Month: October 2025

राजकीय

सातारा–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करासार्वजनिक

मुंबई, दि २९सातारा–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीबाबत गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी संबंधित विभागांना तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. या महामार्गावरील रस्त्यांची प्रगती, कराड परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, तसेच साखर हंगामामुळे वाढलेली ऊस वाहतूक याबाबत आज सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत मंत्री भोंसले यांनी अधिकाऱ्यांना महामार्गावरील वाहतूक […]Read More

महानगर

विमानतळ कार्गो कामगारांचा भाजपात प्रवेश

मुंबई दि २९ : आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्गो येथील शेकडो कामगारांचा आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि अखिल कामगार कर्मचारी संघ अध्यक्ष आमदार रविंद्रजी चव्हाण प्रमुख उपस्थिती मध्ये पक्षप्रवेश करण्यात आला. आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील टर्मिनल- २ येथील अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. याप्रसंगी अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे महासचिव सुहास माटे, […]Read More

राजकीय

येत्या हिवाळी अधिवेशनात कोचिंग क्लास नियंत्रण विधेयक

मुंबई, दि २९ : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित अधिकाऱ्यांची समिती गठित करावी. या समितीने मुंबई मधील खासगी कोचिंग क्लासची तपासणी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करावा असे, निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरिता […]Read More

महानगर

स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या मीटिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि २९स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाची कार्यकारिणीची बैठक नुकतीच महालक्ष्मी येथे जल्लोषात पार पडली. या बैठकीमध्ये महासंघाचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महासंघाच्या वतीने पुढे करण्यात येणाऱ्या विविध आस्थापनेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये ICICI बँकेतील महाराष्ट्रातील सुमारे ७०० हंगामी कामगारांना महासंघाने वेतनवाढ दिली. परंतु आरोग्य विमा योजनेचे लाभ मिळणे बंद […]Read More

महानगर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हानिहाय बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि २९आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महासंसदरत्न माननीय सुप्रिया ताई सुळे, तसेच प्रदेशाध्यक्ष आणि आमदार श्री. शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने जिल्हानिहाय आढावा बैठक पार पडली. या बैठकीस आ. जितेंद्र आव्हाड साहेबांसह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत […]Read More

राजकीय

जागा हडप करणाऱ्या लॉबीला महसूलमंत्र्यांचा दणका !

मुंबई, दि. २९ : माझगाव येथील जीजीबॉय ट्रस्टचा शासकीय भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नामंजूर केला. तसेच, ट्रस्ट किंवा विकासकाने चुकीच्या पद्धतीने भरलेली रक्कम परत करावी, असे स्पष्ट निर्देश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. या संदर्भात महसूलमंत्र्यांच्या दालनात आज बैठक झाली. आमदार सचिन अहिर, आमदार अमोल मिटकरी आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे मुंबई शहर जिल्हाधिकारी, आंचल गोयल […]Read More

खान्देश

उत्तर महाराष्ट्रातील पोस्ट सेवा वेगवान करण्यासाठी मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नांना

नाशिक,दि.२९ :- नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील पोस्ट सेवा वेगवान करण्यासाठी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांना आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले असून नाशिक L2 पार्सल हबचे L1 पार्सल हबमध्ये श्रेणीवर्धन करण्यास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. यामुळे नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधील पोस्ट पार्सल सुविधा होणार अधिक वेगवान […]Read More

महानगर

कबुतरखान्यांबाबत जैन समाजाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. गगराणी

मुंबई, दि २९मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला / नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेवून बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्या उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांचेकडे केली. दरम्यान, अशा पर्यायी जागांचा शोध घेवून त्याबाबतची माहिती माननीय न्यायालयाकडे सादर करण्यात येईल, असे श्री. गगराणी यांनी या शिष्टमंडळाला सांगितले. […]Read More

शिक्षण

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात ‘क्वासार-२०२५’ आजपासूनदोन दिवसीय राष्ट्रीय परिषद

पुणे, दि २९: एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एमआयटी-आयडी) तर्फे विद्यापीठाची प्रमुख राष्ट्रीय डिझाइन परिषद ‘क्वासार २०२५ – Designing What’s Next’ ही ३० व ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सर्जनशीलता आणि नवोपक्रमाचा उत्सव म्हणून साकारलेली ही दोन दिवसीय परिषद डिझाइनच्या भविष्यदृष्टीचा शोध घेणार असून तिचा प्रभाव उद्योग, […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

केअर इंडिया मेडिकल सोसायटीच्या वतीने कर्करोगग्रस्त रुग्णांचा मोफत इलाज

पुणे, दि २९: केअर इंडिया मेडिकल सोसायटी तर्फे ‘दिवाळी विथ अ पर्पज’ हा सामाजिक उपक्रम मागील 30 वर्षांपासून राबविण्यात येतो. यंदा 30 ऑक्टोबर 2025 रोजी हा उपक्रम राबविला जाणार आहे. या अंतर्गत कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांचे आप्तसंबंधी आपापले मनोगत व्यक्त करतील. कमांड हॉस्पिटल (दक्षिण मुख्यालय), पुणे येथील चरक ऑडिटोरियम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. […]Read More