पणजी, दि. २० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात INS विक्रांतवरील नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधानांनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याची ही १२ वी वेळ आहे. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी कालपासून तुमच्यामध्ये आहे. तुमच्या प्रत्येकाकडून मी काहीतरी शिकलो आहे, मला काहीतरी कळले आहे. खोल समुद्रातील रात्र आणि सूर्योदयाने माझी दिवाळी अनेक प्रकारे खास बनवली […]Read More
अयोध्या, दि. २० : दिवाळीनिमित्त प्रभू श्रीरामांची अयोध्या नगरी २९ लाख दिव्यांनी उजळून निघाली आहे. या निमित्ताने ही विक्रमी आरास तसेच अन्य एक विक्रम ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदला गेला आहे. ‘राम की पैडी’ येथील ५६ घाटांवर २६.११ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. तसेच शरयू तीरावर अन्यत्रही दिव्यांची आरास करण्यात आली होती. अयोध्या नगरी […]Read More
मुंबई, दि. २० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात संपूर्णपणे विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र कुठेही मागे पडणार नसून महाराष्ट्राचे ‘ व्हिजन डॉक्युमेंट’ त्यासाठी निश्चितच सहाय्यकारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विकसित महाराष्ट्र २०४७ सल्लागार समितीच्या बैठकीत व्यक्त केला. या बैठकीत विकसित महाराष्ट्र […]Read More
मुंबई, दि. २० : राज्यातील विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधण्यासाठी, दुहेरी लाभ टाळण्यासाठी आणि सर्व आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी एकाच छताखाली प्रभावीपणे करण्यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात येत आहे. ही वॉर रूम’ मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या देखरेखीखाली कार्य करणार असून, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या […]Read More
ठाणे दि २०: “विरोधकांनी आता कितीही लवंग्या-सुरसुरी फोडल्या, तरी आम्ही त्याकडे पाहतही नाही! कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे आणि तो फुटला की विरोधकांचं राजकीय अस्तित्व उडून जाईल!” असा स्फोटक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिला.“महायुतीसोबत महाराष्ट्राची जनता ठामपणे उभी आहे, म्हणूनच आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने आमचीच सत्ता येणार,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त […]Read More
नांदेड दि २०:- नांदेडच्या तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरुद्वारात दिवाळी अगोदर तखत स्नान म्हणजेच संपूर्ण गुरुद्वारा, दरबार साहिब आणि गुरु महाराजांचे शस्त्र ला पवित्र गोदावरीच्या पाण्याने स्नान घालण्यात येते. ही परंपरा शेकडो वर्षापासून पूर्वापार परंपरेने चालत आलेली आहे. पवित्र गुरुद्वाराची तख्त स्नान करण्याची संधी सामान्य भाविकांना मिळत असल्यामुळे देश विदेशातून भाविक ही सेवा आपल्या […]Read More
सिंधुदुर्ग दि २० – दिवाळी आली की सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाल गोपाळ आणि मित्र मंडळ यांना नरकासुर बनवण्याचे वेध लागतात. उंच उंच नरकासुर , हालते बोलते नरकासुर बनवण्याची स्पर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी भरवल्या जातात. दिवाळीच्या मध्यरात्री हे सर्व नरकासुर एकत्रित मांडण्यात येतात. या ठिकाणी स्पर्धेचे परीक्षण होते .बक्षीस समारंभ होतो आणि त्यानंतर नरकासुराचे दहन आपापल्या वाड्या वस्त्यांमध्ये […]Read More
वाशीम दि २०: दिवाळी सणानिमित्त शहरातील बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली असताना, यंदा वाशीमच्या बाजारपेठेत काळ्या रंगाच्या मॉरिशियन उसाची खास चर्चा आहे. हा उस जिल्ह्यातील काटा गावातील शेतकऱ्यांनी पिकवलेला असून, त्याला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ऐतिहासिक माहितीनुसार, १८ व्या शतकात मुंबईचे प्रतिष्ठित उद्योगपती आणि समाजसेवक जगन्नाथ शंकर सेठ उर्फ नाना सेठ यांनी मॉरिशियस देशातून काळ्या […]Read More
गोंदिया दि २०: महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री, माजी खासदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते महादेवराव शिवणकर यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी निधन झाले. महादेवराव शिवणकर हे आमगाव विधानसभेचे 5 वेळा आमदार आणि चिमूर लोकसभेचे 1 वेळा खासदार म्हणून त्यांनी कार्यकाळ सांभाळला आहे. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारमध्ये जलसंपदा मंत्री होते. संघाच्या स्वयंसेवकापासून ते मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला […]Read More
पालघर दि 20 : आदि कर्मयोगी अभियान” अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पालघर जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला असून, जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकास कार्याची ही दखल मानली जात आहे. या यशामागे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे नेतृत्व जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड , […]Read More