Month: October 2025

ट्रेण्डिंग

Gmail ला टक्कर देणार स्वदेशी Zoho इमेल

नवी दिल्ली, दि. ८ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज त्यांचा ईमेल पूर्णपणे भारतीय बनावटीच्या Zoho Mail प्लॅटफॉर्मवर (Made-in-India Zoho Mail) स्विच करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या शुल्क ( दबावाच्या पार्श्वभूमीवर, ‘स्वदेशी’ (Swadeshi) आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला बळ देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वीच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री […]Read More

ट्रेण्डिंग

शिवसेना पक्ष चिन्ह याचिकेवर सुनावणी आता १२ नोव्हेंबरला

नवी दिल्ली, दि. ८ : शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर आता येत्या १२ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत होणार असून त्यापूर्वी या प्रकरणाची सुनावणी घ्यावी, अशी विनंती ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे यांच्या वतीनं केली. ही विनंती मान्य करून येत्या १२ […]Read More

देश विदेश

Nobel 2025 –रसायनशास्त्रासाठीचे पुरस्कार जाहीर

स्टॉकहोम, दि. ७ : नोबेल पारितोषिक २०२५ मध्ये रसायनशास्त्र क्षेत्रातील तीन शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यात आला आहे. सुसुमु कितागावा (जपान), रिचर्ड रॉबसन (ऑस्ट्रेलिया) आणि ओमार याघी (अमेरिका) यांना मेटल-ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स (MOFs) या नाविन्यपूर्ण रसायन रचनांच्या संशोधनासाठी गौरवण्यात आले आहे. MOFs म्हणजे धातू आणि सेंद्रिय संयुगांच्या साहाय्याने तयार होणाऱ्या स्फटिकासारख्या रचना, ज्यामध्ये सूक्ष्म छिद्र असतात. या छिद्रांमुळे […]Read More

राजकीय

या भागात उभारली जाणार चौथी मुंबई, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई, दि. 8 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदर परिसरात ‘चौथी मुंबई’ उभारण्याची मोठी घोषणा केली असून, महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. […]Read More

मनोरंजन

PVR INOX ने सुरू केला ‘dine-in cinema’

बंगळुरू, दि. ८ : PVR INOX ने बंगळुरूमध्ये भारतातील पहिला ‘डाइन-इन सिनेमा’ सुरू केला असून, चित्रपट पाहण्याचा अनुभव आता स्वादिष्ट जेवणासह अधिक आल्हाददायक होणार आहे. PVR INOX ने बंगळुरूच्या M5 ECity Mall मध्ये भारतातील पहिला ‘डाइन-इन सिनेमा’ सुरू केला आहे. हा नवीन फॉरमॅट पारंपरिक चित्रपटगृहाच्या संकल्पनेला छेद देतो आणि प्रेक्षकांना चित्रपट पाहतानाच त्यांच्या जागेवर बसून […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

राज्यातील या सहकारी बँकेचा परवाना रद्द

मुंबई, दि. ८ : RBI ने सातारा येथील जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि उत्पन्न क्षमता नसल्याने ही कारवाई केल्याचे RBI ने सांगितले. परवाना रद्द केल्यामुळे जिजामाता महिला सहकारी बँकेला तात्काळ बँकिंग व्यवसाय करण्यास मनाई आहे. बँकेला ठेवी स्वीकारण्यास आणि ठेवी परत करण्यास बंदी घातली आहे. RBI ने एका […]Read More

राजकीय

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सर्व जिल्ह्यांत वसतिगृहे

​मुंबई: दि. ८ : राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, कार्यालय आणि अभ्यासिका उभारण्याच्या योजनेला राज्य शासनाने गती दिली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये जागा उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून जागा निश्चित करण्याचे स्पष्ट निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. येत्या २८ ऑक्टोबरला पुढील आढावा बैठक होणार […]Read More

साहित्य

बालनाट्य लेखनाबद्दल डॉ शिवणेकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार…

मुंबई दि ८ : लेखक आणि कवी डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांना सशा रे सशा तुझ्या तुपातल्या मिशा या बालनाट्याच्या लेखनाबद्दल श्री संत किसन महाराज सुडके जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार_2025 हा मान्यवरांच्या हस्ते कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी काल प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार वितरण सोहळा श्री संत किसन महाराज सुडके आश्रम संतनगर कांगोणी, तालुका नेवासा जिल्हा […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

थोरांदळे येथे हनुमान मंदिराचा होणार जीर्णोद्धार

मुंबई, दि. ८ : पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यात थोरांदळे येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या भूमीमध्ये हनुमान मंदिर जिर्णोद्धार कामाचे भूमिपूजन नुकतेच सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने संपन्न झाले. छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी हे महापुरुष नाशिक वरून पुण्याकडे सज्जन गडावर जात असताना त्याकाळात थोरांदळे गावातील गावकऱ्यांनी या महापुरुषांना हनुमान मूर्तीची […]Read More

राजकीय

शिवसेना स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचा स्थापना सोहळा

मुंबई, दि ८शिवसेनेची अंगीकृत संघटना, स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचा स्थापना सोहळा गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.०० वाजताबिर्ला मातोश्री सभागृह, बॉम्बे हॉस्पिटल जवळ, मरिन लाईन्स, मुंबई २० येथे जल्लोषात होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला सर्व बँका, रेल्वे, माझगाव डॉक, नेवल डॉक, […]Read More