Month: October 2025

महानगर

ॲड. डॉ.नीलेश पावसकर यांची ईडीच्या वरिष्ठ वकील पॅनलवर नियुक्ती.

मुंबई, दि. २ : कायदा क्षेत्रातील प्रख्यात विधिज्ञ ॲड. डॉ. नीलेश वैजयंती भगवान पावसकर यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वरिष्ठ वकील पॅनलवर मुंबई उच्च न्यायालयात प्रतिष्ठेची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विधिजगतासह विविध सामाजिक संस्थांकडून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. डॉ. पावसकर यांनी महाराष्ट्र शासनासाठी विशेष सरकारी वकील आणि सरकारी अधिवक्ता म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार […]Read More

राजकीय

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आजगुरुवार, दिनांक ०२ ऑक्टोबर, २०२५ रोजी विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (४) शिवदर्शन साठये, उप सभापती यांचे […]Read More

महानगर

संघाच्या विजयादशमी शस्त्रपूजन उत्सवाला सभापती प्रा. राम शिंदे यांची उपस्थिती

रायगड दि २ : कर्जत येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन उत्सव आणि संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमीच्या पारंपरिक कार्यक्रमात स्वयंसेवकांनी गणवेशात शिस्तबद्ध संचलन केले. शस्त्रपूजन विधी पार पडल्यानंतर देशभक्तीपर वातावरणात घोषणाबाजी, परंपरा आणि सांघिक शिस्तीचे दर्शन […]Read More

सांस्कृतिक

श्री महालक्ष्मी देवीला दसऱ्याला १६ किलो सोन्याची साडी परिधान

पुणे दि २ : श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याला श्री महालक्ष्मी देवीला १६ किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली. दक्षिण भारतातील कारागिरांनी ही सोन्याची साडी साकारली होती. मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा आहे. श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट तर्फे वषार्तून […]Read More

ट्रेण्डिंग

पैठणच्या शेतकऱ्याने KBC मध्ये 50 जिंकले लाख

मुंबई, दि. १ : संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्र अतिवृष्टीने ग्रस्त असताना एका शेतकऱ्याला सुखद यशाने दिलासा मिळाला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमात भल्याभल्यांना न जमणारी गोष्ट या पठ्ठ्याने करुन दाखवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील शेतकरी कैलास रामभाऊ कुंटेवाड (Kailas Kuntewad) यांनी एकही लाईफलाईन न वापरता, […]Read More

राजकीय

RRS च्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा निर्णय

अमरावती,दि. १ :सरन्यायाधीश न्या.भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी अमरावती येथे ऑक्टोबर 5, 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत त्यांनी एका पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत कमलताई गवई यांचे नाव प्रमुख अतिथी म्हणून छापण्यात आले होते. त्यामुळे […]Read More

शिक्षण

पुणे जिल्हा परिषदेची जालिंदरनगर शाळा जागतिक क्रमवारीत प्रथम

मुंबई, दि. १ – भारतीय शाळा जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हे जागतिक पातळीवर भारतीय शिक्षण पद्धतीला जगन्मान्यता मिळण्यासारखे आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेचे जगात सर्वोत्कृष्ट ठरणे हा क्षण देश आणि राज्याच्या शासकीय शिक्षण व्यवस्थेसाठी कलाटणी देणारा क्षण आहे, असे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काढले. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळा, […]Read More

आरोग्य

खोकल्याच्या औषधामुळे सरकारी रुग्णालयात ६ बालकांचा मृत्यू

भोपाळ, दि. १ : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात खोकल्याच्या औषधामुळे सहा बालकांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. राजस्थानमध्येही अशाच औषधामुळे एका मुलाचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित औषधावर स्थानिक प्रशासनाने बंदी घातली आहे. गेल्या महिन्यात छिंदवाडा परिसरात खोकल्याचा प्रादुर्भाव वाढला होता. अनेक पालकांनी आपल्या मुलांसाठी सरकारी रुग्णालयातून औषधे घेतली. मात्र, औषध सेवनानंतर […]Read More

राजकीय

शांततेचे नोबेल मिळवण्यासाठी ट्रम्प यांचा हट्ट

वॉशिंग्टन डीसी, दि. १ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी जोरदार दावा केला आहे. त्यांनी सात युद्धे थांबवल्याचा दावा करत, “मला शांततेचा नोबेल पुरस्कार दिला नाही, तर तो अमेरिकेचा अपमान ठरेल,” असे जाहीर वक्तव्य केले. गाझा येथे शांतता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या योजनेवर त्यांनी विशेष भर दिला असून, इस्रायल आणि हमास यांच्यातील […]Read More

मनोरंजन

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा टिझर लॉन्च

मुंबई, दि.१ : ‘स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत!’ या घोषणेसह ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या मराठी चित्रपटाचा दमदार टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून त्यांच्या सोबतीला विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, […]Read More