Month: October 2025

राजकीय

शासनाचा आदेश हैदराबाद गॅझेटपुरता मर्यादित,ओबीसींची माथी भडकावू नका

मुंबई दि. १० : राज्य शासनाने काढलेला आदेश हा हैदराबाद गॅझेटपुरता मर्यादित असून ओबीसींची माथी भडकवून संभ्रम निर्माण करू नये, असा स्पष्ट इशारा महसूलमंत्री व मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. ते म्हणाले, सरकारने जीआर काढताना कोणतीही कुणबी व्यक्ती ओबीसी आरक्षणापासून वंचित राहू नये ही काळजी घेतली आहे. ओबीसींच्या ३५३ जातींची हित जोपासण्याचा […]Read More

राजकीय

ओला-उबर, रॅपिडोसह सर्व ॲप आधारित सेवांसाठी नवे मानक

मुंबई दि १० — राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५” या मसुदा नियमांची घोषणा केली आहे. हे नियम मोटर वाहन कायदा, १९८८ च्या कलम ७३, ७४ आणि ९३ अंतर्गत प्रस्तावित असून, १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत या हरकती व […]Read More

देश विदेश

स्वदेशी Zoho Mailचे 5 जबरदस्त फिचर्स

Arattai App निर्मिती करणाऱ्या ZOHO कॉर्पोरेशनचा ईमेल प्लॅटफॉर्म असलेला झोहो मेल आता वेगाने लोकप्रिय होत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील हा इमेल वापरण्यास सुरुवात केल्याचे जाहीर केले आहे. ZOHO मेलमध्ये गोपनीयता, मोफत सुविधा आणि व्यावसायिक हे नवीन फिचर्स लाँच केल्यामुळे अनेक लोकांचा कळ हा जीमेलवरून झोहो मेलवर वळत आहे. ZOHO मेल हे एक भारतीय […]Read More

ऍग्रो

तब्बल 8 कोटींचा रेडा शेतकरी मेळ्यात दाखल

मेरठ,दि. 10 : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये नुकत्याच झालेल्या किसान मेळ्यामध्ये एका ‘विधायक’ नावाच्या रेड्याने (Reda) सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या मुर्रा जातीच्या रेड्याची किंमत तब्बल 8 कोटी रुपये इतकी लावण्यात आली आहे. रेड्याची ही अवाढव्य किंमत ऐकून त्याला पाहण्यासाठी दूरदूरहून लोकांनी मेळ्यामध्ये मोठी गर्दी केली होती. हा ‘विधायक’ नावाचा मुर्रा प्रजातीचा रेडा त्याच्या विशिष्ट शरीरयष्टीमुळे […]Read More

ट्रेण्डिंग

पहिल्यांंदाच कर्ज घेणाऱ्यांसाठी Good News

मुंबई, दि. १० : पहिल्यांदाच कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी CIBIL स्कोअर ही एक अडचणीची बाब ठरते. बऱ्याच वेळा, लोक कर्जासाठी अर्ज करतात परंतु त्यांच्याकडे पूर्वीचा क्रेडिट रेकॉर्ड किंवा CIBIL इतिहास नसतो. म्हणूनच बँका त्यांना कर्ज देण्यास नकार देतात. मात्र आता भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्ज अर्ज प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी बदल केला आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

या राज्यात पोस्टमन भरतीसाठी स्थानिक भाषा येणे बंधनकारक

पणजी, दि. १० : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यामध्ये पोस्टमन पदी (ग्रामिण डाक सेवक) भरती होण्यासाठी कोकणी भाषा येणे बंधनकारक असल्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या अखत्यारीतील पोस्ट विभागाने या संदर्भातील नियमात बदल केला आहे. या बदलामुळे गोव्यातील स्थानिक तरुणांना याचा अधिक लाभ होणार आहे. याआधी गोव्यात पोस्टमन म्हणून महाराष्ट्रातील तरुणांची भरती […]Read More

महिला

Nobel Peace Prize 2025 – व्हेनेझुएलाच्या कोरीना यांना जाहीर

स्टॉकहोम, दि. 10 : व्हेनेझुएलातील दीर्घकालीन हुकूमशाहीविरोधात आवाज उठवणाऱ्या आणि लोकशाही मूल्यांसाठी संघर्ष करणाऱ्या मारिया कोरीना माचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नोर्वेजियन नोबेल समितीने त्यांच्या कार्याची प्रशंसा करत म्हटले की, “लोकशाहीच्या अंधारात आशेचा दीपवत त्यांनी संघर्ष केला आहे.” माचाडो यांनी गेल्या अनेक दशकांपासून व्हेनेझुएलात लोकशाही पुनर्स्थापनेसाठी कार्य केले आहे. […]Read More

राजकीय

ओबीसी आरक्षणाला किंचितही धक्का नाही ,चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

मुंबई, दि.१० : ओबीसी आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही, सरकार ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, याची खात्री बाळगा असा दावा महसूलमंत्री व ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले, ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा व कुणबी मराठासंदर्भातील काढलेल्या शासन आदेशावरून सर्वपक्षीय शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाला किंचितही धक्का लागणार […]Read More

क्रीडा

टोकियोमध्ये 11 व्या केडब्ल्यूएफ कराटे विश्वचषकात भारताचा दबदबा

मुंबई, दि. १० : टोकियो, जपान – ऑक्टोबर, 2025 – टोकियोच्या युमेनोशिमा पार्क येथील BumB टोकियो स्पोर्ट्स अँड कल्चर सेंटर स्टेडियमवर झालेल्या 11 व्या केडब्ल्यूएफ कराटे विश्वचषकात टीम इंडियाने आज इतिहास रचला. अत्यंत स्पर्धात्मक अशा यूथ ए टीम काता प्रकारात तीन सुवर्ण पदके मिळविली. हा विजय जागतिक कराटे मंचावर भारतासाठी एक अतुलनीय विजय आहे, ज्याने […]Read More

राजकीय

घोडबंदरमधील RMC प्लांटवर MPCB ची कारवाई — तत्काळ बंदीचा आदेश

मीरा-भाईंदर दि १०: मीरा-भाईंदर शहरातील घोडबंदर परिसरात चालणाऱ्या रेडी मिक्स कॉंक्रिट (RMC) प्लांटविरुद्ध परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचाशी केलेल्या अधिकृत पत्र व्यवहारनंतर MPCB तर्फे सखोल चौकशी करण्यात आली. आता यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) कठोर कारवाई करत तत्काळ बंदीचा आदेश जारी केला आहे. या प्लांटमधून गंभीर स्वरूपाचे […]Read More