Month: October 2025

ट्रेण्डिंग

सांडपाणी स्वच्छतेसाठी आता रोबोटिक क्लिनिंग मशीन

महाराष्ट्र सरकारने 100 कोटी रुपयांच्या खर्चाने 100 वाहन-आधारित रोबोटिक सीवर-क्लिनिंग मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या आधुनिक यंत्रांमुळे हाताने विषारी सांडपाणी साफ करण्याची अमानवी प्रथा संपवण्याचा प्रयत्न होणार आहे. या उपक्रमामुळे गटारे किंवा सांडपाणी साचलेल्या टाक्यांमध्ये उतरून काम करणाऱ्या हजारो स्वच्छता कामगारांचे प्राण वाचतील, तसेच त्यांना नव्या तंत्रज्ञानासोबत सुरक्षित रोजगार मिळेल. या निर्णयाचा उद्देश […]Read More

महानगर

सायबर पोलिसांची वेगवान कारवाई, वाचवले १४ लाख रु.

मुंबई सायबर पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे डिजिटल स्कॅमचा बळी ठरलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचे लाखो रुपये परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईत राहणारे तक्रारदार हे एकेकाळी लंडनच्या एका प्रतिष्ठित कंपनीत लेखापाल (Accountant) म्हणून कार्यरत होते. २००५ मध्ये निवृत्त झाल्यानंतर ते शांतपणे मुंबईत आयुष्य जगत होते. मात्र, 4 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान घडलेल्या एका घटनेने त्यांचे […]Read More

ट्रेण्डिंग

ओलाच्या CEO विरोधात FIR दाखल

OLA इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावर एका कर्मचाऱ्याच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. बंगळुरू पोलिसांनी एफआयआरमध्ये कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी सुब्रत कुमार दास यांचेही नाव घेतले आहे. ६ ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या FIR मध्ये भाविश यांचे नाव नव्हते, परंतु मृताच्या भावाच्या विनंतीवरून, त्यांच्याविरुद्ध बीएनएस कायद्याच्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाविश […]Read More

राजकीय

महसूल मंत्री बावनकुळे यांची दिवाळी भेट, ४७ अधिकाऱ्यांना बढती…

​मुंबई, दि. २० :​दिवाळीच्या पर्वावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील ४७ महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची भेट दिली आहे. यामध्ये २३ अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी), तर २४ उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदावर बढती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, निवडश्रेणी मिळालेल्या अनेकांचा भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला. आज सोमवार याबाबतचे शासन आदेश जारी […]Read More

महानगर

मुंबई बँकेत कॅश रिसायकलिंग मशीन प्रणालीचे झाले उदघाटन

मुंबई, दि २०- मुंबई बँकेच्या ग्राहकांना रांगा न लावता खात्यात रक्कम भरणा करण्यासाठी आणि काढण्यासाठी कॅश रिसायकलिंग मशीन प्रणाली कार्यरत झाली असून या प्रणालीचे उदघाटन भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभ हस्ते आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पार पडले. बँकेच्या इतर २८ शाखांमध्ये ही प्रणाली लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. मुंबई […]Read More

महानगर

डॉ गजानन रत्नपारखी याच्यां ” गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनची दिवाळी जल्लोषात

मुंबई, दि २०डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनची दिवाळी पहाट कार्यक्रम एमसीवीपी l हॉल , जुहू येथे जल्लोषात संपन्न झाला.ह्या कार्यक्रमाचे चे उद्घाटन डॉ गजानन रत्नपारखी, डॉ स्मृती रत्नपारखी, डॉ प्रांजळ रत्नपारखी. डॉ घाटकर, डॉ शशांक शाह , डॉ अश्विनी चव्हाण, डॉ शरद दधिच, डॉ राम चव्हाण , डॉ काटे, डॉ अशोक सिंग ह्यांनी […]Read More

देश विदेश

अमेरिकेत पन्नास प्रकारच्या कर्करोगांची एकत्रित चाचणी

अमेरिकेत पन्नास प्रकारच्या कर्करोगांची एकत्र चाचणी सुरू होणार आहे. या निदान चाचणीची तपासणी अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने (National Institutes of Health)घेतली असून त्याचे निकाल समाधानकारक आले आहेत. या चाचणीद्वारे एकाच वेळी ५० प्रकारच्या कर्करोगांचे निदान होणे शक्य होईल. त्यातील तीन प्रकारच्या कर्करोगांची तर आतापर्यंत कोणतीही चाचणीच उपलब्ध नव्हती अमेरिकेतील औषध निर्मिती कंपनी ग्राईलने ही चाचणी […]Read More

विदर्भ

कोणाच्याही ताटातील वाटा काढून दुसऱ्याला नाही, बावनकुळे यांची ग्वाही…

​मुंबई, दि. २० : “ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची भूमिका ठाम असून, कोणाच्याही ताटातील वाटा काढून दुसऱ्याला दिला जाणार नाही,” अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिली. ​ ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून तीन प्रमुख नेत्यांमध्ये वेगवेगळी मते असल्याचे निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले, दोन सप्टेंबरचा शासन निर्णय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणे […]Read More

महानगर

न्हावा शेवा बंदरातून ४.८२ कोटींचे चीनी फटाके जप्त

मुंबई, दि. २० : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सोमवारी नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरात कपड्यांच्या एका खेपेस तस्करी करून आणले जाणारे ४.८२ कोटी रुपयांचे चिनी फटाके जप्त केले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. फटाक्यांच्या तस्करीमागील एका प्रमुख व्यक्तीला गुजरातच्या वलसाडमध्ये अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. डीआरआयने त्यांच्या सुरू असलेल्या “ऑपरेशन फायर ट्रेल” अंतर्गत न्हावा शेवा […]Read More

बिझनेस

दिवाळीत डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी – एएसजी आय हॉस्पिटल यांचे

पुणे, दि २०: प्रकाशाचा सण दिवाळी सर्वत्र आनंद, उत्साह आणि उत्सवाचे वातावरण निर्माण करतो. मात्र या सणात फटाक्यांचा अयोग्य वापर, धूर व अपघातामुळे डोळ्यांच्या दुखापतींच्या घटना दरवर्षी वाढताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर एएसजी आय हॉस्पिटल कडून नागरिकांना सुरक्षित व डोळ्यांसाठी अनुकूल दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एएसजी आय हॉस्पिटलच्या वतीने दिवाळीनिमित्त जनजागृती करण्यासाठी पत्रकार […]Read More