Month: October 2025

राजकीय

राज्यातील नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी १०० कोटींची तरतूद!

मुंबई, दि ०७ : राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त मच्छिमार बांधवांसाठी व मच्छीमारांच्या बोटींच्या नुकसान भरपाईसाठी १०० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. याची घोषणा आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र […]Read More

ट्रेण्डिंग

कुंभमेळा आयुक्त म्हणून या अधिकाऱ्याची नियुक्ती

मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र शासनाने राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी , नाशिक, जळगाव आणि पुणे जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या तसेच इतर महत्त्वाच्या पदांवर फेरबदल करण्यात आले आहेत. पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यांचे प्रचंड व्यवस्थापन लक्षात घेऊन सध्याचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती कुंभमेळा आयुक्त, नाशिक म्हणून करण्यात आली […]Read More

महानगर

पंतप्रधानांच्या हस्ते उद्या होणार नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन

मुंबई,दि. ७ : बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (NMIA) अखेर उद्या (दि. ८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हा भव्य कार्यक्रम उद्या दुपारी सुमारे २.४० दरम्यान पार पडणार आहे. पंतप्रधानांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी व्यापक वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० […]Read More

देश विदेश

Nobel 2025 – भौतिकशास्त्रासाठीचे पुरस्कार जाहीर

स्टॉकहोम, दि. ७ : नोबेल पारितोषिक २०२५ मध्ये भौतिकशास्त्र क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान अमेरिकेतील तीन वैज्ञानिकांना मिळाला आहे. जॉन क्लार्क, मिशेल डेवोरेट आणि जॉन मार्टिनिस यांना त्यांच्या क्रांतिकारी संशोधनासाठी गौरवण्यात आले आहे. त्यांनी विद्युत सर्किटमध्ये क्वांटम यांत्रिकीचे गुणधर्म सिद्ध करून विज्ञानाच्या क्षेत्रात नवा अध्याय लिहिला आहे. या संशोधनात त्यांनी सुपरकंडक्टिंग सर्किट वापरून असे दाखवले की क्वांटम […]Read More

राजकीय

शिवसेना गणेशोत्सव सजावट स्पर्धेच्या पारितोषिक समारंभाला उस्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि ७शिवसेना आयोजित “उत्सव मुंबईचा – सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धा” आणि “महामंगळागौर” स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरणाचा सोहळा नुकताच गिरगाव येथील भारतीय विद्या भवन येथे पार पडला. या कार्यक्रमाला मुंबईतील सर्व गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमांमध्ये राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमात विविध […]Read More

राजकीय

एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

मुंबई, दि. ७ : एस टी महामंडळ कामगारांच्या विविध मागण्या आहेत. त्या रास्त असून या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टी कामगार संघटना सोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले. बैठकीस एस. टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक […]Read More

राजकीय

” प्रवासी व चालकांना ” केंद्रस्थानी ठेवून ॲप आधारित टॅक्सी

मुंबई दि ७ : ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सी साठी ॲग्रिगेटर धोरण नियमावली येत्या २ दिवसात जाहीर होत असुन त्यामध्ये प्रवासी आणि चालकांच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा पुरविणाऱ्या संस्थांनी व्यवसाय करताना ” प्रवासी व चालकांना ” केंद्रस्थानी ठेवावे, भरमसाठ नफा कमविण्याच्या प्रयत्नात त्यांची […]Read More

पर्यावरण

,महाराष्ट्रात 7 ऑक्टोबरला वादळी ‘कमबॅक’, 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट!

मुंबई दि ७ : हवामान विभागाने ७ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार असल्याने कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसह एकूण १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण विभागातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने या […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

मंगळवार, दि.७ ऑक्टोबर २०२५(उद्योग विभाग)महाराष्ट्र राज्याचे रत्ने व दागिने धोरण – २०२५ जाहीर. सोने, चांदीचे दागिने,हिरे-रत्ने यांच्याशी निगडीत उद्योग-व्यवसाय वाढीस चालना मिळणार. एक लाख कोटीं रुपयांची गुंतवणूक, पाच लाख नवीन रोजगार निर्मितेच उद्दीष्ट. (नगर विकास विभाग)राज्यातील नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रियेचे धोरण. सांडपाण्यावरील प्रक्रीयेमुळे आणि त्याच्या पुनर्वापराव्दारे चक्रीय अर्थव्यवस्थेस (सर्क्युलर ईकॉनॉमी)ला चालना. सांडपाण्याचे शाश्वत व्यवस्थापन, पर्यावरण […]Read More

सांस्कृतिक

सिंधुदुर्गातील ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाला गती

मुंबई, दि. ७ : सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वास्तूंनी नटलेला, धार्मिक अधिष्ठान असलेला जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने तसेच ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी येथील नांदोश गढीचे शास्त्रीय उत्खनन, भगवंतगडची पुरातत्त्वीय पाहणी आणि रामगडला ‘राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार […]Read More