेपणास्त्राच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. पुतिन म्हणाले की जगातील इतर कोणत्याही देशाकडे असे क्षेपणास्त्र नाही आणि त्यांनी लष्कराला सेवेत प्रवेश करण्यासाठी तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. २१ ऑक्टोबर रोजी या क्षेपणास्त्राची यशस्वी […]Read More