Month: October 2025

महानगर

भायखळ्यात झाली “वोट चोर… गद्दी छोडसाठी भव्य स्वाक्षरी मोहिम

मुंबई प्रतिनिधी, दि. २५ : लोकसभेचे विरोधी पक्ष नेते काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीदरम्यान मतदार यादीतील मतचोरी विरोधात संघर्ष सुरु केला असून, “संविधानाचे आणि भारतीय लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी” आज भायखळा विभाग येथे माजी आमदार मधु चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ब्लॉक काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, महिला कॉंग्रेस तसेच सर्व सेलतर्फे केंद्रातील भ्रष्टाचारी भाजपा सरकारने […]Read More

खान्देश

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला १ कोटी ११ लाख

नाशिक, दि. २५ : त्र्यंबकेश्वर येथील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ओझर विमानतळ येथे सुपूर्द करण्यात आला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, देवस्थानचे सचिव तथा नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील, विश्वस्त कैलास घुले, रुपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलग, स्वप्नील शेलार, मनोज थेटे, डॉ. […]Read More

सांस्कृतिक

“बगळ्यांची माळ फुले” – कविवर्य वा.रा. कांत यांच्या साहित्यावर आधारित

मुंबई दि २५ : सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित “बगळ्यांची माळ फुले” ही साहित्य, कविता आणि संगीताने नटलेली विशेष मैफिल २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे सायंकाळी ६.३० वाजता रंगणार आहे. कार्यक्रमाचे संयोजन कलाविष्कार या संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे जेष्ठ कवी, लेखक आणि विचारवंत वा.रा. कांत […]Read More

साहित्य

नव्या पिढीला साहित्याची नव्याने ओळख करून देण्याची वेळ

मुंबई, दि. २५ : नव्या पिढीला साहित्याची नव्याने ओळख करून देण्याची आली वेळ आली आहे अशा शब्दांत संगीत दिग्दर्शक निशिकांत सदाफुले यांनी मर्मावर बोट ठेवले. विहंग प्रतिष्ठान, नेहरुनगर , कुर्ला पूर्व आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन संगीत दिग्दर्शक निशिकांत सदाफुले आणि आमदार मंगेश कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरूनगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंग […]Read More

कोकण

अठरा वर्षांनंतर मुंबई गोवा महामार्गावरील 9 ब्लॅकस्पॉटचा अडसर दूर होणार

महाड दि २५ (मिलिंद माने) : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक६६ वरील अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर ते कशेडी बंगलापर्यंतच्या असलेल्या ९ ब्लॅक स्पॉटचा अडसर दूर करण्यात यश आल्याची माहिती महामार्ग पोलीस महाड विभागाचे उपनिरीक्षक रामचंद्र ढाकणे यांनी बोलताना दिली. यामुळे १८ वर्षानंतर का होईना राष्ट्रीय महामार्ग विभागाला आता जाग आल्याने महामार्गावरील अपघातांचे प्रमाण […]Read More

कोकण

अरबी समुद्रात वादळ सदृश्य वातावरण, मच्छिमार नौका देवगड बंदरात आश्रयाला

सिंधुदुर्ग दि २५ – अरबी समुद्रात सध्या वादळसदृश वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडतो आहे. ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याची सूचना प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. समुद्रात उधाणाची स्थिती असल्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या इशाऱ्यानंतर शेकडो मच्छीमारी नौका आश्रयासाठी देवगड बंदरात […]Read More

राजकीय

निरागस हास्यामध्ये दडला आहे दिवाळीचा खरा आनंद – आमदार सुधीर

चंद्रपूर प्रतिनिधी- सर्वसामान्य जनतेला आपले कुटुंब मानणारे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आणखी एका कृतीतून समाजापुढे उत्तम आदर्श निर्माण केला आहे. आपल्या कुटुंबासोबत चौकटीच्या आत साजरी होणारी दिवाळी आ. श्री. मुनगंटीवार यांनी झोपडपट्टीतील मुलांमध्ये जाऊन साजरी केली. या मुलांसोबत दीपोत्सव साजरा करताना आ. श्री. मुनगंटीवार यांनी झोपडपट्टीतील […]Read More

महिला

ब्रिटिश विदुषी फ्रान्सिस्का ओरसिनींना भारतात प्रवेश बंदी

नवी दिल्ली, दि. २४ : ब्रिटनमधील सुप्रसिद्ध हिंदी साहित्य अभ्यासक आणि लंडन विद्यापीठाच्या SOAS (School of Oriental and African Studies) विभागातील प्राध्यापिका एमेरिटा फ्रान्सेस्का ऑर्सिनी यांना भारतात प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्या २० ऑक्टोबर २०२५ रोजी हाँगकाँगहून दिल्ली विमानतळावर आल्या होत्या, मात्र त्याच दिवशी त्यांना परत पाठवण्यात आले. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, […]Read More

देश विदेश

पाकला पाणी देण्यास अफगाणिस्तानचाही नकार

काबुल, दि. २४ : अफगाणिस्तानने पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह रोखण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानच्या माहिती मंत्रालयाने नुकतीच घोषणा केली की तालिबानचे सर्वोच्च नेता मौलवी हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी कुनार नदीवर धरण बांधण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे पाकिस्तानला अफगाणिस्तानमधून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा थांबू शकतो, ज्याचा मोठा परिणाम पाकिस्तानच्या शेती आणि जलसंपत्ती व्यवस्थापनावर होऊ शकतो. कुनार नदी […]Read More

मनोरंजन

एकता कपूरच्या या मालिकेत दिसणार बिल गेट्स

मुंबई, दि. २४ : प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स एकता कपूरच्या लोकप्रिय टीव्ही शो “क्यूंकी सास भी कभी बहू थी २” मध्ये एक खास कॅमिओ करू शकतात. ईटाइम्सच्या वृत्तानुसार, बिल गेट्स स्मृती इराणींची व्यक्तिरेखा तुलसी विराणीसोबत व्हिडिओ कॉलमध्ये दिसतील. ही कथा अंदाजे तीन भागांपर्यंत चालेल, त्यापैकी दोन भागांमध्ये बिल गेट्स दिसतील. ही कथा गर्भवती महिला आणि […]Read More